' रामाच्या पश्चात रघुवंशातील ‘या’ राजांनी सांभाळला होता अयोध्येचा राज्यकारभार! – InMarathi

रामाच्या पश्चात रघुवंशातील ‘या’ राजांनी सांभाळला होता अयोध्येचा राज्यकारभार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रामायण ही आपल्याकडच्या लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट आहे, आपल्या इथे जेंव्हा दूरदर्शनवर रामायण सिरियल लागायची तेंव्हा देशातले रस्तेच्या रस्ते ओस पडलेले असायचे!

लोकं अक्षरशः त्या टीव्हीमधल्या कलाकारांना हार घालून त्यांना वंदन करायचे आणि त्यांची पूजा करायचे, जणू काही साक्षात प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडले आहे!

आणि हो हे फक्त आपल्याच देशात घडू शकते!

या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी त्यांच्या घराच्या बाहेर पडून गर्दी करू नये यासाठी दूरदर्शन चॅनलने पुन्हा रामायण आणि महाभारत या सिरियल्स दाखवल्या.

 

ramayan serial inmarathi

 

यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

पण तुम्हाला माहीत आहे का हो, की रावणाचा वध करून आल्या नंतर काय झाले, किंवा रामाच्या नंतर आयोध्येचा कारभार कुणी सांभाळला?

खरंतर रामायणात आख्यायिका बऱ्याच आहेत, त्यातल्या खऱ्या खोट्याची शहानिशा करत बसण्यात काही अर्थ नाही!

कारण बऱ्याच गोष्टी या कधीच घडल्या नाहीत पण आपण त्या लहानपणापासून थोरा मोठ्यांकडून ऐकून आहोत!

त्यामुळे कधी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की रामानंतर त्याच्या राज्याची आणि कारभाराची काळजी कुणी घेतली असावी?

हे ही वाचा – प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी मृत्यूदंड का ठोठावला? जाणून घ्या

 

ramayan feature inmarathi

 

आज आपण याबद्दलच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत!

भगवान राम हे अयोध्येचे राजा होते, तसेच ते हिंदू धर्मियांचे प्रमुख देव देखील आहेत. त्यांना भगवान विष्णूचे सातवे रूप मानले जाते. भगवान राम यांच्याआधी त्यांचे पिता राजा दशरथ हे रघुवंशाचे प्रमुख होते.

रघुवंशला ‘ईक्ष्वाकु वंश’ देखील म्हटल्या जाते, कारण ईक्ष्वाकु यांनी या वंशाची स्थापना केली होती.

रघुवंशाच्या प्रमुख राजांमध्ये रामासोबतच हरिश्चंद्र, भगीरथ, दिलीप, रघु, अजा आणि दशरथ यांची नावं तर आपण ऐकलीच आहेत. पण रामानंतर रघुवंशाला कुठले राजा मिळाले? याबद्दल कदाचितच आपल्याला माहित असेल.

 

ram inmarathi

लव-कुश हे राम-सीताचे जुळे मुलं होते. कुश लवपेक्षा मोठा होता. रामाने एका धोब्याचे ऐकून सीतेला अयोध्येतून जाण्यास सांगितले होते.

तेव्हा सीता ही महर्षी वाल्मिकी यांच्या येथे जाऊन राहिली आणि तीने तेथेच लव-कुशला जन्म दिला.

महर्षी वाल्मिकी यांनीच लव-कुशला शिक्षा दिली. रामाने एकदा आपल्या महालात अश्वमेध यज्ञ करवले, त्यावेळी त्याला कळाले की लव-कुश त्याचेच मुलं आहेत.

 

lav kush inmarathi

असं म्हणतात की विष्णू अवतारांचा मृत्यू होत नाही, तर ते वैकुंठात जातात. त्याचप्रकारे भगवान राम देखील पृथ्वीवरील त्याचं कार्य पूर्ण करून वैकुंठात परतले.

त्याआधी त्यांनी आपल्या मुलांना अयोध्येचा राजा बनवून सर्व कामकाज त्यांच्यावर सोपवले. त्यांनी लव याला श्रावस्ती आणि कुश याला कुशवटीचा राजा बनवले.

या दोघांनीच लवपुरी (लाहौर) आणि कसुर या राज्यांचा शोध लावला होता.

लव-कुश नंतर कुशचा मुलगा अतिथी राजा बनला. मुनी वशिष्ठ यांच्या सानिध्यात अतिथी एक कुशल राजा बनला. तो अतिशय विनम्र आणि एक महान योद्धा होता.

हे ही वाचा – वाल्मिकींपेक्षाही श्रेष्ठ रामायण हनुमंताने लिहिलं होतं, पण या कारणाने ते नष्ट झालं

 

raghuvansh-inmarathi04

 

अतिथी नंतर त्यांचा पुत्र निषध राजा बनला.

त्यानंतर नल राजा बनले, ते देखील एक महान योद्धा होते. नलयांचा एक मुलगा होता नभ. जेव्हा नभ मोठा झाला तेव्हा नल जंगलात निघून गेले आणि आपल्या मुलाला राज्य सोपवले. नभ नंतर पुण्डरीक राजा बनले.

पुण्डरीक नंतर त्यांचा मुलगा क्षेमधन्वा या वंशाचे राजा बनले. क्षेमधन्वाचा मुलगा हा देवतांच्या सेनेचा प्रमुख होता म्हणून त्याचं नावं देवानीक ठेवण्यात आले होते.

राजा देवानीक यांच्यानंतर त्यांचा मुलगा अहीनगु राजा बनला. त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले. ते एवढे चांगले राजा होते की त्यांचे शत्रू देखील त्यांच्या मोहात पडायचे.

 

raghuvansh-inmarathi05

 

राजा अहीनगु नंतर त्यांचा मुलगा पारीयात्र आणि त्यानंतर त्यांचा मुलगा आदि राजा बनले. तसे तर रघुवंशाचे वारस आजही आहेत, पण सुमित्रा हे अयोध्येचे शेवटचे राजा असल्याचं मानल्या जाते.

स्त्रोत : speakingtree

हे ही वाचा – भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत दहा आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?