'वजन कमी करून फिट रहाण्यासाठी एक नवा "कौटुंबिक" आदर्श

वजन कमी करून फिट रहाण्यासाठी एक नवा “कौटुंबिक” आदर्श

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

वजन कमी करणे हे त्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असत जो त्याच्या वाढत्या वजनाने त्रासलेला असतो. पण वजन कमी करणे हे वाटते तेवढे सोपे नसते. प्रत्येक वेळी आपण वजन कमी करण्याचा निश्चय करतो पण हा निश्चय काही दिवसांतच अयशस्वी होतो आणि मग आपण निराश होतो. कितीही काही केले तरी जिभेवर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम करणे हे काही सोपे नसते. पण असं म्हणतात की, जे काम एकट्याने होत नसेल ते सर्वांनी सोबत मिळून करायला हवे, याने आपलं लक्ष नेहमी आपल्या ध्येयाकडे असते आणि जर आपण भरकटलो तर इतर आपल्याला त्या ध्येयाची आठवण करवून देतात.

 

jesse-family-inmarathi05

 

असेच काहीसे फोटोग्राफर  Jesse याने देखील केले आहे.

 

jesse-family-inmarathi01

 

३२ वर्षीय Jesse याने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत सामुहिकपणे वजन कमी करण्याचा निश्चय केला. ६ महिन्यांच्या कठीण परिश्रमानंतर त्यांच्या या निश्चयाचा जो निकाल समोर आला आहे तो खरच थक्क करणारा आहे.

 

jesse-family-inmarathi02

 

त्यांनी वजन कमी करण्याआधी आणि वजन कमी केल्यानंतर घेतलेले फोटोज खरच आपल्यातील सर्वांना प्रेरणा आणि एक वेगळीच उर्जा देऊन जातील…

 

jesse-family-inmarathi03

 

Jesse यांनी हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा त्यांची आई Jesse आणि त्यांच्या पत्नीसोबत राहायला आली. तेव्हा Jesse यांची पत्नी गर्भवती होती त्यामुळे त्यांची आई त्यांच्या पत्नीच्या देखभालीकरिता आली होती. काही दिवसांनी Jesse यांनी त्यांच्या वडिलांना देखील आपल्या सोबत राहायला येण्यास आमंत्रित केले.

 

jesse-family-inmarathi09

 

यावेळी Jesse यांनी Weight Loss Program बद्दल विचार केला.

 

jesse-family-inmarathi07

 

यासाठी सर्वातआधी Jesse आणि त्यांच्या वडिलांनी फास्ट चालण्यास सुरवात केली, त्यानंतर त्यांनी जॉगिंगला सुरु केली आणि त्यानंतर त्यांनी जिम जायला सुरवात केली. यासोबतच हे लोकं दर १० दिवसांनी आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांना नोट करत होते.

 

jesse-family-inmarathi08

 

आधी या कुटुंबाने १० मार्च ते ३० सप्टेंबर पर्यंतचा टार्गेट ठेवला होता, पण त्यानंतर व्यायाम करणे ही त्यांची सवय झाली. यातून जो परिणाम समोर आला आहे तो खर्च आश्चर्यचकित करून सोडणारा आहे.

 

jesse-family-inmarathi06

 

कदाचित यालाच आपण एकीचे बळ म्हणतो जे या कुटुंबाने करून दाखवले आहे… नाही का?

 

jesse-family-inmarathi

 

यातून आपण खरच प्रेरणा घेऊ शकतो. आपल्यातील किती असे लोकं आहेत जे दरवर्षी एक निश्चय करतात की, आता मी नियमित व्यायाम करील, वजन कमी करील पण ते कधीच होत नाही कारण आपल्यात त्या इच्छाशक्तीची कमी असते. पण तेच जर आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत केलं तर आपल्याला त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी असते आणि त्यामुळे आपण सोबत मिळून Jesse ने करून दाखवल ते करू शकतो…

स्त्रोत : BoredPanda

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?