' चलनातील नाण्यांचा आकार सतत छोटा होत जाण्यामागे “हे” कारण आहे – InMarathi

चलनातील नाण्यांचा आकार सतत छोटा होत जाण्यामागे “हे” कारण आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कुठल्याही प्रकारच्या व्यवहारासाठी आपल्याला पैशांची  गरज भासते. या चलनात जेवढी भूमिका नोटांची आहे, तेवढीच भूमिका नाण्यांची आहे. त्यामुळे नाणी देखील नोटांच्या इतपतच गरजेची आहेत.

नोटबंदीनंतर आता लवकरच नाणी बंद होणार आहेत, असा काही लोकांचा समज झालेला आहे, त्यामुळे लोक नाणी सांभाळून ठेवत नाही आहेत.

सरकारने नाणी तयार करण्याचे बंद केलेले आहे हे खरे, पण ते यासाठी कारण, सरकारकडे सध्या जवळपास लाखांच्या घरात नाणी आहेत. त्यामुळे ही नाणी सर्क्युलेट होईपर्यंत नाणी तयार करणे बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

भारतीय रिजर्व  बँक ही भारताची सर्वात मोठी मुद्रण संस्था आहे. आरबीआय नवीन नोटांची छपाई  देखील करते आणि त्या नोटांना संपूर्ण देशामध्ये इतर बँकांच्या माध्यमातून वितरित करते.

आरबीआय देशातील अर्थव्यवस्थेच्या मुद्रेच्या पूर्तीला नियंत्रित करते.

जर देशामध्ये चलनाचा पुरवठा जास्त असेल, तर पॉलिसी रेट जसे, रोख राखीव प्रमाण (CRR ), बँक रेट आणि रेपो रेटमध्ये वाढ करून त्या चलनाला अर्थव्यवस्थेतून बाहेर काढले जाते आणि जर पुरवठा वाढवायचा असेल तर मुख्य पॉलिसी रेटला कमी केले जाते.

 

Why size of the coin is decreasing.Inmarathi

 

तुम्हाला हे माहित आहे का ? की आपल्या देशात नाण्यांचा पुरवठा कोण करते?

भारतामध्ये एक रुपयांची नोट सोडता, इतर सर्व नोटांची छपाई आरबीआय करते. पण १ रुपयाची नोट आणि इतर सर्व नाण्यांना तयार करण्याची जबाबदारी वित्त मंत्रालयाकडे आहे.

खरेतर वित्त मंत्रालय एक रुपयाची नोट आणि नाण्यांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आयआरबीच्या माध्यमाने वाटप करते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद, नोएडा या चार ठिकाणी आपल्या भारतात वापरली जाणारी नाणी तयार केली जातात.

मुंबई आणि कोलकत्ता मिंटची स्थापना इंग्रजांनी १८२९ मध्ये केली होती, तसेच हैदराबाद मिंटची स्थापना  हैदराबादच्या  निजामाने १९०३ मध्ये केली होती, ज्याला १९५० मध्ये भारत सरकारने आपल्या अधिपत्याखाली घेतले आणि यामध्ये १९५३ पासून नाणी भारत सरकारसाठी तयार करण्यास सुरुवात केली.

सर्वात शेवटच्या मिंटची स्थापना भारत सरकारने १९८६ मध्ये उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये केली होती आणि या ठिकाणी १९८६ पासून नाणी बनवण्यात येत आहेत.  नाण्यांवर असणाऱ्या चिन्हांवरुन तुम्ही ते नाणे कोणत्या मिंटमध्ये तयार केले आहे. ते ओळखू शकता.

 

Why size of the coin is decreasing1.Inmarathi

 

प्रत्येक नाण्यावर एक निशाण छापलेले असते, ज्यावरून ते कोणत्या मिंटमध्ये तयार केले आहे हे तुम्हाला समजू शकते. जर नाण्यांवर छापलेल्या तारखेच्या खाली एक स्टार दिसत असेल, तर ते चिन्ह हैदराबाद मिंटचे चिन्ह आहे.

नोएडा  मिंटमध्ये बनवल्या गेलेल्या नाण्यांच्या तारखेखाली एक डॉट असतो. मुंबईमध्ये तयार करण्यात आलेल्या नाण्यांवर डायमंडचे चिन्ह असते आणि कोलकत्तामध्ये तयार करण्यात येणाऱ्या नाण्यांवर कोणतेच चिन्ह नसते.

जेव्हा भारत सरकारकडे जास्त नाणी तयार करण्याची मशीन नव्हती, तेव्हा विदेशी टाकसाळीमध्ये भारताची नाणी तयार करण्यात आली आणि त्यांची आयात भारतामध्ये करण्यात आली होती.

भारताने १८५७ – ५८, १९४३, १९८५, १९९७ – २००२ या दरम्यान नाणी आयात केली होती. पहिल्यांदा नाणी ही कुप्रो निकेलने बनवण्यात येत होती.

पण २००२ नंतर जेव्हा  कुप्रो निकेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आणि नाणी बनवण्यासाठी लागणारा खर्च वाढला, तेव्हा भारत सरकारला  नाणी बनवण्यासाठी ‘फेरिटीक स्टेनलेस  स्टील’ चा वापर करावा लागला आणि आता देखील नाणी याच स्टीलने बनवली जातात. “फेरिटीक स्टेनलेस  स्टील” मध्ये १७ टक्के क्रोमियम आणि ८३ टक्के लोखंड असते.

नाण्यांचा आकार लहान का केला जातो ?

खरेतर कोणत्याही नाण्याच्या दोन व्हॅल्यू असतात. त्यातील एक असते नाण्याची फेस व्हॅल्यू आणि दुसरी त्याची मेटॅलिक व्हॅल्यू.

नाण्याची फेस व्हॅल्यू : या व्हॅल्यूचा अर्थ असा की, नाण्यावर जेवढे रुपये लिहिले आहेत तीच त्याची फेस व्हॅल्यू. म्हणजेच ज्या नाण्यावर २ लिहिले असेल, तर त्या नाण्याची फेस व्हॅल्यू २ असेल.

 

 

Why size of the coin is decreasing2.Inmarathi

 

नाण्याची मेटॅलिक  व्हॅल्यू : याचा अर्थ असा की, नाणे ज्या धातूचे बनलेले आहे, त्या नाण्याला वितळवल्यानंतर त्या धातूचा बाजारभाव किती असेल. ती त्या नाण्याची मेटॅलिक  व्हॅल्यू असते.

सरकार हा प्रयत्न करते की, कोणत्याही नाण्याची मेटॅलिक व्हॅल्यू ही त्याच्या फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असू नये, जेणेकरून लोक त्या नाण्याला वितळवण्याचा प्रयत्न करणार नाहीत.

यावरून तुम्हाला हे समजलेच असेल की, नाण्यांचा आकार हा सरकार कमी का करते.

पहिल्यांदा नाणी वितळवून त्यांच्या धातूंचा वापर करण्यात आल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळेच सरकार त्यांचा आकार कमी करत आहे. तसेच, नाण्यांचा आकार कमी केल्याने त्यांची निर्मिती करण्यासाठी येणारा खर्च देखील कमी होतो.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?