' यावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार

यावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाबद्दल तुम्हाला माहिती असेलच. नासाची स्थापना २९ जुलै १९५८ मध्ये करण्यात आली. अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळ संशोधन कायद्यान्वये आधीच्या नॅशनल अॅडवायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासाची स्थापना करण्यात आली. नासा ही अंतराळामध्ये संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. नासाचे खरे कामकाज १ ऑक्टोबर १९५७ पासून सुरु झाले. नासा ही अंतराळामध्ये शोधकार्य करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. जगातील मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी नासाबरोबर काम केले आहे.

 

America nasa spacecraft.inmarathi
climateprotection.org

नासा नेहमीच अंतराळामध्ये नवनवीन गोष्टींचा शोध घेत असते. त्यांनी आतापर्यंत अंतराळातील खूप मोहिमी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. नासाने अंतराळातील संपूर्ण चित्र जगासमोर ठेवले. आज आम्ही तुम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये नासा घेऊन येणाऱ्या नवीन मोहिमेबद्दल सांगणार आहोत, या मोहिमेमध्ये नासा सूर्याच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, नासाच्या या नवीन वर्षाच्या मोहिमेबद्दल..

याच नासाला यावर्षी म्हणजे २०१८ मध्ये ६० वर्ष पूर्ण होतील. ही एजन्सी या नवीन वर्षामध्ये कितीतरी अभियान लॉन्च करणार आहे. यामध्ये कितीतरी काळापासून अपेक्षित असलेली सौर मोहीम देखील समाविष्ट आहे. याच क्रमाने सूर्याच्या बाहेरचे आवरणाचे माहिती एकत्रित करण्यासाठी नासा पार्कर सोलर प्रोब मोहीम सुरु केली जाईल.

 

America nasa spacecraft.inmarathi1
indianexpress.com

या मोहिमेमध्ये प्रक्षेपित करण्यात येणारे यान सात वर्षामध्ये सात वेळा सूर्याच्या कक्षाच्या जवळ जाऊन त्याची अन्वेषण करेल. सूर्याच्या जवळ पोहोचण्यासाठी शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण बलाचा वार करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती देताना नासाने सांगितले आहे कि, हे अंतराळातील यान सूर्याची वातावरणाच्या सीमेच्या ६२ लाख किलोमीटर जवळ जाईल. या आधी कोणत्याही मोहिमेमध्ये सूर्याच्या एवढ्या जवळ पाहोचता आलेले नाही.

पार्कर सोलर प्रोब असे अशा क्षेत्रामध्ये पोहोचून वातावरणाचे तपासणी करेल जिथे रेडिएशन आणि गर्मीचा सर्वात जास्त प्रभाव होतो. खगोलशास्त्रज्ञ या मोहिमेच्या मदतीने हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल कि, सूर्याच्या बाहेरील आवरण म्हणजेच कोरोनामधून कोणत्या प्रकारच्या ऊर्जा आणि हिटिंगचा प्रवाह असतो. त्याचबरोबर हे देखील तपासण्यात येणार आहे कि, सूर्यापासून निघणारी हवा आणि ऊर्जा यांच्या कणांचा वेग कसा वाढतो.

 

America nasa spacecraft.inmarathi2
newatlas.com

सौर मोहीमेच्या व्यतिरिक्त नासा या वर्षी मंगळ ग्रहावर देखील आपली उपस्थिती वाढवेल. नासा पृथ्वीवर असलेल्या बर्फला, समुद्र किनारपट्टी आणि भू – जल यांच्याविषयी माहिती आणि काही आकडे मिळवण्यासाठी नासा आयसीईएट – २ आणि जीआरएसीई नावाच्या दोन नवीन पिढीच्या मोहिमेला लाँच करण्याची तयारी करण्याच्या तयारीमध्ये देखील आहे.

अशा या नवीन वर्षामध्ये नासा खूप नवीन मोहीम घेऊन येणार आहे आणि नेहमी सारखेच जगापुढे काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?