'"व्हाय आय एम अ हिंदू?" सांगणार आहेत शशी थरूर!

“व्हाय आय एम अ हिंदू?” सांगणार आहेत शशी थरूर!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारताच्या एकंदरीत वैचारिक वर्तुळात आता शशी थरूर या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज उरलेली नाही. अस्खलित वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील असामान्य प्रभुत्व, लिखाणाची खिळवून ठेवणारी आणि ओघवती शैली या गुणांच्या बळावर शशी थरूर या माणसाने वैचारिक विश्वात दबदबा कायम ठेवला आहे. Pax Indica, Bookless in Bagdad, India: From Midnight to Millenium ही थरूर यांची विशेष गाजलेली पुस्तके. थरूर यांची राजकीय कारकीर्दही चांगलीच वादग्रस्त राहिली आहे.

 

shashi_tharoor_inmarathi
outlookindia.com

नवीन वर्षात थरूर त्यांचे नवीन पुस्तक चाहत्यांसमोर ठेवणार आहेत. या पुस्तकाचं नाव, “Why I Am a Hindu?” .

या पुस्तकात विशेष म्हणजे टिपिकल “उजवा” चेहरा नसणारा थरूर यांच्यासारखा विचारवंत ‘आपण हिंदू का आहोत’ हे सांगणार आहे. पुस्तकाचे नाव जाहीर झाल्यापासूनच या पुस्तकाबद्दल साहित्य वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या पुस्तकात वैयक्तिक पातळीवर स्वतःला अनुभवास आलेला हिंदू धर्माचा सहिष्णू चेहरा, प्राचीन संस्कृती म्हणून हिंदू धर्माचे अस्तित्व इथपासून ते आधुनिक भारताच्या इतिहासात जन्म घेतलेली ‘हिंदुत्व’ नावाची राजकीय विचारधारा इथपर्यंत थरूर सविस्तर चर्चा करणार आहेत.

 

why_i_am_a_hindu_inmarathi
ukminim1.flixcart.com

आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओद्वारे शशी थरूर यांनी या पुस्तकाच्या बाबतीत वाचकांशी संवाद साधला आहे. पुस्तकाबद्दल बोलताना थरूर म्हणतात, की या पुस्तकात ते हिंदू तत्वज्ञान आणि त्याची जडणघडण, हिंदू धर्माची अध्यात्मिक बाजू, रंगाच्या झेंड्यात अडकलेले राजकीय हिंदुत्व यांच्यावर  चर्चा करतात.

महत्वाचे म्हणजे राजकीय हिंदुत्वाच्या बहुआयामी विचारधारा, सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवादी राजकीय हिंदुत्ववाद, गोलवलकरी हिंदुत्ववाद, दीनदयाळ उपाध्याय यांचे हिंदुत्वाचे तत्वज्ञान इत्यादी विषयांचा या पुस्तकात प्रामुख्याने उहापोह झाला आहे.

पुस्तकाच्या शेवटाकडे जाताना थरूर म्हणतात त्याप्रमाणे, एका साच्यात न बसणारे, असंख्य कंगोरे असणारे हिंदू धर्माचे तत्वज्ञान, त्याची वैचारीक बैठक, सहिष्णू आणि नव्या बदलांना सामावून घेण्याची स्वाभाविक वृत्ती या सगळ्यापासून खचितच वेगळे असलेले सध्याचे राजकीय आणि काही अंशी संकुचित म्हणता येईल असे वर्तमानातले हिंदुत्व याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर नोंदवलेली निरीक्षणे व्यक्त करणार आहेत.

 

shashi_tharoor_speaking_inmarathi
pinterest.com

थरूर यांचे हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पहिले तर ते वाचकाच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. या नव्या पुस्तकाबद्दल वाचकांची उत्सुकता पाहता येत्या काळात त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकाची भारताच्या साहित्यिक आणि वैचारिक वर्तुळात चर्चा होणार हे मात्र नक्की.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?