' 'ह्या' भिकाऱ्याचे थाट बघून तुम्हालाही हेवा वाटेल

‘ह्या’ भिकाऱ्याचे थाट बघून तुम्हालाही हेवा वाटेल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण जेव्हाही कुठे जात असतो, तेव्हा जर रस्त्यात कुठे ट्राफिक सिग्नल लागला की, लगेच एखादी मुलगी एका छोट्याश्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन समोर येते, लहान लहान मुले गाड्यांच्या काचांवर मोठ्या आशेने हात मारतात, एखादा अपंग व्यक्ती एक-दोन रुपयांसाठी आपल्यासमोर हात पसरवतो. त्यांची अशी स्थिती बघून आपणही लगेच खिश्यातून पैसे काढून त्यांना देतो. विचार करतो की, आणखी काही नाही पण त्याच्या एक वेळेच्या पोटा-पाण्याची सोय होऊन जाईल.

 

beggars-inmarathi01
deccanchronicle.com

 

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ह्या भिकाऱ्यांची कमाई किती असेल? नक्कीच नाही… जे लोकं रस्त्यावर भिक मागतात त्यांची काय बरे कमाई असेल असेच आपल्याला वाटते. पण असे असेलच हे कशावरून…

गरीब, बिचारे दिसणाऱ्या ह्या भिकाऱ्यांची कमाई एवढी असते की, ते स्वतःचे वेगवेगळे व्यवसाय देखील करतात… विश्वास होत नाहीये ना. पण झारखंडमधील ४० वर्षीय छोटू बराईक यांची कमाई ऐकून तुम्ही यानंतर कुठल्याही भिकाऱ्याला भिक देण्याआधी दोनदा विचार नक्कीच कराल.

 

chhotu Baraik-inmarathi02

 

झारखंड येथे राहणारा छोटू बराईक याने चक्रधर रेल्वे स्टेशनवर आपले ठाण मांडले आहे. जिथे तो रेल्वे गाड्यांमध्ये जाऊन भिक मागतो.

 

chhotu Baraik-inmarathi01

 

या शिवाय छोटू भंगारच्या सामानाचा डिस्ट्रीब्यूटर देखील आहे. हे सामान तो ट्रेनमध्ये विकतो. याकरिता त्याने काही मुलांना नोकरीवर देखील ठेवले आहे. या व्यतिरिक्त छोटूचे सिमडेगा जिल्ह्यात भांड्याचं दुकान देखील आहे, ज्याला त्याची पत्नी चालवते. एवढचं नाही तर भिक मागणारा हा भिकारी एवढ्या महागाईच्या जमान्यात एक नाही तर तीन बायका सांभाळतो.

इंडिया टाईम्सच्या बातमीनुसार, छोटू बराईक दर महिन्याला ‘तीन लाख’ रुपये कमावतो. जे तो त्याच्या तीन बायकांमध्ये वाटतो. याचे थाट तर भल्या-मोठ्यांनाही जमायचे नाही.

 

chhotu Baraik-inmarathi

 

इथे एवढं शिक्षण घेऊन, इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए करून देखील आपण जेमतेम कमावतो आहे, तिथे हा रेल्वे स्टेशनवर भिक मागणार छोटू बराईक म्हणजे आपल्यासोबत घडलेला एक अपघातच वाटतो आहे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?