'मानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास - १० वस्तूंच्या रूपांतरातून

मानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

टेक्नोलॉजीच्या भरवश्यावर आज मानवाने जीवनात खूप प्रगती केली आहे. त्याने अनेक असे शोध लावले आहेत ज्याचा काही वर्षांपूर्वी कोणी विचार देखील करू शकत नव्हते. आज आपण इंटरनेटच्या सहाय्याने घर बसल्या जग फिरू शकतो.

मोबाईलच्या मदतीने दूरवरच्या व्यक्तीशी संवांद साधू शकतो. एवढंच काय तर व्हिडिओ कॉलच्या  माध्यमातून आपण जगातील कुठल्याही टोकाला असलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू शकतो.

आपण या सोशल मिडिया नावाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला वाटेल ते टाकू आणि लिहू शकतो. या टेक्नॉलॉजीमुळे मानवाचे जीवन खरंच सुकर झाले आहे.

पण तरी आजही एक प्रश्न मात्र नेहमी मनाला भेडसावत असतो की, काय खरच टेक्नोलॉजी आपल्यासाठी वरदान आहे की शाप? भलेही यामुळे आज आपले जीवन अधिक सोयीस्कर झाले असेल तरी या टेक्नोलॉजीचे काही तोटे देखील आहेतच.

पण ही टेक्नोलॉजी काही एका दिवसात उदयाला आलेली नाही. तर ती हळूहळू अधिक प्रगत होत गेली आहे. जसे की आपला संगणक, जेव्हा याचा शोध लागला तेव्हा एक संगणक एका खोली एवढा मोठा होता. तर आज बघा तो किती कॉमपॅक्ट झाला आहे…

आज आपण अश्याच काही वस्तूंवर नजर टाकणार आहोत.

कॉम्पुटर माऊस :

 

old-new-inmarathi

 

माऊस हा कॉम्पुटर युगातील सर्वात अनोखा शोध आहे. आधीच्या काळात माऊस हा अश्या प्रकारचा होता आणि तर अनेक प्रकारचे माऊस आपल्याला बघायला मिळतात.

आता तर लॅपटॉप सारख्या कॉम्प्युटरला असलेला टचपॅडचा माऊस सुद्धा सर्रास पाहायला मिळतो.

कार :

 

old-new-inmarathi04

 

बेंज पेटंट- मोटरवॅगन ला जगातील पहिली कार मानलं जातं. आधीच्या काळातील कार आणि आताच्या काळातील कार यात खूप फरक आहे.

भविष्यात स्वयंचलित कार्स सुद्धा जागोजागी पाहायला मिळाल्या तरीही आश्चर्य वाटणार नाही.

संगणक :

 

old-new-inmarathi03

 

आधीच्या काळात एक संगणक एका खोलीची जागा व्यापून घ्यायचा पण आता त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.

आता तर लॅपटॉपचा वापर वाढला असल्याचं आपण पाहतो. कदाचित भविष्यात डेस्कटॉप हा प्रकार नामशेष सुद्धा होऊ शकतो.

इस्त्री :

 

old-new-inmarathi02

 

आधीच्या काळात लोखंडाच्या इस्त्रीमध्ये कोळसा टाकून कपड्यांना इस्त्री केली जायची. पण आता तर अनेक प्रकारच्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असlलेल्या इस्त्री बाजारात उपलब्ध आहेत.

टीव्ही :

 

old-new-inmarathi05

 

एकेकाळी ज्या व्यक्तीच्या घरी टीव्ही असायचा तो सर्वात श्रीमंत मानला जायचा. त्यानंतर हळूहळू सर्वच घरात हा दिसू लागला. तसा आधीचा टीव्ही आणि आताचा टीव्ही यात देखील बराच फरक आढळून येतो.

कॅमेरा :

 

old-new-inmarathi09

 

आधीच्या काळातील कॅमेरा हा फोटो तर काढायचा पण पण ते ब्लॅक अॅण्ड व्हाईट असायचे. त्यानंतरच्या काळात सुद्धा रोल असणारे कॅमेरा वापरावे लागत होते.

आज मात्र DSLR ने आपल्याला हवे तसे हवे त्या अँगलने फोटो काढू शकतो. शिवाय फोटो चुकला असेल तर तो पुन्हा काढण्याची संधी सुद्धा मिळते.

विमान :

 

old-new-inmarathi01

 

आधीच्या काळातील विमान हे आतापेक्षा खूप वेगळे होते. आता तर आपण त्या काळातील विमानात बसण्याची कल्पना देखील करू शकत नाही.

मोबाईल :

 

old-new-inmarathi07

 

आधीच्या काळातील मोबाईल आणि आताच्या काळातील मोबईल याच देखील खूप बदल घडलेला आहे. आधीच्या काळातील मोबाईल हा वापरण्यास जेवढा किचकट होता आताच्या काळातील मोबईल हा तेवढाच सोयीस्कर झाला आहे.

रेडीओ :

 

old-new-inmarathi08

 

भलेही आता आपण मोबाईलवरच रेडीओ ऐकत असू पण तरी आधीच्या काळातील रेडीओ आणि आताच्या काळातील रेडीओत खूप फरक आहे.

बेबी वॉकर :

 

old-new-inmarathi06

 

आधीच्या काळातील बेबी वॉकर देखील खूप वेगळे होते. आताच्या सारखी त्या चाके नव्हती.

या होत्या त्या काही काही वस्तू ज्यांचा शोध भलेही आधीच्या काळात लागला असेल पण टेक्नॉलॉजी आणि वेळेने त्यांच्यात जो बदल घडवून आणला आहे तो खरच अविश्वसनीय आहे…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?