' ‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल – InMarathi

‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंगळूरू शहरातील ३४ वर्षीय शिल्पा या ‘Halli Mane Rotties’ नावाने एक फूड ट्रक चालवतात. त्यांची कहाणी जेवढी रंजक आहे तेवढीच प्रेरणादायी देखील आहे. Hassan येथील शिल्पा या एका शेतकरी कुटुंबातून येतात. २००५ साली त्या त्यांच्या पती सोबत मंगळूरू येथे स्थायिक झाल्या.

 

सुरवातीला सर्व ठीक सुरु होते, पण २००८ च्या फेब्रुवारी महिन्यात शिल्पाचा पती बंगळूरूला काही कामा करिता गेले आणि ते तिथे हरवले. सर्वांनी खूप शोधलं पोलिसांत तक्रार देखील दाखल केली पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.

पतीच्या न भेटल्याने शिल्पा हताश-निराश झाल्या. त्यांच्या आई-वडिलांची तब्येत खालवायला लागली. आता आई-वडील, तिचा भाऊ आणि ३ वर्षाच्या मुलाच्या पालन-पोषणाची जबाबदारी शिल्पावर येऊन ठेपली.

४ लोकांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असल्याने शिल्पाने आधी एका सायबर कॅफेमध्ये नोकरी केली, त्यानंतर तिने एका कॉस्मेटिक स्टोअरमध्ये नोकरी केली पण तिचे वय जास्त असल्या कारणाने तिला तिथे काम करता आले नाही.

एकेदिवशी घरचे सर्व बोलत बसले होते तेव्हा सर्व शिल्पाच्या हातच्या जेवणाची स्तुती करत होते. त्यातही तिच्या हातचे उत्तरी कन्नड जेवणाची. तेव्हा शिल्पाला Food Joint सुरु करण्याची कल्पना सुचली.

 

kannad-inmarathi01

 

तिने तिच्या भावाला समजावले आणि दोघांनी मिळून Food Joint सुरु केले. विना पैश्याने कुठलाही बिसनेस सुरु होत नाही. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी शिल्पाने १ लाखाची बचत केली होती. शेवटी तिला ते एक लाख रुपये काढावे लागले आणि त्यातून त्यांनी महिंद्रा बोलेरो पिक-अप ट्रक घेतला आणि त्यातच आपलं Food Joint सुरु केलं.

तुम्ही चांगल काम करा किंवा वाईट लोकं तुम्हाला काही ना काही कारणावरून सुणावनारच, शिल्पाला देखील लोकांचे बोलणे सहन करावे लागले, त्या सांगतात की,

सर्वात जास्त आम्हाला या गोष्टीसाठी ऐकाव लागलं की आम्ही दक्षिण कन्नडमध्ये उत्तरी कन्नड खाण्याचे दुकान लावत आहोत. एवढच नाही तर आम्हाला देखील आमच्या या Food Jointच्या आयडियावर संशय होताच पण आमच्याकडे आणखी कुठलाही पर्याय नव्हता. कारण मला केवळ उत्तरी कन्नड जेवणच बनवता यायचे.

 

kannad-inmarathi02

 

शिल्पाने २०१५ साली आपलं Food Joint व्यवसाय सुरु केला आणि हा व्यवसाय एवढा चालला की स्वतः शिल्पाला देखील यावर विश्वास झाला नाही. शिल्पा या सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत आपलं Food Joint सुरु ठेवतात. यादरम्यान त्यांचा रोजचा ३ ते ७ हजार रुपयांची कमाई होते.

त्यांच्या Food Joint वर येणाऱ्या ग्राहकांबद्द्ल सांगताना शिल्पा सांगतात की,

“येथे येणारे ८० टक्के ग्राहक हे दक्षिणी कन्नड असतात. त्यात डॉक्टर, विद्यार्थी अश्या प्रत्येक क्षेत्रातील लोकं असतात. जे माझ्या Food Joint वर घरचे जेवण खायला येतात.”

त्यांच्या येथे येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या Food Joint ला गुगल मॅप्स वर टाकले ज्यामुळे शिल्पाला ऑनलाईन ओळख देखील मिळाली.
शिल्पा यांच्या Food Joint मिळणारी प्रत्येक वस्तू ही तिच्या घरून येते. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते. शिल्पा यांचा भाऊ चिरंजीवी याने देखील त्याची सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडून शिल्पाची मदत करण्याचा निश्चय केला.

आता शिल्पा यांचा फेब्रुवारी महिण्यात आणखीन एक नवीन Outlet उघडण्याच्या विचारात आहे.

 

anand-mahindra-inmarathi

 

महिन्द्रा काम्पिनीचे सीईओआनंद महिन्द्रा यांची नजर शिल्पावर पडली आणि त्यांनी शिल्पाच्या फूड ट्रकमध्ये इन्वेस्ट करण्याचा निर्णय घेतला.

यासंबंधी आनंद महिन्द्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर लिहिले की,

 

anand-mahindra-inmarathi01

या आठवड्यात मला Entrepreneurship ची एक छान कहाणी वाचायला मिळाली. आम्ही महिन्द्रामध्ये याला ‘Rise Story’ म्हणतात. मी खूप आनंदी आहे की, बोलेरोने त्यांच्या व्यवसायात एक छोटीशी भूमिका निभावली. काय कोणी त्यांना हे सांगेल की मी त्यांच्या व्यवसायात इन्वेस्ट करण्यास इच्छुक आहे.

 

anand-mahindra-inmarathi02

 

आनंद महिन्द्रा यांनी हे देखील सांगितले की, शिल्पा यांना कुठल्याही प्रकारच्या चॅरीटीची गरज नाही. त्या स्वतः एक यशस्वी Entrepreneur आहेत. मी तर केवळ त्यांच्या व्यवसायात इन्वेस्ट करण्यास इच्छुक आहे.

खरच शिल्पा यांची ही कहाणी आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

स्त्रोत : गजब-पोस्ट

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?