' भारतातील एकमेव कुटुंब ज्यामध्ये आहेत तब्बल ५ Ph.D. होल्डर्स – InMarathi

भारतातील एकमेव कुटुंब ज्यामध्ये आहेत तब्बल ५ Ph.D. होल्डर्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने शिकून सवरून मोठ व्हावं आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठेच जीवन जगावं आणि हे स्वप्न पूर्ण झालं की प्रत्येक आई वडील स्वत:ला खूप भाग्यवान समजतात. असचं एक भाग्यवान जोडप आपल्या भारतात आहे ज्यांची पाचही अपत्य पी.एच.डी. होल्डर्स आहेत.

झाशी येथे राहणाऱ्या भगवानदास यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. पाच मुलांना सांभाळणाऱ्या भगवानदासांना १९७३ या काळात महिन्याला केवळ १६५ रुपये पगार मिळायचा. पण त्यांनी न डगमगता आपल्या कुटुंबाचा सर्वोत्तम सांभाळ केला. त्यांच्या दृष्टीने जीवनात शिक्षणाला सर्वात महत्व आहे. कारण शिकलेला माणूस कधीही उपाशी राहणार नाही अशी त्यांची खात्री आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. त्यांच्या पत्नीने देखील त्यांना मोलाची साथ दिली. आज भगवानदासांची पाचही मुल इंजिनियर असून पी.एच.डी. होल्डर्स देखील आहेत.

 

maximum-phd-holders-marathipizza01स्रोत

भगवानदास स्वत: १२ वी पास आहेत. त्यांची शिक्षणाची तहान भागली नाही, पण त्यांनी स्वत:ची ती तहान आपल्या मुलांकरवी भागवून घेतली. आज भारतातील सर्वात जास्त पी.एच.डी. होल्डर्स असलेले एकमेव कुटुंब म्हणून भगवानदास यांच्या कुटुंबाच नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. असा अनोखा विक्रम आपल्या नावावर  होईल असा विचारही भगवानदासांनी कधी केला नव्हता.

भगवानदास म्हणतात,

“माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की माझ्या मुलांनी खूप शिकावे आणि नावलौकिक मिळवावा आणि आज मला सांगताना आनंद होत आहे की माझ ते स्वप्न पूर्ण झालं आहे. देवाने माझ्या पदरी अशी प्रतिभावंत मुल जन्माला घातली म्हणून मी देवाचा आभारी आहे.”

“कभी न दिखाना माता-पिता को घमंड अपनी कामयाबी का, उन्होंने हार कर तुझे जिताया है”

आपल्या सुखातच आपल्या आईवडीलांच सुख आहे हेच खरं!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?