' तुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का? जाणून घ्या

तुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का? जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आधारकार्ड हा आता आपण या देशाचे नागरिक असल्याचा सर्वात मोठा पुरावा झाला आहे, कारण आज कोणत्याही ठिकाणी सर्वात आधी आधारकार्ड पुरावा म्हणून मागितला जातो. आता आधारकार्ड हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे, असे देखील सरकार सांगते. पण या तुमच्या आधारकार्डची माहिती खरचं सुरक्षित आहे का? आता तुम्ही विचार कराल की, आम्ही असे का बोलत आहोत? पण आज आम्ही याचविषयी काही माहिती देणार आहोत. तुम्ही आधारकार्ड काढून निश्चिंत झाले असाल की, आता आपल्याकडे आपल्याबद्दलचा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. पण हा तुमचा विचार चुकीचा आहे. आज तुमची आधारकार्डची माहिती कधीही चुकीच्या हातामध्ये पडण्याची भीती निर्माण झालेली आहे.

 

Aadhar card Data unsafe.Inmarathi
thecitizen.in

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आधारकार्ड बनवणारी अथॉरिटी UIDAI ने देशातील लोकांना हे आश्वासन दिले होते की,

‘आधारकार्डचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हा डेटा कोणत्याही प्रकारे लिक होऊ शकत नाही.’

पण एका इंग्लिश वर्तमानपत्राच्या एका तपासामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामध्ये हे लक्षात आले आहे की, तुमच्या आधाराकार्डची माहिती जराही सुरक्षित नाही. या तपासामध्ये हे समजले आहे की, फक्त ५०० रुपये देऊन आणि १० मिनिटांच्या आतमध्ये देशभरातील कोट्यावधी लोकांच्या आधारकार्डची माहिती मिळवली जाऊ शकते. द ट्रिब्यूनच्या रिपोर्टरने व्हाॅट्सग्रुपच्या मदतीने फक्त ५०० रुपयांमध्ये ही सेवा खरेदी केली आणि त्याला जवळपास सर्वच भारतीयांच्या आधारकार्डचे अॅक्सेस मिळाले.

 

Aadhar card Data unsafe.Inmarathi1
deccanherald.com

खरेतर या तपासामध्ये एका एजंटबद्दल माहिती मिळाली, ज्याने स्वत: चे नाव अनिल कुमार सांगितले. अनिलने एक अॅक्सेस पोर्टल बनवायला सांगितले. अनिलने रिपोर्टरकडून नाव, ई – मेल आणि मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर अनिलने रिपोर्टरला एक नंबर दिला, ज्यावर पेटीएममधून ५०० रुपये ट्रान्सफर करायला सांगितले.

पैसे मिळाल्यानंतर एजंटने फक्त १० मिनिटामध्ये एक गेटवे दिला आणि लॉग – इन पासवर्ड दिला. त्यानंतर त्यांना फक्त आधारकार्डचा नंबर टाकायचा होता आणि कोणत्याही व्यक्तीविषयीची खाजगी माहिती त्यांना सहज मिळाली.

यानंतर अनिल कुमारने या आधारकार्डचे प्रिंट काढण्यासाठीचे बोलले तेव्हा पेटीएमच्या सहाय्याने परत ३०० रुपये घेतले. त्यानंतर रिमोटने ‘टीम व्युवर’ च्या माध्यमातून तपास करणाऱ्या रिपोर्टरच्या संगणकामध्ये एक सॉफ्टवेअर इंस्टॉल केले आणि जसे काम संपले तसे त्याने सॉफ्टवेअर डिलीट केले. या सॉफ्टवेअरच्या मदतीने आता कोणताही आधार नंबर टाकून त्याची संपूर्ण माहितीसकट आधारकार्डला प्रिंट केले जाऊ शकते.

 

Aadhar card Data unsafe.Inmarathi2
theweek.in

या प्रकरणाबद्दल समजल्यावर यूआयडीएआयचे अधिकारी चकित झाले आणि त्यांनी लगेचच बंगळूरूच्या टेक्निकल टीमला याबद्दल सांगितले. चंदिगढमध्ये यूआयडीएआयची रिजनल अॅडीशनल डायरेक्टर जनरल संजय जिंदलने सांगितले की,

‘जर हे खरचं झाले असेल तर हे खूपच चकित करणार आहे, कारण डायरेक्टर जनरल आणि माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाकडे ही लॉग इन पासवर्ड नाही पाहिजे.’

रिपोर्टनुसार, हा ग्रुप जवळपास गेल्या सहा महिन्यापासून सक्रीय आहे. या रॅकेतटने सुरुवातीला त्या तीन लाख ग्रामीण लोकांना टार्गेट केले, ज्यांनी सूचना प्राद्योगिक मंत्रालयाकडून कॉमन सर्विस सेंटर स्कीमच्या रुपात सेंटर उघडले होते.

नवी दिल्लीच्या कन्वेयर गोपाल कृष्णननुसार, या लीकेजचा अर्थ हो होतो की, आधार प्रायव्हसी टेस्टमध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. डेटा प्रोटेक्शन कायद्याचा कोणताही अर्थ उरलेला नाही, कारण डेट्याशी तर आधीच छेडछाड झालेली आहे.

अशा या प्रकरणामुळे हे समजते की, आता आपल्या आधारकार्डची माहिती गुप्त ठेवण्यात यूआयडीएआय अपयशी ठरली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?