' भारतात आई-वडिलांनी "टाकून दिलेला" मुलगा झालाय स्वित्झर्लंडच्या संसदेचा सदस्य, वाचा!

भारतात आई-वडिलांनी “टाकून दिलेला” मुलगा झालाय स्वित्झर्लंडच्या संसदेचा सदस्य, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम

===

एक मुलगा ज्याचा जन्म भारतात होतो, पण काही कारणांमुळे त्याची आई त्याला स्वतःपासून दूर सारते. त्यानंतर त्या मुलाला एक विदेशी जोडपं दत्तक घेत आपलं मानत. ते जोडपं त्याला घेऊन विदेशात निघून जातं.

 

adopt a child in india InMarathi

ते त्या मुलाच्या संगोपनात काहीही कमी ठेवत नाही. हलाखीची परिस्थिती असताना देखील त्याच्यासाठी ते सर्वकाही करतात ज्याने तो त्याच्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती होऊ शकेल. काही वर्षांनी तो मुलगा मोठा होतो. त्या देशाच्या प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक होतो. घवघवीत यश संपादन करतो.

त्यानंतर तो एका सभेला संबोधित करताना स्वतःच अस्तित्व सांगतो, की कश्याप्रकारे त्याच्या जन्मानंतर त्याला त्याच्या आईपासून दूर व्हावं लागलं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात एक जोडपं आलं, ज्यांनी त्याला पोटच्या पोराप्रमाणे मोठं केलं आणि एवढा संघर्ष केल्यावर तो कश्याप्रकारे आज ह्या ठिकाणी येऊन पोहोचला…

niklaus-samuel InMarathi

ही कहाणी तुम्हाला नक्कीच एखाद्या चित्रपटाच्या कहाणी प्रमाणे वाटली असेल… पण ही कुठलीही कहाणी नसून एका व्यक्तीचा जीवन प्रवास आहे. ज्याने हे सर्व बघितलं आहे, अनेकदा कठीण परिस्थितीशी झुंज देत आज तो स्वित्झर्लंडच्या संसदेत सांसद म्हणून निवडून आला आहे.

 

Niklaus-Samuel 1 InMarathi

 

हे व्यक्तिमत्व म्हणजेच निकलॉस-सैमुअल गगर!

निकलॉस यांचा जन्म १ मे १९७० साली कर्नाटकच्या सीएसआई लोम्बार्ड मेमोरियल रुग्णालय येथे झाला. हे रुग्णालय Basel Mission द्वारे चालवले जात होते. निकलॉस यांच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर त्यांना एका स्वीस जोडप्याने दत्तक घेतले. जेव्हा लहानग्या निकलॉसचे नवीन पालक फ्रित्ज आणि एलिजाबेथ त्याला घेऊन केरळला गेले, तेव्हा तो केवळ १५ दिवसांचा होता.

 

niklaus samuel with mother Inmarathi

त्यानंतर ४ वर्ष ते येथेच राहिले. ४ वर्षानंतर त्यांचे कुटुंब स्वित्झर्लंड येथे परत गेले. निकलॉस यांना एक चांगले जीवन, शिक्षण देण्याकरिता त्यांच्या पित्याने तेथे ट्रक ड्रायव्हर आणि माळी म्हणून देखील काम केले.

पिआईओ-संसदीय संमेलनात IANS शी बोलताना त्यांनी सांगितले की,

“माझी आई अनसूया ने माझ्या जन्मानंतर मला डॉक्टर ईडी पीफ्लगफेल्डर यांच्या हवाली केले आणि त्यांना विनंती केली की मला एका अश्या जोडप्याला देण्यात यावे जे मला चांगल करिअर घडविण्यात मदत करतील.”

 

swiss parlimentarian InMarathi

निकलॉस यांना Nik म्हणून देखील ओळखले जाते. स्वित्झर्लंडच्या संसदेत बोलताना निकलॉस म्हणाले की,

“मी माझं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक सामाजिक कार्यांत देखील सहभाग घेतला आहे. त्यांनंतर ते २००२ साली Winterthur शहराचे महापौर म्हणून निवडले गेले. २०१७ साली एंजेलिकल पीपल्स पार्टी तर्फे अल्पसंख्यांक दलाच्या तिकीटवर स्वित्झर्लंडच्या संसदेमध्ये संसदसदस्य म्हणून निवडले गेलेले ते पहिले भारतीय आहेत.”

 

swiss parlimentarian 2 InMarathi

तसेच स्वित्झर्लंडमध्ये भारतीय वंशाचा नेता सक्रीय नसल्याने, पुढील एक दशकापर्यंत ते स्वित्झर्लंडच्या संसदेत सहभागी असणारे ते एकमेव भारतीय असणार आहेत. ते स्वित्झर्लंडच्या संसदेत सहभागी होणारे सर्वात कमी वयाचे संसद आहेत.

swiss parlimentarian 1 InMarathi

 

निकलॉस यांनी १९९२-१९९३ सली अमेरिकेच्या कोलंबिया शहरातील एका अनाथालयात देखील काम केले आहे.

ते त्यांच्या ह्या यशाचे श्रेय आपल्या जन्मदात्या आईला देतात. पण ते त्यांच्या आईला भेटू शकले नाही म्हून त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलीचे नाव त्यांच्या आईच्या नावावरून ठेवले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?