' पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर भारताचं प्रत्युत्तर काय असेल? – InMarathi

पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर भारताचं प्रत्युत्तर काय असेल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पाकिस्तानच्या कुरापती मागील काही काळात बऱ्याच वाढल्या आहेत. उरी हल्ला तर या सर्व कुरापतींचा कळसच म्हणावा लागेल. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राईक सारखं प्रभावी अस्त्र वापरलं आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.

या चढाईमुळे पाकिस्तानचा भयंकर तिळपापड झाला. त्यांच्या काही महाभागांकडून तर सरळ युद्धाचं आव्हान दिलं गेलं. पण तसं घडणं दुरापास्तच! कारण ज्या देशांच्या भरवश्यावर पाकिस्तान उड्या मारतोय त्या देशांच्या पलटी मारण्याची पद्धत पाकिस्तानला देखील ठाऊक आहे.

अंगाशी आल्यावर हेच देश पाकिस्तानचा बळी देण्यास देखील मागे पुढे पाहणार नाहीत… त्यामुळे पाकिस्तान असं निर्बुद्धी कृत्य करण्यास धजावणार नाही हे नक्की!

पण आपण गृहीत धरू की अणुशस्त्रांनी सज्ज असलेल्या पाकिस्तानने भारतावर आण्विक हल्ला केला तर भारताचं प्रत्युत्तर काय असेल?

(भारताने असाच अणु-हल्ला पाकिस्तानवर करावा, असं अनेक भारतीयांना देखील वाटतं. पण हे किती चूक आहे, हे समजून घेण्यासाठी वाचा: १) “पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास , २) पाकिस्तानचं करावं तरी काय? )

 

india-pak-nuclear-rivalry-marathipizza01

स्रोत

सेकंड स्ट्राईक: जशास तसे उत्तर देणारी technology

 

india-pak-nuclear-rivalry-inmarathi

 

सर्वात पहिले, हे जाणून घेणं महत्वाचं आहे की उद्या पाकिस्तानने आपल्यावर आण्विक हल्ला केला तर आपल्याला त्याची खबर मिळू शकेल का?

गेल्या काही वर्षांपासून भारत एक असे तंत्रज्ञान विकसित करत आहे ज्याच नाव आहे सेकंड स्ट्राईक.

आण्विक भाषेत सांगायचे झाले, तर हे असे तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये समजा एखाद्या देशावर आण्विक हल्ला झाला तर तो देश लगेच समोरच्या शत्रूवर पलटवार म्हणून आण्विक हल्ला करू शकतो.

म्हणजेच भारतावर कोणी आण्विक हल्ला केला तर भारत त्वरित त्या हल्ल्याचं आण्विक हल्ल्यानेच प्रत्युत्तर देऊ शकतो. हेच कारण आहे की पाकिस्तान आण्विक हल्ल्याच्या केवळ बाताच मारणार…  प्रत्यक्ष कृती करण्याची हिम्मत दाखवणार नाहीच.

भारतातर्फे करण्यात आलेल्या अणुकरारानुसार, “भारत कोणत्याही प्रकारच्या आण्विक हल्ल्याला सुरुवात करणार नाही, परंतु शत्रू देशाने प्रथम आण्विक हल्ला केला तर मात्र प्रत्युत्तरादाखल भारत अणू बॉम्बचा वापर करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही.”

 

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

india-pak-nuclear-rivalry-inmarathi

स्रोत

भारतीय बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रोग्रामवर आपल्या देशाने भरपूर मेहनत घेतली आहे. कारण पाकिस्तान केवळ आपल्या आण्विक क्षेपणास्त्रांनीच भारतावर हल्ला करू शकतो. हेच लक्षात घेऊन भारताने हा प्रोग्राम चालवण्याचा निर्णय घेतला.

सोबतच पृथ्वी एयर डिफेन्स (PAD) आणि अॅडव्हान्स एयर डिफेन्स (AAD) हे प्रोग्राम देखील चालवले. या तंत्रज्ञानामुळे समोरून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना ५००० किलोमीटर अंतरावरून उडवले जाऊ शकते.

२००६ या वर्षी PAD आणि त्याच्या पुढच्याच वर्षी AAD प्रोग्रामची यशस्वी चाचणी करून अमेरिका, रशिया आणि इज्राईल नंतर भारत हा चौथा देश बनला आहे ज्याच्याकडे अॅन्टी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे.

येणाऱ्या काळात याच सिस्टमच्या आधारे भारतातील सर्वच शहरे एका सक्षम डिफेन्स सिस्टमने सुरक्षित होतील.

गुप्तहेर संस्था

 

raw inmarathi

 

आण्विक हल्ला काही मिनिटांमध्ये करता येत नाही. त्याची योजना आखणे आणि अंमलबजावणी करणे या प्रक्रियेला चांगलाच वेळ लागतो. पाकिस्तानने असा प्रयत्न कधी केला तर ती बातमी फुटायला फारसा वेळ लागणार नाही.

कारण CIA (अमेरिका), RAW (भारत) आणि MOSSAD (ईज्राईल) सारख्या जागतिक दर्जाच्या गुप्तहेर संस्था पाकिस्तान सारख्या देशांवर करडी नजर ठेवून आहेत.

भारताचे मित्र असलेल्या देशांच्या गुप्तहेर संस्था देखील अशी एखादी बातमी कानी पडल्यास ती भारताला कळवल्याशिवाय राहणार नाहीत, याची पूर्ण व्यवस्था भारताने करून ठेवली आहे.

त्यामुळे या गुप्तहेर संस्थांच्या डोळ्यांखालून भारतावर आण्विक हल्ला करणे पाकिस्तानसाठी तसे महाकठीण काम! आणि आज जागतिक पटलावर अशी स्थिती आहे की कोणताही देश आण्विक हल्ल्याचं समर्थन करणार नाही… कारण त्यांना ते परवडण्याजोगंच नाहीये.

पाकिस्तानचा जिगरी दोस्त ‘चीन’ देखील आण्विक हल्ल्याचं समर्थन करणार नाही हे देखील नक्की.

भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झाले तर त्याचे भयंकर मोठे परिणाम जागतिक स्तरावर दिसून येतील. या युद्धामुळे भारत आणि पाकिस्तानवर अवलंबून असलेल्या कित्येक देशांना फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. जगातिक बाजारात मोठी घसरण होईल ती वेगळीच…

हे माहित असल्यामुळेच संयुक्त राष्ट्र देखील दोन्ही देशांना आपसातले वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा सल्ला देत आहे.

थोडक्यात – पाकिस्तानच्या कुरापतींना सर्व तर्हेने प्रत्युत्तर देण्यास भारत सक्षम आहे. 🙂

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?