'१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या "खोट्या प्रचाराचा" इतिहास!

१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

“सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या की नाही” ह्या प्रश्नाचा सूर अधूनमधून उठत असतो. आपल्याला स्वतःहून खरे-खोटे नं करता येणारे असे बरेच विषय आणि घटना दररोज घडतात.

अश्या वेळेस जर पुरेशी माहिती उपलब्ध नसेल तर तुमच्या कडे एकच पर्याय उरतो – तो म्हणजे माहिती पुरवणाऱ्याची विश्वासहर्ता बघणे. ह्या कसोटीत भारतीय सैन्य १००% उत्तीर्ण होते.

Indian Army च्या म्हणण्यानुसार सर्जिकल स्ट्राईक्स झाल्यात आणि आपण LOC च्या across असलेले terrorist launchpads नष्ट केलेत.

ह्या source ला तुम्ही objectively पाहीलं तर तुम्ही त्यांच्यावत विश्वास ठेवू शकता कारण – Indian Army आणि Indian Govt ने कधीही आपल्याला आपण १९६२ चे चीन सोबत लढलेले युद्ध “जिंकलो” आणि “आपण त्यांचा कुठला प्रदेश हस्तगत केलाय” असे कधीही सांगितले नाही.

ह्याच्या उलट लहानपणापासूनच आपल्याला हे माहित आहे की १९६२ चे युद्ध आपण हरलो आणि चीन ने आपला Aksai Chin हा प्रदेश बळकावला.

 

indo-china-inmarathi
indiatoday.in

Indian Army आणि Indian Govt. देशाच्या सुरक्षेबाबतीत कधी खोटे बोललेत असा इतिहास नाही, त्यामुळे असं मत बनवण्याचे कुठलेही कारण नाही.

याउलट पाकिस्तान आर्मीचा, देशातील लोंकाना खोटे बोलायची चांगलीच सवय आहे आणि तो इतिहास सर्वज्ञात आहे.

१९७१ चं बांगलादेश स्वतंत्र होतानाचं भारत-पाकिस्तान मध्ये झालेला युद्धंच बघा. बांगलादेश हा तेव्हाचा पूर्व पाकिस्तान होता. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली.

ज्या दिवसाला ‘Fall of Dhaka’ म्हणून संबोधतात त्या दिवसापर्यंत बांगलादेशमधील आणि पाकिस्तान मधील वर्तमानपत्रे काय छापायचेत ते पाहुयात. आणि हो त्यांचा information source हा होता पाकिस्तानी Army…!

पाकिस्तान जिंकतोय, जिंकला ह्या बातम्या दररोज छापून यायच्या.

lies-of-pakistan-media-army-and-media-01

 

लोकांना सगळे काही सुरळीत चालले आहे हे दाखवण्यासाठी अधून मधून Gossip आणि मसाला news पण छापायचे .

Morning News ह्या दैनिकाने “Mini -Skirts च्या लोकप्रियते” बद्दल एक आर्टिकल ही छापले.

 

lies-of-pakistan-media-army-and-media-02

Morning News ह्या दैनिकाची ११ डिसेंबर १९७१ ची धादांत खोटी हेडलाईन, जेव्हा युद्ध जोरावर होते :

 

lies-of-pakistan-media-army-and-media-03

२२ आणि २३ जानेवारी १९७२ ला होणाऱ्या सैन्य भरतीची advertisement.

सगळं कसं सुरळीत चाललंय हे दाखवायचा आणखी एक प्रयत्न:

lies-of-pakistan-media-army-and-media-04

 

१९६५ च भारत-पाकिस्तान युद्ध पाकिस्तानने जिंकले होते आणि १९७१ लाही तेच होईल असे भाकीत करणारे दैनिक!!!

 

lies-of-pakistan-media-army-and-media-05

 

Fall of Dhaka होण्याच्या फक्त ३ दिवस आधी छापून आलेली पाकिस्तान Observer मधील हा मथळा.

 

lies-of-pakistan-media-army-and-media-06

 

आणि ३ दिवसांनी बांगलादेश स्वतंत्र झाला आणि जनरल नियाझी ने ९०,००० सैनिकांसह surrender केलं…!

 

lies-of-pakistan-media-army-and-media-07

तुम्हीच ठरवा कोणावर विश्वास ठेवायचा ते…!

स्वतःच्या देशाचे तुकडे होईपर्यंत लोकांपासून लपवणारांच्या म्हणण्याकडे की तुमच्या स्वतःच्या सैन्याच्या, ज्याने कधीही खोटं बोललेलं नाही!

शेवटी food for thought:

पाकिस्तानी Army ने जर सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे मान्य केले असते, तर तिथल्या लोकांच्या समाधानासाठी त्यांनाही भारताविरुद्ध काहीतरी करावे लागले असते. हे प्रकरण उत्तरोत्तर वाढत जाऊन ह्याचे रूपांतर एका युद्धात झाले असते. ऑपेरेशन झर्रब-ए -अरब मध्ये आणि अफगाणिस्तान बॉर्डर वर पाकिस्तानचे भरपूर सैन्य सध्या तैनात आहेत. पाकिस्तानची सद्य परिस्थिती पाहता त्यांना युद्ध मुळीच नकोय.

म्हणूनच – अशा स्थितीत सर्जिकल स्ट्राईक्स झाल्याच नाहीत असे म्हणण्यातच पाकिस्तानची हुशारी आहे.

इमेज आणि माहिती स्रोत: tribune.com.pk

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Anup Kumbharikar

Author @ मराठी pizza

anup has 5 posts and counting.See all posts by anup

3 thoughts on “१९७१ चं युद्ध: पाकिस्तानी सैन्याच्या “खोट्या प्रचाराचा” इतिहास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?