' भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं? असे नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं

भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं? असे नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

आज आपण भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. खरंतर भारतासारख्या खंडप्राय देशाच्या आयुष्यात साठ सत्तर वर्षाचे आयुष्य म्हणजे तुलनेने खूप कमी काळ. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण केलेली प्रगती आणि हा काळ पाहता देश म्हणून आपण अनेक मैलाचे दगड ओलांडत स्तुत्य वाटचाल केली आहे यात शंका नाही.

आपला हा प्रवास अनेक इष्ट अनिष्ट आठवणींनी भरलेला आहे. असंख्य चढ-उतार, दुखाचे आनंदाचे क्षण आणि बरंच काही.

स्वातंत्र्यानंतर थोड्याच अवधीत आपल्यातल्या अन्यायी प्रथांना तिलांजली देऊन समानतेचा वसा अंगीकारणे असो, वा अनेक विद्यान संस्था स्थापन करून अद्धुनिक्तेच्या जागतिक प्रवाहात स्थान पक्के करणे असो.. हा सगळा आपलाच प्रवास. आपलेच यश.. या सगळ्या बऱ्या-वाईट गोष्टींतुन आज आपल्या हातात आहे तो अविभाज्य आणि अजिंक्य असा भारत.

 

india-abstract-inmarathi
youtube.com

भारताची आजवरची सर्व क्षेत्रातली प्रगती हे आपल्या सर्वांचं संचित आहे. आणि बऱ्याच गोष्टीत झालेल्या चुका ही आपल्या सर्वांची जबाबदारी! या प्रजासत्ताक दिनी स्मरण करायला हवे ते भारताच्या अनेक क्षेत्रातल्या नेत्रदीपक कामगिरीचे..

तीच आपल्याला आणखी पुढे जाण्यासाठी आणि यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठीची प्रेरणा असेल..

१. शिक्षण आणि डिजिटल भारत

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अवघा १२ % असलेला साक्षरता दर आज तब्बल ७४ टक्क्यांचा आकडा पार करून गेला आहे. भारत शिक्षण क्षेत्रात असामान्य प्रगती करत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतातल्या पुरुषांचा साक्षरता दर ८२.१४ % तर महिलांचा साक्षरता दर ६५.४६ टक्के इतका आहे.

शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अनेक योजनांनी महत्वाची भूमिका बजावली. सर्व शिक्षा अभियान सारख्या पावलांनी हा आकडा गाठण्यात मोठे योगदान दिले आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रात अजून बरीच प्रगती भारताला करावी लागेल. यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षणाचा दर्जा. समान दर्जाचे शिक्षण समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे ही येत्या काळात भारताची प्रथामिकता असली पाहिजे.

 

Literacy-rate-inmarathi
iipsenvis.nic.in

आयटी क्षेत्राची अभूतपूर्व वाढ ही भराच्या दृष्टीने जमेची बाजू राहिली. जागतिकीकरणाचा रेत लक्षात घेऊन आर्थिक उदारीकर्णाचा निर्णय घेतल्यानंतर ९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली.

 

computer-literacy-woman_inmarathi
samaritanhelpmission.org

त्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. आयटी क्षेत्र हे सध्या भारतात झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे.

२. स्वातंत्र्योत्तर प्रगतीत महिलांचे योगदान

संविधानात भारताने लिंग समानतेचे मूल्य अंगिकारले. आणि त्याचा परिणाम पुढे अनेक क्षेत्रात महिलांच्या वाढत्या सहभागात दिसून आला. इंदिरा गांधींच्या रूपाने जगातील पहिली महिला पंताप्रधान म्हणून निर्वाचित केल्याचा मान भारताकडे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेता ही सर्व महत्वाची पडे महिलांनी भूषवली आहेत.

 

womens-in-indian-politics-inmarathi
assets.entrepreneur.com

पाच प्रमुख राज्यात महिलांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे, आणि तीन राज्यात सध्या महिला मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.
आज भारतात सर्व क्षेत्रात महिला महत्वाच्या पदांवर काम पाहत आहेत. खाजगी क्षेत्रातही महिलांचे योगदान लक्षणीय आहे. या सगळ्याचे श्रेय कौटुंबिक जबाबदार्यांतून बाहेर येऊन कामाची क्षितिजे कायम विस्तारत ठेवणाऱ्या महत्वाकांक्षी महिलांना द्यावे लागेल.

३. स्वातंत्रोत्तर काळात अर्थव्यवस्थेत झालेले बदल.

सुरुवातीला २.७ लाख करोड इतक्या असणाऱ्या अर्थव्यवस्थेचा आकडा आता ५७ लाख करोड इतका वाढला आहे. ही वध असामान्य आहे. दरम्यान आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपले स्थान कायम केले आहे. परकीय चलनाचा एकदाही थोडाथोडका नव्हे तर तब्बल ३०० बिलियन अमेरिकी डॉलर पेक्षा जास्त आहे.

