' भारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत? जाणून घ्या यामागची कारणे.. – InMarathi

भारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत? जाणून घ्या यामागची कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लग्नामुळे दोन जीव एका बंधनामध्ये बांधले जातात, असे म्हटले जाते. काहींना लग्न हा प्रकार आवडतो, तर काहींचे याबद्दल थोडे वेगळे मत आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करून माणूस स्वतःवर बंधने लादून घेतो आणि लग्नामुळे उगाचच त्याच्यावर अनेक जबबाबदाऱ्या पडतात.

पण लग्नाबद्दल नकारात्मक मत असलेल्या लोंकाना घरच्यांच्या दबावामुळे किंवा समाजामुळे लग्न हे करावेच लागते.

असो, लग्न करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, असे म्हटले जाते. पण अशी कितीतरी मोठी यशस्वी माणसे आपल्या समाजामध्ये आहेत, ज्यांनी लग्नच केलेलं नाही!

 

unmarried-people-inmarathi
youtube.com

आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमावणारी माणसे आपल्या विचारामुळे आणि कलागुणांमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, उद्योगपती रतन टाटा, बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे भारतामधील प्रसिद्ध लोकांपैकी काही आहेत. पण एवढे यश मिळवून देखील काही कारणांमुळे ते अजूनही अविवाहित आहेत.

राजनैतिक सेवा संकल्पामुळे राहिले जीवनभर अविवाहित

 

Atal Bihari Vajpayee.Inmarathi
ndtvimg.com

भारतीय राजकारणाच्या इतिहासात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक कुशल राजकारणी, भाषाशास्त्रज्ञ, कवी आणि पत्रकाराच्या रूपात ओळखले जाते. ते एक असे नेते आहेत, ज्यांचा जनतेबरोबरच प्रत्येक पार्टीचे लोक सन्मान करतात. पण त्यांनी आजपर्यंत लग्न केलेले नाही, ते आजीवन अविवाहितच राहिले. असे म्हटले जाते की, अटल बिहारी वाजपेयी यांनी समाजाच्या सेवेची शपथ घेतल्यामुळे ते जीवनभर अविवाहित राहिले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (आरएसएस) जीवनभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता.

यशस्वी होण्यासाठी लग्न केले नाही.

 

abdul-kalam-marathipizza01
bimtech.ac.in

लहान मुलांचे नेहमी आवडीचे राहिलेले माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या विचारांमुळे लोकांच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. ते एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ तर होतेच, पण आपल्या शांत स्वभावामुळे सर्वांचे आवडते देखील होते. एका पुस्तकामध्ये त्यांनी लग्न न करण्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी त्यामध्ये सांगितले की,

जर त्यांनी लग्न केले असते, तर कदाचित ते त्यांनी मिळवलेल्या यशापेक्षा अर्धे देखील यश मिळवू शकले नसते. ते आपल्या कामाला नेहमी सर्वोच्च स्थान देत असत.

व्यस्त जीवनशैलीमुळे लग्न करायला विसरले.

 

Salman-Khan-inmarathi02
vogue.in

बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला दबंग अभिनेता सलमान खान आपल्या अभिनयासाठी सगळीकडेच प्रसिद्ध आहे. खूप लोक सलमानच्या चित्रपटांचे वेडे आहेत. सलमान खान हा भारतातील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानला जातो. त्याच्याशी लग्न करण्यासाठी कितीतरी मुली तयार आहेत. त्याचे नाव कितीतरी लोकप्रिय अभिनेत्रींशी जोडले गेले.

पण सलमान तरी देखील अजून अविवाहित आहेत.  त्याचे कारण त्यांची व्यस्त जीवनशैली आहे. सलमानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, भारतामध्ये आई-वडील मुलांचे वय ३० होण्याअगोदरच त्यांचे लग्न करून देऊ इच्छित असतात. पण तो लग्न करू शकला नाही. त्याने सांगितले की,

“ज्याप्रमाणे मी  लागोपाठ काम करत चाललो आहे, तसा मी लग्नाला पाठीमागे सोडत चाललो आहे.”

चार वेळा लग्न ठरले, पण तरीही अविवाहित राहिले.

 

Ratan Tata
knowstartup.com

प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटाने एका टॉक शोमध्ये कधीही लग्न न करण्याच्या निर्णयावर बोलले. त्यांनी सांगितले की, ते चार वेळा लग्न करण्याच्या जवळपास पोहोचलेच होते. पण शेवटच्या वेळी ते काही कारणांमुळे घाबरले आणि लग्न करायला त्यांनी नकार दिला. रतन टाटा यांनी सांगितले की, त्यांना लग्न न करण्याच्या निर्णयावर कधीही पश्चात्ताप झाला नाही.

श्रीमंत होण्याच्या इच्छेमुळे अजूनपर्यंत  अविवाहित आहेत.

 

India's Famous bachelors.Inmarathi
biographia.co.in

बॉलिवूडमध्ये प्यार के साइड इफेक्ट्स, झंकार बिट्स, मान गये मुग़ल-ए-आज़म अशा चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता राहुल बोस अजूनपर्यंत अविवाहित आहे. त्याने लग्न न करण्याच्या त्याच्या निर्णयावर सांगितले की,

“मी खूप कुरूप आहे, त्यामुळे माझ्या जीवनात कुणीही मुलगी नाही आहे.”

त्याने सांगितले की, लग्नासाठी मुलगी शॊधण्यासाठी त्याला खूप श्रीमंत व्हावे लागेल.

अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांमुळे या दिग्गज माणसांनी आजपर्यंत लग्न केले नाही आणि जीवनभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?