' त्याच्या जीन्सच्या खिश्यात “जाळ अन धूर संगटच”! – InMarathi

त्याच्या जीन्सच्या खिश्यात “जाळ अन धूर संगटच”!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आयफोन म्हणजे स्टेटस…आयफोन म्हणजे अटेंशन…! जगभरातील आयफोनच्या प्रसिद्धीमुळे ज्याच्याकडे आयफोन त्याचा रुबाबही तितकाच जास्त आणि आयफोन वापरणाऱ्याचा आयफोन बद्दल अभिमानही तितकाच दांडगा! त्यामुळे आयफोन बद्दल कोणतीही वाईट गोष्ट ऐकून घेणं त्यांना सहनच होत नाही. पण काही दिवसांपूर्वी अशी काही गोष्ट घडली की अवघ्या आयफोन चाहत्यांचा अभिमान क्षणार्धात खाली उतरला. आता त्यांना स्वत:जवळ असलेल्या आयफोनबद्दल देखील शंका वाटू लागली आहे…कारण घटनाच तशी घडलीये…

iphone-explosion-marathipizza01

स्रोत

न्यूजर्सी येथील बर्लिंगटन कौंटी मधील डॅरीन हॅलवेटी नामक एका शाळकरी मुलाच्या पॉकेटमध्ये आयफोनने पेट घेतला आणि सोशल मिडीयावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आयफोन 6 प्लस हे महागडं मॉडेल हा मुलगा वापरीत होता. पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवलेल्या आयफोनने पेट घेतला आणि या पोट्ट्याला ते कळलंच नाही.

डॅरीनच्या म्हणण्यानुसार त्याने शारीरिक विज्ञानाच्या तासाला पेन घेण्यासाठी पॅन्टच्या मागच्या खिशाला हात लावला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्यातून धूर येतो आहे आणि त्याचा खिसा पूर्णत: जळालेला आहे.  जेव्हा डॅरीनने आयफोनला हात लावला तेव्हा त्याला जोराचा चटका बसला इतका आयफोन तापला होता. आणि त्यातून सारखा धूर येत होता. हे पाहताच डॅरीनने घाबरून आयफोन मैदानावर फेकून दिला. त्याच्या बाजूला बसलेल्या रेबेका बुकबाईंडर या त्याच्या वर्गमित्राने सांगितले की

हे सारे इतके अचानक झाले की आम्हाला काहीच कळले नाही. जेव्हा जाळण्याचा वास येऊ लागला तेव्हा माझे लक्ष डॅरीनकडे गेले.

iphone-explosion-marathipizza02

स्रोत

हा आयफोन डॅरीनकडे गेल्या सहा महिन्यांपासून होता आणि काही दिवसांपूर्वी त्यावर क्रॅक पडला होता. पण क्रॅक पडल्यामुळे आग लागू शकते हे मानायला डॅरीन तयार नाही. या गोष्टीची दाखल अॅप्पल कंपनीने घेतली आहे मात्र त्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजूनही अॅप्पलमार्फत दिली गेलेली नाही.

iphone-explosion-marathipizza03

स्रोत

काही दिवसांपूर्वीच सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 या फोनने देखील अचानक पेट घेतला. परंतु अॅण्ड्रोईड फोनच्या बाबतीत अश्या घटना यापूर्वीही घडल्या असल्याकारणाने त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नव्हते.

पण प्रतिष्ठित आयफोन सोबत घडलेल्या या घटनेमुळे स्मार्टफोन जगतात आयफोनच्या प्रतिष्ठेला मात्र मोठा काळा डाग लागलाय हे देखील तितकेच खरे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.


Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?