' समुद्राखालील जगात शिरण्यासाठी या हॉटेल्सची दारं कायम उघडी असतात! – InMarathi

समुद्राखालील जगात शिरण्यासाठी या हॉटेल्सची दारं कायम उघडी असतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण फिरायला जायचे ठरवले की, आपण प्रत्येक गोष्टीची माहिती काढायला सुरुवात करतो. तिथे कसे जायचे, कुठे राहायचे, काय बघायचे, काय करायचे, हे सर्व आपण ठरवतो आणि त्याचे प्लॅनिंग करतो. फिरायला जाण्याआधी नेहमी आपण जिथे राहणार आहोत, त्या हॉटेल्सची संपूर्ण माहिती काढतो आणि त्यांच्याकडे आपली सोय कशी होईल, याबद्दल चौकशी करतो.

त्यानंतरच आपण तिथे राहण्यासाठी जातो. सुंदर रूम, आरामदायी बेड, हॉटेलच्या बाहेर निसर्गरम्य देखावा आणि उत्तम सोय याची पाहणी करूनच आपण हॉटेल नक्की करतो.

हॉटेल हे फिरायला गेल्यावर राहण्यासाठीचे आपले महत्त्वाचे ठिकाण असते. काही हॉटेल्स तर खूपच अप्रतिम असतात. अशा सुंदर आणि आरामदायी हॉटेल्सकडे आपण आपोआपच आकर्षिले जातो.

आज आम्ही तुम्हाला अशा काही हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत, जी पाण्याखाली बांधली गेली आहेत आणि यांच्यामधून तुम्ही पाण्याच्या आतमधील जगाला अनुभवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, या हॉटेल्सबद्दल..

१. Conrad Rangali Island, मालदीव

 

Conrad Rangali Island, maldives InMarathi

न्यूयॉर्क डेलीनुसार, कॉनराड हे जगातील सर्वात सुंदर रेस्टॉरंट आहे. जो पाण्याच्या आतमध्ये १६ फूट किंवा ५ मीटर आतमध्ये १८० डिग्री पॅनोरमिक व्यूव्ह देतो. येथे बारा सीट्स आहेत, पण दोन व्यक्तींसाठी येथे रात्रीसाठी स्वीट्स देखील बुक केले जाते.

२. Anantara Kihavah Villas, मालदीव

 

anantara kihavah InMarathi

 

किहाव्हा त्या निवडक अंडरवॉटर रेस्टॉरंट आहे, जिथे तुम्हाला खूपच चविष्ट जेवण खाण्याबरोबर वाइन्स पण सर्व्ह केली जाते.

३. Per Aquum Niyama, मालदीव

 

niyama private islands maldiv InMarathi

 

मालदीवमध्ये तुम्हाला सगळीकडे समुद्री जीवन पाहायला मिळेल. पण येथे तुम्हाला अंडरवॉटर नाईट क्लब जो पाण्याच्या जवळपास २० फूट खाली आहे. येथे तुम्हाला या सुंदर पबमध्ये पाण्याखाली संगीतावर थिरकायला मिळणार आहे.

४. रिसॉर्ट वर्ल्ड, सेंटोसा, सिंगापूर

 

singapore sentosa InMarathi

 

सेंटोसा रिसॉर्ट हा जेवढा जमिनीवर आहे, तेवढाच तो पाण्याच्या आत आहे. जिथे तुम्ही पाण्याच्या आतमध्ये ४० हजार माशांमध्ये राहण्याबरोबरच तुम्ही येथे आऊटडोअर जकुझीचा आनंद देखील घेऊ शकता.

५. अटलांटिस द पाम, दुबई

 

atlantis the plam InMarathi

 

पाम झाडाच्या आकाराच्या या बेटावर बनलेल्या अटलांटिस हॉटेलमध्ये एकूण १५०० खोल्या आहेत. ज्याच्यामध्ये राहिल्यावर थोड्या-थोड्या वेळाने तुमची भेट डॉल्फिनशी होऊ शकते.

६. जुल्स अंडरसेआ लॉज

 

Jule-Verne-Lodge InMarathi

जुल्स अंडरसेआ लॉजमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला २१ फूट पाण्याच्या आतमध्ये जावे लागेल. या हॉटेलमध्ये तुम्ही जसजसे आतमध्ये जाल, तसतसे तुम्हाला हे समुद्री जीवन खूप आवडेल.

७. शिमावो वंडरलाईन इंटरकॉनटीनेंटल, चीन

 

shimao wonderland chaina InMarathi

शिमावो वंडरलाईन इंटरकॉनटीनेंटल हे हॉटेल शांघायपासून जवळपास ३० मैल अंतरावर चीनमधील सॉंगजिंग येथे एका निष्करीत खड्याच्या जागेवर तयार करण्यात आलेले आहे. या हॉटेलमध्ये जवळपास ३८० खोल्या आहेत.

अशी ही हॉटेल्स खूपच आकर्षक आणि लोकांना वेगळ्या जगतामध्ये आल्याचा अनुभव करून देतात. त्यामुळे अशा या मोहक हॉटेल्समध्ये एकदातरी नक्की जाऊन पहा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?