' ऐकावं ते नवलंच! तब्बल २० वर्षांपासून हॉर्न न वाजवता गाडी चालवणा-या काकांबद्द वाचून थक्क व्हाल – InMarathi

ऐकावं ते नवलंच! तब्बल २० वर्षांपासून हॉर्न न वाजवता गाडी चालवणा-या काकांबद्द वाचून थक्क व्हाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

 

===

गाडीवरची रपेट अथवा लॉंग ड्राइव्हचा प्लॅन,  आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडतो. पण गाडी चालवताना जेवढी मजा वाटते तेवढाच त्रास त्या हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने होतो.

तुम्ही कदाचितच अश्या कोणाला बघितलं असेल जो विना हॉर्न वाजवता गाडी चालवत असेल. पण कलकत्ता येथे असे एक व्यक्ती आहेत जे मागील २० वर्षांपासून हॉर्न न वाजवता गाडी चालवत आहेत. हो… हे खरं आहे.

car drive InMarathi

 

आता तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं? २० वर्षात या व्यक्तीला एकदाही हॉर्न वाजवावासा वाटला नसेल? त्याला कधीही गरज भासली नसेल ?  चला तुम्हाला या व्यक्तीची ओळख करवून देऊ…

कलकत्ता येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय ड्रायव्हर दीपक दास हेच ते व्यक्ती जे होर्नहॉर्न न वाजवता गाडी चालवतात. पण तरी देखील ते अतिशय सुरक्षित ड्रायव्हिंग करतात.

म्हणजे जरा विचार करा की तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुमच्या समोर कोणी असेल तर तुम्ही त्यांना हॉर्न वाजवून सुचित करता, वळणावरून जाताना हॉर्न वाजवता, पण दीपक दास हे मागील २० वर्षांपासून हॉर्न न वाजवता गाडी चालवत आहेत आणि तेही अगदी सुरक्षितपणे…

 

dipak das 1 InMarathi

 

त्यांना यामुळे कधी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नाही. दीपक यांना जेव्हाही कोणी प्रवासी हॉर्न वाजविण्याचा सल्ला देत ते हात जोडून अगदी विनम्रपणे त्यांना नकार देत. एवढच काय तर दीपक इतरांना देखील हॉर्न न वाजविण्याचा सल्ला देतात.

त्यांच्या मते हे खूप सोपे आहे, वेळ, जागा आणि वेग याचं योग्य संतुलन राखल्याने हे शक्य आहे. यामुळे तुम्ही सुरक्षितपणे गाडी चालवू शकता. अश्यात जे लोकं या तिघांत व्यवस्थित ताळमेळ साधण्यात यशस्वी होतात त्यांना कधी हॉर्न वाजविण्याची गरज भासत नाही.

 

car horn drive InMarathi

 

दीपक यांच्या या प्रयत्नाचे अनेकांनी मुल्यांकन देखील केले. दीपक यांच्या या पुढाकाराची सर्वत्र स्तुती केल्या जात आहे. अनेक मोठ-मोठ्या विख्यात लोकांनी दीपक यांच्या या प्रयत्नाची स्तुती केली आहे.

त्यांनी हा प्रकल्प का सुरु केला आणि यासाठी त्यांना प्रेरणा कुठून मिळाली असे विचारलं असता त्यांनी सांगितलं की, १८ वर्षांआधी त्यांनी बंगाली कवी जीवनानंद दास यांनी केलेल्या ‘शांती का जश्न’ ही कविता वाचली होती. यातूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली आणि त्यांनी निश्चय केला की यानंतर ते शांतता निर्माण ठेवण्याचा प्रयत्न करतील.

यामागे त्यांनी आणखी एक कारण सांगितले आहे. एकदा ते खूप थकलेले असताना त्यांनी त्यांची गाडी एका शाळेजवळ रस्त्याच्या कडेला लावली आणि डोळे बंद करून जरा वेळ विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला.

पण तेथून जाणाऱ्या वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने त्यांना जरा वेळ देखील विश्रांती घेऊ दिली नाही. म्हणून त्यांनी ही होर्न न वाजविण्याची मोहीम सुरु केली.

दास यांच्या गाडीवर लिहिले आहे की, “Horn is a concept. I care for your heart”.. म्हणजेच ‘हॉर्न ही केवळ एक संकल्पना आहे. मी आपल्या हृदयाची काळजी करतो..’

 

no-horn-inmarathi

 

ते फक्त कोलकाता येथे नाही तर सिक्कीम दार्जीलिंग पर्यंत गाडी चालवत गेले आहेत आणि हा प्रवास देखील त्यांनी हॉर्न न वाजवता पूर्ण केला. एक दिवस कलकत्ता हे “no-honking city” व्हावं असं त्यांच स्वप्न आहे.

दास यांच काम प्रशंसनीय आहे आणि त्यांच्या याच प्रकल्पाच्या सन्मानार्थ अनेक संस्थांनी त्यांना सम्मानित केले आहे. एवढचं नाही तर यावर्षीचा “मानुष सम्मान” हा मनाचा सम्मान देऊन त्यांच्या ध्वनी प्रदुषणाविरोधी पुढाकाराला पाठींबा दर्शविण्यात आला.

dipak das InMarathi

दीपक दास यांचा ह पुढाकार खरच कौतुकास्पद आहे. आज जिथे सर्वत्र ग्लोबल वार्मिंगचे काळे ढग दाटायला लागले आहे तिथे दवाई प्रदूषण कमी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरच एक चांगला पुढाकार आहे.

जर आपणही थोडीफार का होई ना पण प्रदूषण कमी करण्यात हातभार लावला तर त्याचा एक मोठा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?