'"सचिन" आणि "अझरूद्दीन" मधल्या कडवट शीतयुद्धाच्या हा बाबी आजही फारशा कुणाला ठाऊक नाहीत...

“सचिन” आणि “अझरूद्दीन” मधल्या कडवट शीतयुद्धाच्या हा बाबी आजही फारशा कुणाला ठाऊक नाहीत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दोन विरुध्द टीम समोरासमोर खेळत असताना खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचे किस्से रंगवून सांगितले जातात आणि तितक्याच उत्सुकतेने ऐकले जातात.

 

cricket_controversy_inmarathi
jagran.com

पण वाद फक्त विरुद्ध टीमकडून खेळणाऱ्या खेळाडूशी होत नाहीत, तर अनेकदा एकाच टीममध्ये खेळणाऱ्या दोन खेळाडूंमध्येही होतात हे सांगणारी बरीच उदाहरणे क्रिकेटच्या इतिहासात आहेत.

काही वेळा हे वाद माध्यमांसमोर न आणता आतल्या आत मिटवले जातात तर काही वाद इतके टोकाला जातात की माध्यमांसमोर आल्याशिवाय राहत नाहीत.

भारताच्या क्रिकेट इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. अगदी गावसकर- बिशनसिंग बेदी पासून श्रीसंत – हरभजन पर्यंत.

यातले सर्वात गाजलेले उदाहरण म्हणजे सचिन तेंडूलकर आणि मोहम्मद अझरूद्दीन यांच्यात बराच काळ चालेला आणि चर्चिला गेलेला वाद.

 

azharuddin and sachin tendulkar InMarathi

 

आज भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाच्या काळात रंगलेल्या या कलगीतूऱ्याचे विविध पैलू जाणून घेऊ या.

नव्वदच्या दशकाचा उत्तरार्ध. मोहम्मद अझरूद्दीनने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्या तीन सामन्यातच सलग तीन शतके ठोकून या हैदराबादी पठ्ठ्याने आपण “लंबी रेस का घोडा” असल्याचे सिद्ध केले होते.

त्याच्या सुरुवातीच्या दैदिप्यमान कामगिरीने क्रिकेट रसिकांच्याच नव्हे तर तज्ञांच्याही भुवया उंचावल्या होत्या.

थोड्याच अवधीत अजहर लोकप्रिय झाला. पुढे पुढे तर ऑफ साईडच्या खेळावर काम करत त्याने लवचिक मनगटाची कला दाखवत कितीतरी सुंदर इनिंग्स खेळल्या.

 

azaruddin_batting_inmarathi
cricketcountry.com

१९८८-१९८९ सालापर्यंत तर अजहर मधल्या फळीतला दुसरा पर्याय नसणारा फलंदाज बनला होता. संघात त्याचे स्थान आता जवळजवळ अढळ झाले होते. पण भारतीय क्रिकेटचे एक स्वप्न अजून बाकी होते.

एकोणनव्वद साली मुंबईच्या एका जेमतेम दिसणाऱ्या खेळाडूने भारतीय टीममध्ये स्थान मिळवले. तिथून भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

१९८५ च्या दरम्यान आंतरशालेय हरीस शिल्ड स्पर्धेत विनोद कांबळीच्या साथीने वयाच्या अवघ्या बाराव्याच वर्षी  तब्बल ६६४ धावांचा रतीब घालणाऱ्या सचिन तेंडूलकरने १९८९ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

 

sachin_tendulkar_inmarathi
imgci.com

सुरुवातीचे ७४ सामने सचिनला शतकासाठी वाट पहावी लागली. ९४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिले शतक ठोकले आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने गोलंदाजांना आपल्या bat चे पाणी दाखवायला सुरुवात केली.

सचीनने जेव्हा पदार्पण केले तेव्हा अझरची कारकीर्द बहराला आलेली होती. तो चांगला पाच सहा वर्षाचा अनुभव बाळगून होता.

त्याच्या खेळाचा दर्जा आणि असामान्य फलंदाजीच्या जोरावर १९८९ साली सय्यद किरमाणी यांच्यानंतर कप्तानपदाची धुरा अझरूद्दीनच्या हाती जाणे स्वाभाविक होते.

आपल्या कप्तानपदाच्या सुरवातीच्या काळात अजहरची प्रगती जेमतेम होती. पण फलंदाज म्हणून त्याचा दबदबा अजूनही टिकून होता. १८८९ ते १९९६ या काळात सचिनने आपल्या खेळाचा स्तर आश्चर्यकारकरित्या उंचावत नेला.

