' हॉटेल, मोटेल की रेस्टॉरंट? निवड करताना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की वाचा

हॉटेल, मोटेल की रेस्टॉरंट? निवड करताना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कुठे फिरायला जायचे म्हटले, तर तिथे जाण्यासाठी आपण एक चांगला प्लॅन बनवतो. या प्लॅनमध्ये जायचे कसे, राहायचे कुठे, काय बघायचे आणि काय खायचे हे सर्व ठरवतो.

पण कधी – कधी आपण हॉटेल्स वैगेरे आधीच बुक न करता तिथे जाऊन बुक करतो, कारण तिथे गेल्यावर आपल्याला कमी दारामध्ये चांगल्या प्रकारचे हॉटेल्स उपलब्ध होऊ शकतात आणि आपले पैसे देखील वाचू शकतात. पण तुम्हाला हे माहित आहे का ?

आपण सर्वच गोष्टींना हॉटेल असे म्हणतो. जिथे आपण फक्त जेवण करण्यासाठी जातो त्याला देखील हॉटेल म्हणतो आणि जिथे राहण्यासाठी जातो त्याला देखील हॉटेल म्हणतो.

आज आम्ही तुम्हाला यामधील काही प्रकारांबद्दल सांगणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहित नसतील. चला तर मग जणून घेऊया, यांच्याबद्दल..

१. हॉटेल

 

taj hotel InMarathi

 

हॉटेल ही ती जागा आहे, जिथे तुम्हाला राहण्यासाठी खोली, जेवण आणि इतर काही सुविधा उपलब्धतेनुसार  मिळतात. हॉटेलचे पहिले काम बाहेरच्या शहरामधून आलेल्या प्रवाशांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करणे हे असते.

येथे तुम्हाला राहण्याच्या आणि खाण्याच्या सुविधेच्या व्यतिरिक्त टीव्ही, फ्रीज, वायफाय यांसारख्या सुविधा दिल्या जातात. पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या सुविधा मिळतीलच असे नाही. काही स्वस्त हॉटेल या सुविधेविना देखील असतात.

हॉटेलमधील रूम सर्विस सिस्टम तुम्हाला सर्व गोष्टी हातात आणून देतात. जेवण हॉटेलमध्ये त्यांच्या पर्सनल किचनमधून दिले जाते, तर काही मोठ्या हॉटेलचे तर स्वत: चे रेस्टॉरंट देखील असते.

२. मोटेल

 

motel InMarathi

 

मोटेल हा हॉटेलचाच छोटासा भाग असतो. मोटल हा शब्द मोटार आणि हॉटेल यांना मिळून बनलेला आहे. मोटेल सिस्टम मुख्यत: हायवेवर असते. यांचे काम त्या प्रवाशांना रात्री राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे असते, जे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निघाले आहे आणि रात्री ड्राइव्ह करू इच्छित नाहीत.

जास्तकरून मोटेल रस्त्याच्या कडेला असतात. जिथे खोली बरोबरच ओपन पार्किंग स्पेस देखील असते. मोटेलमध्ये हॉटेलसारख्या सुविधा सहसा नसतात. काही मोटल जेवण उपलब्ध करून देतात. पण प्रत्येक ठिकाणी असे असेलच हे सांगता येत नाही.

३. रेस्टॉरंट

 

restaurant InMarathi

 

अशी जागा जिथे तुम्ही फक्त जेवण्यासाठी जातो. हे देसी ढाब्याचा थोडा अपग्रेडेड प्रकार आहे. येथे लक्झरी अॅम्बियन्स असतो, जेवणाची क्वालिटीनुसार जेवणाची किंमत असते, ती आपण देतो आणि परत येतो. कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये राहण्याची व्यवस्था नसते. फक्त खा आणि घरी जा.

४. रिसोर्ट्स

 

resort InMarathi

 

रिसोर्ट्स सामान्यतः टूरिस्ट प्लेसवर असतात. ही रीलॅक्स करण्यासाठी तयार करण्यात आलेली जागा आहे. येथे हॉटेल आणि मोटलसारखी तुमच्यावर सक्ती नसते, तर येथे तुम्ही मौज – मज्जा करण्यासाठी येता, तेही मोठा प्लॅन बनवून येता.

ऑफिसमधून, व्यवसायातून सुट्टी घेऊन तुम्ही येथे येता. रिसोर्ट्समध्ये तुम्हाच्या दर्जेदार जेवणाच्या बरोबरच सर्व सुख – सुविधांची काळजी घेतात आणि जीवनाच्या या धावपळीला, तणावाला काही दिवसांसाठी विसरायला मदत करतात. पण येथे तुम्हाला पैसे देखील जास्त मोजावे लागतात.

असे हे प्रकार प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्हाला समजले असेलच कि, राहण्याच्या जागेला काय म्हणतात आणि खाण्याच्या जागेला काय म्हटले जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?