'पद्मावतीचं "शील रक्षण" करणारी "मॉडर्न टेक्नॉलॉजी"

पद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पद्मावत या चित्रपटाचा वाद सध्या शिगेला पोहोचला आहे. सुरुवातीला ‘पद्मावती’ या नावाने प्रदर्शित होऊ घातलेल्या पद्मावत ला अनेक भागात प्रचंड विरोधाला आणि जनक्षोभाला सामोरे जावे लागले. विशेषतः राजस्थान, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्ये पद्मावती च्या वादाने चांगलेच वातावरण गरम केले.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश देत पद्मावत सर्व राज्यात प्रदर्शित करण्यात यावा असे सांगितले.

त्याप्रमाणे आज म्हणजे २५ जानेवारी रोजी पद्मावत सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटाला होणारा विरोध कमी झालेला नाही. असे असले तरी बॉक्स ऑफिसवर पद्मावत धुमाकूळ घालणार हे पहिल्या दिवसाच्या गर्दीने आणि तिकिटांच्या दरांनी स्पष्ट केले आहे. चित्रपट पाहण्यासाठी ताणली गेलेली उत्सुकता कामैवर परिणाम करणार हेही उघड आहेच.

 

padmavati-ban-inmarathi
i.ndtvimg.com

कर्णी सेनेसोबत अनेक अस्मितावादी संघटनांनी चित्रपटाला विरोध केला. या विरोधाचे कारण म्हणजे चित्रपटात पद्मावती राणीचे पात्र साकारणाऱ्या दिपिका पदुकोण या अभिनेत्रीचे उघडे दिसणारे पोट!

राजपूत अस्मिता असलेल्या पद्मावतीचे अंग उघडे दिसणे कर्णी सेनेला मान्य नव्हते. वास्तविक चित्रपटात एखाद्या पात्राला वेगळे दाखवल्याने त्या पत्राची गरिमा कमी होते किंवा अपमान होतो का? हा वेगळा चर्चेचा विषय आहे. पण कर्णी सेनेचा विरोध लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांना त्यासमोर झुकावे लागले हे सत्य नाकारता येत नाही.

 

Ghoomar-inmarathi
bollywoodlife.com

तर, या विरोधानंतर कथित दृश्यातील आक्षेपार्ह भाग प्रसिध्द VFX तंत्रज्ञान वापरून काढून टाकण्यात आला आहे. अनेकदा चित्रित दृश्यात काही बदल करायचे असतील तर हे तंत्रज्ञान वापरण्यात येते.

नक्की काय असते VFX तंत्रज्ञान?

बऱ्याच चित्रपटातील दृश्ये पाहून आपण आश्चर्यचकित होतो. “हे असच्या असं प्रत्यक्षात कसं घडलं असेल?” हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. बाहुबलीची पर्वत चढून जाण्याची किमया, हिरोच्या लाथेसरशी हवेत दहा दहा फूट उंच उडणारे लोक, अनेक हॉलीवूडपटात अक्राळविक्राळ दिसणारे अवाढव्य प्राणी आणि पद्मावत मधल्या चित्रित झालेल्या दृश्यात हवा तो बदल! हे सगळं शक्य होतं VFX ग्राफिक्स आणि थ्री डी अनिमेशन च्या अद्ययावत तंत्रामुळे.

VFX तंत्रज्ञानाची ताकद आपल्याला अनेक हॉलीवूडपटात पाहायला मिळाली आहे. त्यापैकी काही चित्रपटातील ही दृश्ये पहा.

१.

deadpool-2-vfx-inmarathi

 

 

2.

deadpool-4-vfx-inmarathi03
foxmovies.com

 

३.

Guardians of the Galaxy-vfx-inmarathi
marvelous.ru

 

४.

The Matrix-vfx-inmarathi
warnerbros.com

 

VFX म्हणजे काय?

चित्रपट निर्मितीच्या तंत्रज्ञानात एखाद्या चित्रित दृश्यात त्यात नसलेल्या गोष्टी बाहेरून इन्सर्ट करून त्या खऱ्या असल्याप्रमाणे म्हणजेच मूळ चित्रीकरणात असल्याप्रमाणे भासवणे यालाच VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) असे म्हणतात. कम्प्युटरवर बनवली गेलेली प्रतिमा चित्रित दृश्यात बेमालूमपणे बसवून आणि विशेष म्हणजे ते दृश्य वास्तववादी वाटावे अशा पद्धतीने बसवून दाखवली जाते.

चित्रित करण्यास कठीण असणारी कोणतीही गोष्ट सत्य चित्रित केल्याप्रमाणे दाखवण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ पृथ्वीवर हल्ला करणारे मोठे प्राणी चित्रित करणे अशक्य आहे. म्हणून कथानकात मोठमोठ्या शहरांचा नाश होताना दाखवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. हे व्हिज्युअल इफेक्ट्स चे सर्वात प्रभावी उदाहरण आहे.

बरेचदा भव्य स्क्रीनवरील अगदी सूक्ष्म जागेत व्हिज्युअल इफेक्ट्स चा वापर केला जातो. तेच पद्मावत मध्ये केले आहे.

 

dipika-padmavati-vfx
i0.wp.com

दिपिका पदुकोणच्या आधीच चित्रित केल्या गेलेल्या एका दृश्यात ज्या ठिकाणी उघडा भाग दिसतो आहे तिथे हुबेहूब त्याच रंग आणि नक्षीची दुसरी इमेज तयार करून ती व्हिज्युअल इफेक्ट तंत्राच्या सहाय्याने बेमालूमपणे तेवढ्याच भागावर चिटकावण्यात आली आहे.

हे करण्याच्या आधी आणि करण्याच्या नंतर दृश्यात झालेला बदल सहज दिसून येत नाही किंवा तो भाग नंतर चिटकावण्यात आलेला आहे हे सहज लक्षात येत नाही ही VFX ची खरी खासियत आहे.

अशी कल्पना करा की एका छायाचित्रात तुम्हाला काही भाग काढून त्याजागी दुसरा भाग वेगळा बनवून टाकायचा आहे. हे सहज शक्य आहे. पण इथे काही भाग काढून जिथे टाकायचा असतो ते छायाचित्र नसते, तो व्हिडीओ असतो. त्यात असे करण्यासाठी अनेक सोफ्टवेअरचा वापर केला जातो. आणि अचूक पद्धतीने बनवलेली इमेज त्या चित्रित दृश्यात टाकण्यात येते.

VFX तंत्रज्ञानामुळे मूळ चित्रित दृश्यात किती परिणामकारक बदल केले जाऊ शकतात हे सांगणारा जुना लेख: स्पेशल इफेक्टशिवाय तुमचे आवडते चित्रपट कसे दिसले असते

इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

सिनेमात भासमान वातावरण तयार करण्यासाठी, भव्यता आणण्यासाठी, आणि त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. पण आपल्याकडे पद्मावत च्या बाबतीत त्याचा वापर चित्रित दृश्यात काही भाग झाकण्यासाठी करण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करायचा हे त्या त्या समूहाने स्वतः ठरवायचे असते. आपल्याकडे तूर्तास तो खवळलेली अस्मिता शांत करण्यासाठी झाला आहे हे विसरून चालणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?