' कोट्यावधींची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे CEO पाळतात “ही” खास दिनचर्या.. – InMarathi

कोट्यावधींची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे CEO पाळतात “ही” खास दिनचर्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यश! जाणत्या वयापासून उतरत्या वयापर्यंत ज्या गोष्टीसाठी माणूस अविश्रांत धडपड करत असतो ते म्हणजे यश. प्रत्येकाची यशाची संकल्पना वेगळी असेल, प्रत्येकाचे ध्येय वेगळे असेल, पण आपण ठरवलेल्या ध्येयाप्रत पोहोचायचं आणि आपण ‘यशस्वी’ आहोत हे जगाला दाखवून द्यायचं ही प्रत्येकाचीच इच्छा असते.

पण यशस्वी होणं हे आता तितकं सोपं राहिलेलं नाही हे आपण जाणतोच. कारण यशस्वी व्हायचं असेल तर आपण जिथे कुठे आहोत त्या क्षेत्रात शिखरावर पोहोचावं लागणार!

 

success-inmarathi

 

आणि त्या शिखरापर्यंतचा प्रवास करताना सामना करावा लागतो असंख्य आव्हानांचा. कोणत्याही क्षेत्रात पिरामिडची एक एक शिडी चढत जाताना एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होत जाते, ती गोष्ट म्हणजे जसजसे आपण वर जात असतो तसतशी दाटी आणि स्पर्धा दोन्ही वाढत जातात. सगळ्यांनाच वरच्या पायरीवर जागा मिळणे कठीण होते.

आता ही जागा मिळवून आणि टिकवून ठेवायची तर आपलं वेगळेपण सिद्ध केलं पाहिजे. आपलं वेगळेपण सिद्ध करता येणं हीच यशाची पहिली पायरी आहे.

पण हे करायचं म्हणजे प्रत्येक बाबतीत जागृत असायला हवं. शिक्षण, शारीरिक क्षमता या सर्वात महत्वाच्या गोष्टी. आणि या गोष्टीत सुसंगती आणायची असेल तर सर्वात आधी सुधारणा करावी लागेल ती रोजच्या दिनचर्येत.

यशस्वी व्हायचे असेल तर ही रोजची दिनचर्या कशी असावी? सांगत आहेत ‘ओएलएक्स’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमरजित सिंग बात्रा.

 

amarjeet-inmarathi

 

आपल्या कर्तृत्वाच्या आणि झोकून देऊन काम करण्याच्या बळावर अमरजित यांनी त्यांच्या कंपनीला भारतातील नामांकित ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर नेऊन बसविले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लाईफ हॅकरच्या इशिता ब्लागन यांना दिलेल्या या विशेष मुलाखतीत अमरजित त्यांच्या यशस्वी होण्यामागचे रहस्य सांगत आहेत.

प्रश्न: सर्वप्रथम मला सांगा की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, आणि आपण सध्या ज्या ठिकाणी आहात तिथपर्यंत आपण कसे पोचलात?

उत्तर:

माझा प्रवास तसा खूप मोठा आहे पण त्याचे दोन भाग करता येतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक. माझे वडील सैन्यात होते. त्यामुळे लहानपणापासून भारताच्या विविध भगत मी राहिलो आहे. मी मुळचा पंजाबचा असलो तरी मध्य प्रदेशात जबलपूर येथे मी जास्त काळ राहिलो आहे. चंडीगडमधील लुधियानातून मी कार्यालयीन जीवनाला सुरुवात केली.

२००० साली मी इंटरनेटच्या विश्वात पहिल्यांदा आलो. हे वर्ष इंटरनेटचे होते. बी टू बी (बिजनेस टू बिजनेस) जागेत बाजारपेठ बनवून मी माझा प्रवास सुरू केला. त्यानंतर Ebay ने विकत घेतलेल्या Bazee या कंपनीसाठी काम केले. आणि हे करत असतानाच ऑनलाईन मार्केट जगभरात कसे काम करते हे मी शिकलो.

२००८ साली मी OLX कंपनीत गेलो आणि तेव्हापासून मी भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन मार्केटप्लेसवर खरेदी विक्री करण्यासाठी लोकांना मदत करत आहे.

 

 

OLX

 

प्रश्न: असे कोणते अॅप, साधने किंवा सोफ्टवेअर आहेत ज्यांच्याशिवाय तुमचा एकही दिवस जात नाही?

उत्तर:

ट्विटर! या मायक्रोब्लॉगिंग सोशल साईटवर माझ्या आवडीचे लेख सापडतात आणि ही साईट मला जगभरातील सर्व बातम्या देऊन अद्ययावत ठेवते. बऱ्याचदा मी वृत्तपत्र वाचत नाही कारण त्यात मिळणारी माहिती मला आधीच ट्विटरवर मिळालेली असते.