 

Sachin-Tendulkar 1 InMarathi

 

हे दोन कमालीचे कसलेले खेळाडू एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द गाजवत होते.

आता प्रसिद्धी विभागली जाणार हे गोष्ट सुर्याप्रकाशाईतकी स्पष्ट होती. नेमक्या याच ठिकाणी अजहर आणि सचिन मधल्या शीतयुद्धाला सुरुवात झाली असे अनेक जाणकार सांगतात.

 

sachin and azharuddin InMarathi

 

पुढे अजून बरेच काही व्हायचे बाकी होते.

१९९६ चा वर्ल्ड कप. अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेत चांगलाच मार खाल्ला. अझरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि इथेच त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली.

या पराभवानंतर कप्तानपदाची धुरा स्वाभाविकपणे सचिनवर सोपवण्यात आली. इथून अजहारुद्दिन आणि सचिन मधला वाद माध्यमांसमोर यायला सुरुवात झाली.

स्वतःचे कप्तानपद आणि प्रसिद्धी आपल्याला सचिनमुळे गमवावी लागली असा समज असल्यासारखे वर्तन अझरच्या वागण्यातून वेळोवेळी दिसत होते.

 

azharuddin InMarathi

 

या सगळ्या प्रकरणातला एक महत्वाचा दुवा म्हणजे अजहर १९९४ पासून मॅचफिक्सिंगच्या आरोपाखाली होता. अनेक पत्रकारांनी त्याचा बुकीजशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली होती.

त्याही दृष्टीने १९९५ नंतरचे त्याचे करिअर अनिश्चिततेच्या गडद छायेत होते. हे सर्व होत असताना स्वतःचे संघातील स्थान, प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना एकीकडे सचिन विक्रमांवर विक्रम रचत होता.

येणारा काळ त्याचा असणार आहे हे त्याच्या खेळण्याच्या असामान्य शैलीने आणि प्रसिद्धीने केव्हाच स्पष्ट केले होते.

 

sachin-azhar-inmarathi
mykhel.com

अजहरला सचिनची ही घौडदौड पाहवली नाही आणि त्याने मधल्या फळीत खेळणाऱ्या सचिनला खेळावरून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने अनेकदा ओपनिंगला जायला सांगितले.

या सर्व प्रकरणावरून क्रिकेट जगतात चर्चा भरपूर चर्चा रंगल्या. आणि या सर्वाचा परिणाम म्हणून १९९७ साली अझहर कडून कप्तानपदाची धुरा काढून घेऊन ती सचिनकडे सोपवण्यात येणार ही गोष्ट स्पष्ट होती.

अवघ्या तेवीस वर्षांचा असताना हे आव्हान सचिनला पेलवणार की नाही हाही प्रश्नच होता. पण ट्वीस्ट अजूनही संपलेला नव्हता. दोन वर्षात पुन्हा सचिनचे कर्णधारपद काढून अजहरकडे सोपवण्यात आले.

 

azharuddin 1 InMarathi

 

सचिनला त्याच्या नेतृत्वाखाली खेळायला कसलीच हरकत नव्हती. तो आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणार होता.

या काळात त्याच्यात  आणि अजहरमध्ये जरा कुठे खुट्ट झाले तरी माध्यमांची बारीक नजर असायची. एरवी तर त्यांच्यातल्या सुंदोपसुंदीचे किस्से चवीने चघळले जाऊ लागले होते.

९९ साली भारताने दक्षिण आफ्रीकेसोबत घरच्या मैदानावर सीरीज खेळली. या सीरीजनंतर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह मॅचफिक्सिंग झाले असल्याचा दावा केला.

 

ajharuddin_controversy_inmarathi
cloudfront.net

हा खटला सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासाअंती सीबीआयने अजहरला दोषी ठरवत त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आजीवन बंदी आणली.

या निर्णयानंतर सचिन आणि अझरूद्दीन यांच्यातल्या शीतयुद्धावरील खुमासदार चर्चांना पूर्णविराम मिळाला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““सचिन” आणि “अझरूद्दीन” मधल्या कडवट शीतयुद्धाच्या हा बाबी आजही फारशा कुणाला ठाऊक नाहीत…

  • January 13, 2018 at 9:23 pm
    Permalink

    Only speculations. Its like today’s electronic media. Only headline is catchy but nothing worth to read..We witnessed 90’s cricket, we were expecting some unknown events which lead to rift between Sachin and Azhar but didn’t find anything worthy. U only penned sequence of events that we know.And there were reasons losing captaincy so don’t create a story out of nothing.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?