'महासागरांच्या संगमावर पाणी एकत्र होत नाही - चुकीची माहिती - क्षमस्व!

महासागरांच्या संगमावर पाणी एकत्र होत नाही – चुकीची माहिती – क्षमस्व!

संपादकीय सूचना :

फॅक्टचेकर वेबसाईट “फॅक्ट क्रेसेंडो” यांनी निदर्शनास आणून दिलेल्या तथ्यानुसार सदर लेखात प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची होती.

फॅक्ट क्रेसेंडोवरील माहितीनुसार :

अलास्काच्या खाडीत हिंदी व प्रशांत महासागराचा संगम होत नाही. ग्लेशियरच्या पाण्यातील गाळ, क्षार, तापमान आणि घनता यामुळे तेथील पाण्याचा रंग काही काळासाठी वेगळा दिसतो. ते पाणी काळानुरूप प्रशांत महासागराच्या पाण्यात मिसळून जाते. त्यामुळे इन मराठी वेबसाईटवरील लेखात दिलेली माहिती असत्य ठरते.

फॅक्ट क्रेसेंडो वरील संपूर्ण तथ्य पडताळणी येथे वाचता येऊ शकेल : अलास्काच्या खाडीमध्ये खरंच दोन महासागरांचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? वाचा सत्य

सदर चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल फॅक्ट क्रेसेंडो टीमचे आभार.

InMarathi.com तर्फे सदर मजकूर काढून टाकण्यात आला असून, सदर चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत.

वाचकांन आमच्याकडून विश्वसनीय माहितीच पुरवली जावी यासाठी आम्ही नेहेमीच प्रयत्न करत असतो. यापुढे कटाक्षाने काळजी घेतली जाईल.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?