मला ज्यांच्यात स्वारस्य आहे अशा लोकांना फॉलो करण्यासाठी आणि माझ्याबद्दल इतर लोकांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त साईट आहे. आणि दुसरी म्हणजे OLX.

हे आधी कोणीतरी वापरलेल्या वस्तू ऑनलाईन खरेदी आणि विक्रीसाठी असलेले अत्यंत लोकप्रिय एॅप आहे.

मी नुकतेच OLX वर एक टेनिस रॅकेट विकत घेतले आणि माझ्याकडे असलेली जुनी सायकल विकली. मी OLX साठी आमच्या इंटर्नल  सोशल नेटवर्कवर पूर्णपणे अवलंबून आहे. त्यालाच आम्ही ‘लाइव्ह आयटी’ म्हणतो. तिथून मी माझ्या जगभरातील सहकार्यांशी एकाच वेळी संपर्क साधू शकतो. त्यातून कामाबद्दल बरेच शिकायला मिळते.

प्रश्न: आपल्या कार्यालयाचे सेटअप कसे आहे?

मला रंग आवडतात. त्यातल्या त्यात निळा रंग विशेष. सुदैवाने आमच्या ब्रंडमध्ये तीन रंग आहेत. नारंगी, हिरवा आणि जांभळा. भगवा रंग म्हणजे उर्जा. एकतेची शक्ती. आमच्या लोगो मधला हिरवा रंग पर्यावरणाचे प्रतिक आहे.

जांभळा रंग OLX सारख्या प्रीमियम प्लॅटफॉर्मचे  अपील सूचित करतो.

 

amarjeet-office-inmarathi

 

तसेच मला काम करण्याचे ठिकाण नेहमी टापटीप आणि आवरलेले पहायला आवडते. आधीच आपलं आयुष्य गुंतागुंतीचं असतं. किमान तुमची काम करण्याची जागा तरी मोकळी असावी.

 

प्रश्न: वेळ वाचवण्याची तुमची सर्वोत्तम युक्ती कोणती आहे?

कामाच्या ठिकाणी जाण्यापेक्षा घरी काम करून प्रवासात जाणारा वेळ वाचवणे ही माझी नेहमीची युक्ती आहे. दोन तीन वर्षे सलग मी घरून काम केलंय. मी एकतर काम लवकर सुरू करतो आणि तरी उशिरा संपवतो. त्यामुळे घरून काम करण्याची पद्धत मला योग्य वाटते.

हळूहळू मी टीम उभी केली आणि मग ऑफिस घेतले. अजूनही वीकेंडला मी बऱ्याचदा घरून काम करतो.

आणखी एक म्हणजे ऑफिसला लवकर पोहोचणे. आमच्या ऑफिसची उघडण्याची ठरलेली वेळ साडेनऊ ची आहे. मी त्याच्या आधी एक तास म्हणजे साडे आठलाच ऑफिसला पोहोचतो.

त्यामुळे सकाळी घरातून लवकर निघावं लागतं. लवकर निघालो की, लोकांची नेहमीची ऑफिसची वेळ असते त्यावेळी होणारं ट्राफिक जाम टाळता येतं. हा जास्तीच्या फायदा असतो. आणि त्यातल्या त्यात गाडी चालवायला कुणी असेल तर उत्तम. म्हणजे तोही वेळ वाचनासाठी वापरता येतो. गप्पा नाही, फोन कॉल नाही, चर्चा होत नाहीत, आपण जे वाचत असतो त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं. 

महत्वाचं म्हणजे मी पार्टीला सहसा जात नाही.

सोशल लाईफ इतकं मोठ असताना आणि दिवसभरात तुम्ही इतक्या लोकांना भेटत असताना पार्टी सारख्या गोष्टी टाळल्या तर तुमच्या सार्वजनिक जीवनात फारसा फरक पडत नाही. हा उरलेला वेळ तुम्ही कुटुंबासोबत किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात घालवू शकता.

 

प्रश्न: आपल्या फोन आणि संगणकाव्यतिरिक्त, कोणते गॅझेट आणि गोष्टी आहेत ज्याशिवाय आपण काम करू शकत नाही?

मला वाचन आवडते. पुस्तके वाचण्याकरिता Kindle माझ्यासोबत नेहमीच असते. तसेच, आयपॅड खूप महत्वाचा आहे कारण मी दस्तऐवज आणि पीडीएफ वाचण्यासाठी फोनच्या छोट्या पडद्यापेक्षा आयपॅडला प्राधान्य देतो.

 

AmarJeet Singh OLX Inmarathi

 

मी माझ्या स्क्वॅश रॅकेटशिवाय जगू शकत नाही. स्क्वॅश म्हणजे माझा जीव की प्राण आहे.

प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही इतरांपेक्षा उत्तम करू शकता?

उत्तर:  

इतरांशी जास्त स्पर्धा करण्यापेक्षा मी काल जितका चांगला होतो, त्यापेक्षा मला अधिक चांगला व्हायचे आहे याबद्दल जास्त आग्रही असतो. जर तुम्ही स्वतःमध्ये आवश्यक सुधारणा केल्या नाही तर व्यवसाय टिकवणे अवघड आहे.