रस्ते, बंदर, व्यापार करण्यासाठी लागणारी मुलभूत साधने इत्यादींचा विकास करत आणि खाद्यान्नाची उत्पन्न क्षमता वाढवत आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या मार्गावर आणून ठेवले आहे.

 

india-eco-inmarathi
financialexpress.com

उत्पादन, आयात आणि निर्यातीच्या बाबतीत इतर देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे राष्ट्र म्हणून भारताने स्थान कायम राखले आहे. डाळींचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. अनेक आर्थिक संकटांचा सामना करूनही आपली अर्थव्यवस्था आजू डगमगली नाही हे विशेष.

स्वसंतुलित अर्थव्यवस्थेचे भारत हे उत्तम उदाहरण आहे. याचे श्रेय आपल्या आर्थिक निती निश्चित करणाऱ्या तज्ञांना जाते.

४. अंतराळ संशोधनही उल्लेखनीय!

१९७५ साली भारताने पहिल्या अंतराळ उपग्रहाची निर्मिती केली. या उपग्रहाचे नाव महान भारतीय गणितज्ञ यांच्या नावावरून आर्यभट असे ठेवण्यात आले होते. तिथून पुढे अंतराळ क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरीचा भारताने सपाटा लावला. विक्रम साराभाई, डॉक्टर कलाम या शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनात भारताला पुढे नेण्यात मोलाचा वाट उचलला आहे.

मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरणारा भारत जगातील चौथा देश आहे. आणि मंगळावर पाहिल्या प्रयत्नात उतरणारा जगातील पहिला देश आहे.

चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पहिल्याच प्रयत्नात भारताच्या अंतराळ शास्त्रज्ञांनी चांद्रयान मोहिल यशस्वी करून दाखवली. चंद्रावरच्या मातीत पाण्याचा अन्स असल्याचा निष्कर्ष याच मोहिमेद्वारे समोर आला.

 

pslv-indian-inmarathi
livemint.com

उल्लेखनीय बाब म्हणजे अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी उपयोगात आणले जाणारे पोलर सॅटेलाईत लॉच व्हेईकल (PSLV) विकसित करणाऱ्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. आज आपण इतर अनेक देशांना हे तंत्रज्ञान विकत आहोत. या सर्व प्रगतीचे श्रेय भारतातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ ला जाते.

५. वस्तू उत्पादनातील प्रगतीचा चढता आलेख

जीवनोपयोगी वस्तूंच्या उत्पादनाच्या बाबतीत भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मोठी प्रगती केली आहे. आपण सर्वात स्वस्त दरात दूरसंचार सेवा देणारा देश आहोत. भारतात दूरसंचार क्षेत्राचा व्याप मोठा आहे आणि अजूनही वाढत आहे. सर्वात कमी खर्चात तयार होणारा महासंगणक बनवणारा भारत हा पहिला देश.

 

man.sector-inmarathi
exporttrust.com

सर्वात कमी किमतीची चर्चाही गाडी बाजारात आणणारा पहिला देश. जगात सर्वात जास्त दुचाकी वाहनांचे उत्पादन सध्या भारतात होते. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादांच्या बाबतीत भारताने नेत्रदीपक यश मिळवले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पशुपालनाला प्रोत्साहन देत आपण हे उत्पादन वाढवले आहे. सोन्याचे सर्वात जास्त आयत आणि वापर भारतात होतो.

सुरतची हिर्यांची बाजारपेठ तर जगभरात प्रसिध्द आहे. जगभरात विकले जाणारे ९०% हिरे भारतात प्रक्रिया आणि पोलिश केले जातात.

आर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणखी बरीच पावले उत्पादनाच्या क्षेत्रात उचलावी लागतील. उदारीकरणानंतर आर्थिक उन्नतीचा योग्य  मार्ग आपल्याला गवसला आहेच.

त्या मार्गावार पुढे जात थेट परकीय गुंतवणूक, जनता-सरकार भागीदारी अशा अनेक मॉडेल्सचा आधार घेत उत्पादनाच्या क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे प्रयत्न भारताला येत्या काळात करावे लागतील.

काही अग्रगण्य आणि महत्वाच्या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा आपण घेतला. देश म्हणून अनेक क्षेत्रात आजही आपल्याला बराच पुढचा टप्पा गाठायचा आहे. अनेक क्षेत्रातला बॅकलॉग भरून काढायचा आहे.

आपल्या चुकांचे, कमतरतेचे नागरिक म्हणून आपल्यालाच आत्मपरीक्षण करावे लागेल. मूळ प्रश्नांना हात घालावा लागेल. पण यशाची ही उदाहरणे म्हणजे मैलाचे दगड आहेत. पुढच्या वाटचालीसाठी हेच प्रेरणा देत रहतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?