' हुतात्मा सैनिकांच्या कुटूंबासाठी या हॉटेलचा हा उपक्रम अनेकांना प्रेरणादायी आहे

हुतात्मा सैनिकांच्या कुटूंबासाठी या हॉटेलचा हा उपक्रम अनेकांना प्रेरणादायी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – विशाल दळवी 

भारताच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असणारा प्रत्येक सैनिक हा स्वत:च्या स्वार्थासाठी नाही तर देशाच्या नागरिकांसाठी अहोरात्र झटत असतो.

आपण घरी सुरक्षित वातावरणात रहात असलो, तरी आपल्यासाठी लाखो सैनिक दररोज मृत्युशी झुंज देतात ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असायलाच हवी.

एक नागरिक म्हणून या सैनिकांच्या प्रति आपली काही कर्तव्ये आहेत हे प्रत्येकाला समजायला हवं.

सैनिकांना उचित मान देणे, जागरूक राहुन देशाच्या सुरक्षिततेत हातभार लावणे अशी आपली अनेक कर्तव्ये आहेत. आपल्यापैकी बहुतांश सर्वजण या कर्तव्यांचे पालन करतच असतात.

परंतु काही लोक ह्या ‘कर्तव्यांच्या’ चौकटीपलीकडे जातात. सैनिकांबद्दलच प्रेम, निष्ठा, आदर या भावना केवळ विचारांपुरत्या मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष कृतीतून हा आदर दाखवतात. सैनिकांसाठी विशेष काहीतरी करतात.

रायपूरमध्ये असंच एक हॉटेल आहे जेथे एखाद्या हुतात्मा सैनिकाच्या कुटुंबाने भेट दिली तर खानपानाचे पैसे त्यांच्याकडून पैसे घेत नाही…!

 

neelkannth-hotel-marathipizza01

स्रोत

 

रायपुर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच वसलेल्या या हॉटेलचे नाव आहे नीलकंठ.

भारतीय सैनिकांच्या त्यागाचा खऱ्या मनाने सन्मान करणारं हॉटेल म्हणून हे हॉटेल प्रसिध्द आहे.

सुरवातीला केवळ पंचक्रोशित प्रसिद्ध असलेले हे हॉटेल उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर अधिक नावारुपास आले.

भारतीय सैनिकांच्या प्रति असलेला आदर दाखविण्यासाठी या हॉटेलकडून भरगोस सवलत देण्याचा निर्णय काही वर्षांपुर्वी घेण्यात आला.

या हॉटेलमध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ डिस्काउंट ऑफर दिली जाते. ज्यानुसार हॉटेलमध्ये खाण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही सैनिकाला बिलामध्ये भरघोस सूट दिली जाते.

त्याही पुढे, देशसेवा करताना हुतात्मा  झालेल्या सैनिकाच्या कुटुंबियांकडून बिलाचा एक रुपयाही घेतला जात नाही.

 

neelkannth-hotel inmarathi

 

वरील फलक हॉटेल बाहेर लावण्यात आला आहे.

सैनिकांनी ID दाखवल्यास त्यांना २५% सूट मिळते. तसेच, ID दाखवणारी व्यक्ती सैनिकी गणवेशात असेल तर त्यांना ५०% सूट मिळते. आणि पुढे – फलकावर लिहिल्याप्रमाणे –

ज्या सैनिकाने आमच्या आणि आपल्या राष्ट्राच्या रक्षणार्थ आपल्या जीवनाचे बलिदान दिले आहे, आम्ही त्यांच्या माता-पित्यांकडून कुठलाही शुल्क घेणार नाही.

तुम्ही देशाच्या रक्षणकर्त्याचा सन्मान कसा करता हे महत्वाचे नाही. या सन्मानामागे तुमची भावना किती खरी आहे ते महत्वाचे आहे.

आदर हा विचारात असणं जसं गरजेचं आहे, तसंच आपल्या कृतीतून तो व्यक्त करणं महत्वाचं आहे. हा आदर्श प्रत्येक क्षेत्रात घेतला गेला तर निश्चितच त्याचा फायदा अनेकांना होवु शकेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?