'भगवान विष्णूचे "सर्वात मोठे मंदिर" भारताबाहेर आहे, आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे!

भगवान विष्णूचे “सर्वात मोठे मंदिर” भारताबाहेर आहे, आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्राचीन मंदिरांच्या स्थापत्य शास्त्राबद्दल आणि त्यातून उलगडत जाणाऱ्या संस्कृतीबद्दल मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू असते. कारण श्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तरी मानवी इतिहासाबद्दल ही मंदिरे काही गुपिते ठेवून असतात.

जगभरातील धार्मिक स्थळे याला अपवाद नाहीत.

जसे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माची धर्मस्थळे आहेत, तसेच जगातील इतर देशांमध्ये देखील हिंदू धर्माची धर्मस्थळे आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या प्रसिद्ध मंदिराबद्दल..

 

largest Hindu Temple InMarathi

 

हे मंदिर कंबोडियामध्ये स्थित आहे आणि हे आंग्कोर वाट मंदिर नावाने संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आंग्कोर वाट दक्षिण–पूर्व आशियाच्या सर्वात महत्त्वपूर्ण पुरातत्व स्थळांमधील एक आहे. जो शक्तिशाली समेर साम्राज्यानंतर कितीतरी शतके घनदाट जंगलामध्ये लपलेला होता.

हे मंदिर १२ व्या शतकामध्ये खमेर वंशाचा राजा सूर्यवर्मन द्वितीय याने बांधले होते. या मंदिराचे प्राचीन नाव यशोधरपूर होते.

राजा सूर्यवर्मन खूप धार्मिक विचारांचा राजा होता आणि त्यांची विष्णूवर अपार श्रद्धा होती. त्यामुळे त्याने हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित करण्याच्या उद्देशाने तयार केले होते.

हे मंदिर तयार करण्यामागे एक प्रमुख कारण असे की त्या राजाला अमर होण्याचा लोभ होता.

असे म्हटले जाते की, राजा सूर्यवर्मन हिंदू देवी–देवतांची पूजाअर्चा करून अमर बनू इच्छित होता. त्यामुळे त्याने हे मंदिर बांधले, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांची पूजा होत असे.

 

Hindu tample 2 inMarathi

 

पण या मंदिराच्या बाबतीत कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी प्रचलित आहेत. अशी मान्यता आहे की, देवराज इंद्राने आपल्या मुलासाठी महाल म्हणून हे मंदिराला बनवले होते.

१३ व्या शतकामध्ये आलेल्या एका चीनी यात्रेकरुचे म्हणणे होते की या मंदिराचे बांधकाम फक्त एका रात्रीत कोणत्यातरी अलौकिक शक्तीच्या हातून झाले होते. पण खरेतर या मंदिराचा इतिहास बौद्ध आणि हिंदू धर्माशी जोडलेला आहे.

काय आहे मंदिराचा इतिहास ?

आंग्कोर वाट मंदिराचा संबंध प्राचीन काळातील कंबोदेश, ज्याला आज कंबोडिया नावाने ओळखले जाते त्याच्याशी आहे. या मंदिराचा हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माशी संबंध असण्याचे कारण याच्या इतिहासामध्ये लपलेले आहे.

इतिहास सांगतो की जवळपास २७ शासकांनी कंबोदेशावर राज्य केले होते, ज्यामधील काही हिंदू होते, तर काही बौद्ध होते.

याचा पुरावा म्हणून संशोधकांना आजही कंबोडियामध्ये हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माशी जोडलेल्या मूर्ती मिळत आहेत.

 

 

आता पाहिले तर कंबोडियामध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे येथे ठिकठिकाणी भगवान बुद्धच्या मूर्ती पाहायला मिळतात.

पण आंग्कोर वाट येथील एकमात्र असे स्थान आहे, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या देखील मूर्ती एकत्र आहेत.

एवढेच नाही तर आंग्कोर वाट मंदिराचे वैशिष्ट्य हे देखील आहे की, विष्णूचे हे सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराच्या मोठमोठ्या भिंतींवर रामायण आणि महाभारत या धर्मग्रंथाशी जोडलेल्या गोष्टी कोरण्यात आलेल्या आहेत.

खरेतर हे मंदिर भगवान शंकराला समर्पित होते, काही वेळानंतर येथे भगवान विष्णुंची पूजा होऊ लागली. पण जेव्हा बौद्ध धर्मियांनी हे स्थान काबीज केले, तेव्हापासून येथे बौद्ध धर्माचे आराध्य दैवत अवलोकीतेश्वराची पूजा होते.

१४ वे शतक येता – येता येथे बौद्ध धर्माच्या शासकांचे शासन स्थापन झाले आणि या मंदिराला बौद्ध रूप देण्यात आले.

 

Large cambodia temple InMarathi

 

वर्ष १९८६ पासून वर्ष १९९३ पर्यंत भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आंग्कोर वाट मंदिराच्या संरक्षणाचा वाटा उचलला होता. १२ व्या शतकामध्ये बनवण्यात आलेल्या या मंदिराला जगाच्या इतिहासाचा वारसा लाभलेला आहे.

आज हे मंदिर जगातील सर्वात प्राचीन प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर खूप भव्य आणि सुंदर आहे आणि इतिहासाचा मोठा वारसा या मंदिराला लाभलेला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “भगवान विष्णूचे “सर्वात मोठे मंदिर” भारताबाहेर आहे, आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे!

 • March 2, 2019 at 12:38 pm
  Permalink

  खूपच छान माहिती

  Reply
 • March 6, 2019 at 1:21 pm
  Permalink

  खूप छान माहिती दिली

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?