' “मोनालिसा”च्या पलीकडचा ख्रिश्चन पुरोगामी वैज्ञानिक -लियोनार्दो दा विंची – InMarathi

“मोनालिसा”च्या पलीकडचा ख्रिश्चन पुरोगामी वैज्ञानिक -लियोनार्दो दा विंची

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जागतिक कला इतिहासाचा अभ्यास करताना एक नाव सातत्याने घेतले जाते. ते म्हणजे लियोनार्दो दा विंची.

मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र आठवतंय? ते चित्र रेखाटणारा हाच तो अवलिया चित्रकार…!

या एका चित्रामुळे त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली आणि आजही त्याची ती ओळख टिकून आहे.

दुर्दैव हे की जग आजही त्याला एक चित्रकार म्हणून ओळखतं. पण खरं सांगायचं तर हा माणूस चित्रकाराच्या ओळखी पलीकडला आहे. चित्रकार, मूर्तिकार, वास्तुकार, संगीतकार, वैज्ञानिक, गणितज्ञ, इंजिनियर, संशोधक, शरीर-रचना अभ्यासक, भू-वैज्ञानिक, वनस्पती वैज्ञानिक आणि लेखक असे विविध पदर या व्यक्तिमत्वाच्या नाना प्रतिभा उलगडतात.

 

lionardo-da-vinci-marathipizza01

स्रोत

१५ एप्रिल १४५४ मध्ये जन्मलेला लियोनार्दो हा मेसर पिएरो फ़्रुओसिनो डी ऐंटोनीयो दा विंची यांचा अनैतिक मुलगा होता. लियोनार्दोच्या वडिलांची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नव्हती.

लहानगा  लियोनार्दो अभ्यासामध्ये मात्र फार हुशार होता. अंकगणितामध्ये त्याला विशेष रुची होती. लियोनार्दोला एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय होती. याच सवयीतून त्याला प्राप्त झाली एक प्रतिभा…

लियोनार्दो एकच वेळी एका हाताने लिहायचा आणि दुसऱ्या हाताने चित्र रेखाटायचा…बहुदा अशी कामगिरी करणारा तो पहिलाच मनुष्य असावा.

 

lio nardo vinchi InMarathi

लियोनार्दोला आणखी एक सवय होती, ती म्हणजे उलटे शब्द लिहिण्याची. समजा एखाद्या माणसाला गुप्त सूचना द्यायची असेल तर लियोनार्दो उलटे शब्द त्याला लिहून द्यायचा, मग तो माणूस तो कागद आरश्यासमोर धरी, ज्यात त्याला ते उलटे शब्द सरळ दिसत आणि मग त्याला लियोनार्दोचा संदेश लक्षात येई.

लियोनार्दोचे प्राण्यांवर-पक्षांवर खूप प्रेम…!

बाजारात फिरताना पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलेले प्राणी-पक्षी पाहताच त्याचे मन व्याकूळ होई. तो त्वरित त्या प्राण्यांना-पक्षांना खरेदी करून घरी आणत असे आणि सोडून देत असे.

 

lionardo-da-vinci-marathipizza02

स्रोत

लियोनार्दोचे व्यक्तिगत जीवन अतिशय रहस्यमय होते असे इतिहासकरांचे म्हणणे! त्याचे पुरुषांसोबत शरीर संबंध असल्याचे ‘आरोप’ही त्याकाळी लावले गेले होते.

मोनालिसा या जगप्रसिद्ध चित्राचा हा निर्माता…हे आजवरचे जगातील सर्वात गूढ चित्र मानले जाते. या चित्राचे नेमके भाव ओळखणे महाकठीण, पण काही वर्षांपूर्वी फेस रिक्गनेशन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या चित्राचा अभ्यास करण्यात आलं त्यातून लक्षात आले की चित्रातील मोनालिसा ८३% आनंदी, ९% दु:खी, ६% घाबरलेली, आणि २% रागात आहे.

आता कळलं या चित्राला जगातील सर्वात गुढ चित्र का म्हटलं जातं ते?

 

lionardo-da-vinci-marathipizza03

स्रोत

प्रत्येक चित्रकार हा आपल्या चित्रातून काहीतरी संदेश देत असतो, परंतु हे असे एकमेव चित्र आहे ज्यातून चित्रकाराचा हेतूच स्पष्ट होत नाही. अनेक अभ्यासकांनी या चित्रावर अनेक वर्षे घालवली, पण त्यातून ठोस असे काहीच निष्पन्न होऊ शकले नाही,

काहींच्या मते मोनालिसा म्हणजे लियोनार्दोची खास शिष्या ‘सलाई’ आहे.

लियोनार्दोचे दुसरे एक चित्र म्हणजे ‘लास्ट सपर’. हे जगातील आजवरचे सर्वात विवादात्मक असे धार्मिक चित्र असून तितकेच सुप्रसिद्ध चित्र देखील आहे.

 

lionardo-da-vinci-marathipizza04

स्रोत

 

येशू ख्रिस्तांनी, कृसिफिकेशन होण्याआधी त्यांच्या अनुयायींबरोबर शेवटचं भोजन केलं, तो प्रसंग दर्शवणारं हे चित्र आहे. ह्या चित्रात अनेक सांकेतिक संदेश होते, ज्यामुळे बऱ्याच जणांचा लिओनार्डोवर रोष होता.

राजा फ्रान्सिस प्रथम लियोनार्दोचा सगळ्यात जवळचा मित्र होता. २ मे १५१९ मध्ये लियोनार्दोने  आपल्या याच परममित्राच्या कुशीत जीव सोडला.

त्याचे अंतिम शब्द होते:

मी परमेश्वराला आणि लोकांना नाराज केले आहे. माझ कार्य त्या स्तरापर्यंत पोचू शकलं नाही – ज्याची मला आशा होती.

लास्ट सपर वरून होत असलेल्या वादामुळे लियोनार्दो व्यथित होता आणि जीवनाच्या अंतिम क्षणी देखील तिच खंत त्याला सलत होती.

आजही लियोनार्दोवर जगभरात अभ्यासक अध्ययन करत आहेत, पण अजूनही लियोनार्दो दा विंची तसाच आहे..

गूढ…त्याच्या चित्रांप्रमाणेच…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?