‘चांगले’ होण्याचे तत्त्वज्ञान हेच आहे की शक्य तेवढ्या नवीन गोष्टी शिका. आणि इतरांनी केलेली टीका सकारात्मक दृष्टीकोनातून घ्यायला शिका.

त्याच वेळी, फोकस अतिशय महत्वाचा आहे. आम्ही रोजच्या जीवनात इतक्या मोठ्या गोष्टींशी संपर्क साधतो की आम्हाला काम करण्याच्या चांगल्या संधीं नेहमी चालून येत असतात. त्यामुळे मन सहज विचलित होऊ शकते.

म्हणून, लक्ष्य सेट करणे आणि त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वपूर्ण आहे. आपण लक्ष्य निश्चित न केल्यास, आपण ते प्राप्त करू शकत नाही. 

 

too-many-goals-med-web inmarathi

 

अखेरीस, प्रत्यक्षात तुम्ही किती प्रगती करत आहात हे जाणून घेण्यासाठी अभिप्राय आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात, कुटुंबातील आणि कामाच्या जीवनात मिळालेले अभिप्राय, सहकार्यांपासून मिळालेले अभिप्राय आपल्या कमतरतेच्या स्थळांना प्रकाशात आणतात. आपल्यापैकी बहुतेक जण स्वत: ला खूप जास्त किंवा फारच कमी लेखून बसतात, म्हणून अभिप्राय महत्वाचा आहे

प्रश्न: कामाचा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही काय करता?

उत्तर:

काम म्हणजे माझ्यावर जास्तीचे ओझे नाही. मी ज्या कामावर प्रेम करतो तेच मी सध्या करत आहे. काम, कुटुंब आणि वैयक्तिक शारीरिक तंदुरुस्ती यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.

एका गोष्टीवर जास्त लक्ष देऊ नका आणि बाकी सगळीकडे दुर्लक्ष करू नका. 

जेव्हा मला वाटते की मला स्वतःला रिचार्ज करण्याची गरज आहे तेव्हा मी खेळ खेळतो. मी स्क्वॅश खेळतो. खेळ आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवितात.

 

Playing Squash Inmarathi

 

 

हे ही वाचा – हीच वाईट सवय मराठी माणसाला श्रीमंत होण्यापासून थांबवते!

प्रश्न: आपण सध्या काय वाचत आहात? 

उत्तर: मी एकाच वेळी अनेक पुस्तके वाचतो. व्यवसायाशी संबंधित अनेक लेख वाचतो. सध्या मी Who Gets What – and Why हे पुस्तक वाचतोय. मार्केट कसं काम करत हे सांगणारे हे एक सुंदर पुस्तक आहे. लेखक एल्विन ई रोथ असे वर्णन करतो की प्रत्येक गोष्ट म्हणजे बाजारपेठ. तो म्हणतो, “जरी स्वर्गात सामने असतील तरीही ते बाजारपेठांमध्ये सापडतील”, जे सत्य आहे. 

तुम्हाला असे दिसून येईल की बाजारपेठ सर्व गोष्टी नियोजित करत आहेत.

हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन असू शकते. मी वाचत असलेल्या पुस्तकांपैकी आणखी एक पुस्तक म्हणजे ‘स्पीड ऑफ ट्रस्ट: द वन थिंग टू चेंज एव्हरीथिंग’ हे स्टीफन कोवी याचे पुस्तक. निर्णय घेण्याचे कौशल्य वाढविण्यासाठी, आणि कार्यशीलतेत सुधारणा करण्यासाठी हे एक उत्तम पुस्तक आहे.

 

amarjit-batra-inmarathi

 

प्रश्न: आपण प्राप्त केलेला सर्वोत्कृष्ट सल्ला काय आहे?

उत्तर:

२००५ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात ११५ व्या पदवीधर वर्गासाठी प्रारंभाचे भाषण दिले. त्यात त्यांनी म्हटले की,

“Stay Hungry, Stay Foolish”!

मी त्यांचे भाषण १० वेळा ऐकले. ते संपूर्ण भाषण माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. OLX या कंपनीत ८ वर्षांपासून आलो आहे आणि प्रत्येक दिवशी माझे स्वतःला आव्हान असते की आज काहीतरी जास्त देऊन जायचे आहे. 

 

 

Steve Jobs inMarathi

 

आमच्या व्यवसायात नवीन गोष्टी अनेकदा दिसतात आणि सतत शिकणे महत्वाचे असते, जरी काही वेळा आपण अडखळलात तरीही! माझ्या आयुष्यात स्टीव्ह जॉब्सचा सल्ला हा सर्वोत्तम सल्ला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – श्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे फार काही नको – फक्त ह्या १३ क्वॉलिटीज असायला हव्यात!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?