भारतातील अत्यंत दुर्दैवी, “सर्वात मोठा रेल्वे अपघात” – अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

कुठेही जायचे असल्यास आजही रेल्वे हा उत्तम पर्याय मानला जातो. कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या इच्छुक ठिकाणी पोहचू शकता. रेल्वेमुळे आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाचतो. त्यामुळे आपण अनेकदा रेल्वेचा पर्याय प्रवासासाठी निवडतो. पण या रेल्वेला होणारे अपघात देखील तेवढेच भयानक असतात.

रेल्वेच्या अपघातामध्ये आतापर्यंत खूप जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपण नेहमी वृत्तपत्रांमधून रेल्वेच्या अपघाताच्या घटना वाचतच असतो.

आज आम्ही तुम्हाला भारता तील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

बिहारमध्ये घडलेला हा भीषण रेल्वे अपघात आजही अनेकांसाठी कटू आठवणी घेऊन समोर उभा रहातो.

 

India's biggest railway accident.Inmarathi
samacharnama.com

६ जून १९८१.

माणसांनी भरलेली एक रेल्वे पुलावरून जात होती.

रेल्वेमधील सर्व माणसे वेळ घालवण्यासाठी काही न काही करत होते, कारण त्यांच्या नशिबाने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे त्यांनाही माहित नव्हते . सर्व काही सुरळीत चालू असताना रेल्वेच्या चालकाने म्हणजेच मोटरमनने अचानक ब्रेक दाबला.

कुणाला काही समजण्याच्या अगोदरच रेल्वे पटरीवरून घसरून तुडुंब भरलेल्या नदीमध्ये कोसळली.

असे म्हटले जाते की, मोटरमनने ब्रेक यासाठी मारला, कारण त्याच्यासमोर एक म्हैस आली होती. एका म्हशीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये हजारो लोकांचा जीव गेला होता. हा भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात ठरला.

मानसी जंक्शनपासून सहरसा जंक्शनला जाणारी रेल्वे बागमती नदीच्या पुलावरून जात होती. मान्सून चालू असल्याने खूप पाऊस पडत होता. त्यामुळे रूळ थोडे निसरडे झाले होते, त्यातच बागमती नदी तुडुंब भरलेली होती. ९ डब्याच्या या रेल्वेमध्ये हजारो लोक प्रवास करत होते. अचानक चालकाने ब्रेक दाबला आणि ९ मधील ७ डब्बे पटरीवरून घसरून वेगळे झाले आणि पूल तोडून बागमती नदीच्या पात्रामध्ये कोसळले.

रेल्वेमधील लोकांनी मदतीसाठी आरडाओरड केला, परंतु मदत येईपर्यंत खूप तास उलटून गेले होते आणि जोपर्यंत लोक वाचवायला आले, तोपर्यंत शेकडो लोक वाहून गेले होते.

हाच नव्हे, १९८१ हे असे एक वर्ष होते, ज्यावर्षी भारतामध्ये खूप रेल्वे अपघात झाले. जानेवारी ते सप्टेंबर या ८ महिन्यांमध्येच जवळपास ५२६ रेल्वेचे अपघात झाले होते. यामध्ये खूप जीवितहानी झाली होती. त्यामुळे तत्कालीन रेल्वे मंत्री केदारनाथ पांडे चांगलेच अडचणीत सापडले होते.

India's biggest railway accident.Inmarathi1
gettyimages.in

सरकारी आकड्यांनुसार जवळपास ५०० लोक या रेल्वेमध्ये होते. पण नंतर रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की , या अपघातामध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या १००० ते ३००० दरम्यान असू शकते. यावरून समजते की, अपघाताच्या वेळी या रेल्वेमधून हजारो लोक प्रवास करत होते.

आपल्या भारतीय रेल्वेमध्ये जेवढ्या लोकांसाठी ती रेल्वे बनवलेली आहे, त्याच्या तीनपट किंवा त्यापेक्षा जास्त लोक प्रवास करत असतात. यामध्ये खूप सारे विना तिकीट प्रवास करणारे लोक देखील असतात.

प्रत्येक पाणबुड्याला एक मृतदेह काढल्यानंतर काही पैसे देण्यास सांगितले गेले होते. पण या पाणबुड्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. भारतीय नौसेनेने तर पाण्यामध्ये विस्फ़ोटकांचा वापर करून ५०० मृतदेह काढण्याची योजना बनवली होती. पण असे झाले नाही.

या पाणबुड्यांनी मृतदेह शोधण्यासाठी कितीतरी आठवडे घालवले. पण २८६ मृतदेहच ते काढू शकले. ३०० पेक्षा जास्त लोकांचा आजपर्यंत काहीही थांगपत्ता लागलेला नाही. आकड्यांनुसार, या रेल्वे दुर्घटनेमध्ये जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाला. शेकडो लोक नदीमध्ये वाहुन गेले.

हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे आणि जगातील दुसरा मोठा रेल्वे अपघात आहे.

जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात श्रीलंकेमध्ये झाला होता. जेव्हा २००४ ला त्सुनामीमध्ये ओशियन क्वीन एक्सप्रेसला लाटांनी वाहून नेले होते. या अपघातामध्ये १७०० लोकांचा मृत्यू झाला होता.

कसा झाला होता अपघात ?

हा अपघात कसा झाला, याचे मुख्य कारण अजूनही पूर्णपणे ज्ञात नाही. या अपघातासाठी दोन सिद्धांत मांडले आहेत. पहिला, रूळावर पुढे म्हैस उभी होती. ( काही लोक गाय देखील सांगतात) तिला वाचवण्यासाठी मोटरमनने ब्रेक मारला. रूळ निसरडे असल्याने गाडी रूळावरून उतरली आणि पूल तोडत ७ डब्बे नदीच्या पात्रामध्ये पडले.

 

India's biggest railway accident.Inmarathi2
gettyimages.in

दुसरा कयास असा की, खूप जोरात वादळ आले होते. जोराच्या हवेबरोबर पाणी देखील येत होते. आणि खिडकीच्या आतमध्ये येऊ लागल्यामुळे सर्वानी खिडक्या बंद करून घेतल्या. त्यामुळे जेव्हा रेल्वे पुलावरून जात होती, तेव्हा सरळ वादळी हवा लागत होती.

हवा क्रॉस होण्यासाठी सर्व रस्ते बंद झाले होते, त्यामुळे भारी दबावामुळे रेल्वे पलटून पूल तोडून नदीमध्ये पडली.

अशी ही रेल्वे दुर्घटना भारतामधील सर्वात दुर्दैवी रेल्वे दुर्घटना ठरली. यामध्ये मृत्यू पावलेल्या काही लोकांचे तर अंतिम संस्कार देखील करता आले नाही. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर अचानकपणे कोसळलेला हा दुःखाचा डोंगर खूप हृदयद्रावक होता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?