' राष्ट्रपती भवन: काही विलक्षण गोष्टी, भारतातील सर्वात मोठ्या निवासी इमारतीबद्दल!

देशाच्या राजकारणात अलौकिक महत्व असलेल्या या इमारतीबाबत काही खास गोष्टी जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारताचे राष्ट्रपती जेथे वास्तव्यास असतात त्याला राष्ट्रपती भवन म्हटले जाते.

३२० एकर जमिनीवर पसरलेली ही भव्य वास्तू पाहताच डोळ्याचे पारणे फिटते. याच राष्ट्रपती भवनाबद्दल अश्या काही गोष्टी आहेत ज्या बहुधा तुम्हा-आम्हाला माहित नाहीत, चला तर मग जाणून घ्या:

 

rashtrapati-bhavan-marathipizza01

स्रोत

 • जगात जितकी भलेमोठी राष्ट्राध्यक्षांची निवासे आहेत त्यापैकी एक आपले राष्ट्रपती भवन आहे.

 

 • १९५० पर्यंत या भवनाला ‘वॉईसरॉय हाउस’ म्हणून ओळखले जायचे. पूर्वी येथे भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलचे वास्तव्य असायचे.

 

 • राष्ट्रपती भवन बांधण्यास तब्बल १७ वर्षे लागली. १९१२ मध्ये सुरु झालेले बांधकाम १९२९ मध्ये पूर्ण झाले.

 

 • या भवनामध्ये ३०० हून अधिक कक्ष आहेत.

 

rashtrapati-bhavan-marathipizza02

स्रोत

 • ब्रिटीश वास्तुकार सर एडविन लॅन्डसियर ल्युटन्स यांच्या अफलातून डोक्यातून या भवनाचा आराखडा उभा राहिला होता.

 

 • राष्ट्रपती भवनाच्या बांधकामामध्ये ७०० दशलक्ष विटा आणि ३ दशलक्ष क्युबिक फिट दगडांचा वापर केला गेला होता.

 

 • या बांधकामासाठी २९,००० कामगारांनी कष्ट घेतले होते.

 

 • या भवनाच्या बांधकामामध्ये लोखंडाचा तसूभरही उपयोग करण्यात आलेला नाही!

 

 • भारतातील सर्वात मोठी निवासी इमारत आहे ‘राष्ट्रपती भवन’

 

rashtrapati-bhavan-marathipizza03

स्रोत

 • येथील मुघल उद्यानामधील गुलाब वाटिकेमध्ये विविध प्रकारची दुर्मिळ गुलाबे आढळून येतात. ही वाटिका पर्यटकांसाठी फेब्रुवारी महिन्यात उघडली जाते.

 

mughal-garden-rashtrapati-bhavan-marathipizza

स्रोत

 • एका अहवालानुसार भारत सरकार राष्ट्रपती भवनाच्या देखरेखीसाठी दरवर्षी जवळपास १०० करोडचा खर्च करते.

 

 • राष्ट्रपती भवनामध्ये सध्या ७५० कर्मचारी काम करतात.

 

rashtrapati-bhavan-marathipizza04

स्रोत

 • राष्ट्रपती भवनाच्या गिफ्ट म्यूझियममध्ये किंग जॉर्ज पाचवा याची चांदीची खुर्ची ठेवलेली आहे, जीचे वजन तब्बल ६४० किलो इतके आहे.

 

 • ‘फना’ या हिंदीचित्रपटातील प्रसिध्द अश्या ‘मेरा देस रंगीला’ या गाण्याचं चित्रीकरण रंगीत तालमीसह राष्ट्रपती भवनातच करण्यात आलं होतं.

 

rashtrapati-bhavan-marathipizza05

स्रोत

 • विशेष बाब ही की पूर्वी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती भवनाच्या उभारणीसाठी १७ वर्षांचा कालावधी लागला होता आणि निर्माण झाल्यानंतर बरोबर १७ वर्षेच हे भवन ब्रिटीश सत्तेखाली राहीले! १८ व्या वर्षी ते स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली आले…!

 

 • भारताचे पहिले गव्हर्नर जनरल श्री. सी. राजगोपालाचार्य यांना येथील मुख्य शयन कक्षाचा थाटमाट जास्त रुचला नाही आणि म्हणून त्यांनी गेस्ट रूममध्ये आपले बस्तान हलवले. त्यांच्यानंतर आलेल्या इतर राष्ट्रपतींनी देखील एका परंपरेप्रमाणे गेस्ट रूममध्येच वास्तव्य केले.

 

rashtrapati-bhavan-marathipizza06

स्रोत

काही वस्तू भारतीय मानचिन्ह म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यातलीच एक म्हणजे आपलं राष्ट्रपती भवन.

संधी मिळाली तर या भव्य दिव्य वास्तूला नक्की भेट द्या…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?