' वजन कमी करण्याचं 'न्यू ईयर रिझॉल्यूशन' कधी पूर्ण का होत नाही? जाणून घ्या

वजन कमी करण्याचं ‘न्यू ईयर रिझॉल्यूशन’ कधी पूर्ण का होत नाही? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

२०१८ चा आज शेवटचा दिवस, त्यानंतर आपण २०१८ ला निरोप देऊन २०१९ या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत.

या नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी नवीन जोमाने उभे राहून नवीन काहीतरी करण्याचा संकल्प नक्कीच केला असेल. काहींनी या नवीन वर्षासाठी वेगवेगळ्या योजना देखील आखल्या असतील.

काय करावे? कसे करावे? या सर्वांचे नवीन वर्षासाठीचे गणित आपण याच डिसेंबर महिन्यापासून लावायला सुरुवात करतो. पण हे नवीन वर्ष आपल्यासाठी नक्की काय घेऊन येणार आहे, हे कोणालाही ठाऊक नसते.

या नवीन वर्षामधील सर्व संकल्पांपैकी बहुतेकांचा एक सारखाच संकल्प असतो, तो म्हणजे फिटनेसचा संकल्प.

 

push ups mistakes-inmarathi01
diannafitnessmagazine.com

या नवीन वर्षामध्ये बहुतेक लोक जिमला जाण्याचा संकल्प करतात. डिसेंबर, जानेवारी येताच जिममधील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

आकड्यांनुसार, दरवर्षी लाखो लोक फिटनेसला आपल्या नवीन वर्षाचे संकल्प बनवतात. पण त्यातील काही मोजकेच लोकचं यामध्ये यशस्वी होतात.

पण असे का होते? जिमला जाण्याचा उत्साह काही महिन्यांनी कमी का होतो?

चला तर मग जाणून घेऊया, असे का होते त्याबद्दल..

काही लोकांचे म्हणणे असते की, या धकाधकीच्या जीवनामध्ये फिटनेसकडे लक्ष देणे किंवा जिममध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नसतो.

पण कामाचा ताण आणि कुटुंबाची जबाबदारी सर्वच लोकांच्या अंगावर असते. त्यामुळे कोणतेही कारण न देता अशा लोकांनी थोडा वेळ जिमला जाण्यासाठी आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यात काढणे गरजेचे आहे.

आपल्या खाण्यापिण्याच्या किंवा आरामाच्या वेळेमधील थोडासा वेळ आपल्याला फिटनेससाठी द्यायला जमायला हवे.

 

gym-marathipizza05

 

 

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका स्टडीने हे सिद्ध केले होते की, जिमला जाणाऱ्या लोकांसाठी सोशल सपोर्ट मोठ्या प्रमाणात गरजेचा असतो.

या स्टडीमध्ये भाग घेणाऱ्या २१८ लोकांना तीन भागामध्ये विभागण्यात आले.

पहिले ते लोक ज्यांना स्टॅनफोर्डच्या इंस्ट्रक्टरचा कॉल दर ३ आठवड्यांमध्ये एकदा येईल. दुसरे ते लोक, ज्यांना असाच एक कॉल एका संगणकामधून प्राप्त होईल आणि तिसरे ते लोक ज्यांना कोणत्याही प्रकारचा कॉल येणार नाही.

एका वर्षानंतर असा निष्कर्ष आला की,

पहिले ग्रुपवाले लोक दर आठवड्यात १७८ मिनिट्स व्यायाम करण्यात घालवत होते. तिथेच दुसऱ्या ग्रुपचे लोक १५७ मिनिट्स आणि तिसऱ्या ग्रुपचे लोक एका आठवड्यामध्ये फक्त ११८ मिनिट्स जिममध्ये घालवत असत.

आता जानेवारी येईल आणि बऱ्याच लोकांनी जिममध्ये जाण्याचा संकल्प केला असेल. तर वरील निष्कर्षाची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

तुमच्या घरातील लोक आणि मित्र मैत्रिणींना या संकल्पाबद्दल सांगून ठेवा. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज आहे हे सांगा.

 

fat-reasons-marathipizza04

 

तुमच्या काळजीपोटी हे लोक तुम्हाला सतत प्रोत्साहन देत राहतील. तुमच्या संकल्पाची आठवण करून देतील. जेणेकरून तुमचा उत्साह टिकून राहील. आणि तुम्ही जास्तीत जास्त दिवस जिमला जाल.

जिमला जाण्याचा संकल्प करणारे काही उत्साही तरुण मंडळी देखील असतील, जी पहिल्यांदाच जिमला जाणार असतील. अशावेळी चुका होण्याची शक्यता वाढते आणि लोक जिम करण्याचे मोटिव्हेशन हरवून जातात.

त्यामुळे कधीही आपल्यासमोर छोटे लक्ष ठेवा.

उत्साहित होऊन खूप वजन लावून मशीनचा वापर करू नका. असे केल्याने काही दिवसांनी तुमचे मोटिव्हेशन कमी होईल आणि तुम्ही जिमला जाण्याचे बंद कराल. जिमसाठी संयमाची खूप आवश्यकता असते.

तुमचे शॉर्ट टर्म फिटनेस गोल्स देखील तोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींविषयी जागरूक होणार नाहीत.

 

Overeat_inmarathi
madebymargie.com

काही लोक तर जिममधील मशीनला एवढे घाबरतात की, तिला हात देखील लावत नाही आणि हा, जिममधील काही व्यायाम खूपच बोरिंग असतात. पण तरीही तुम्ही त्यांना न कंटाळता ते केले पाहिजे.

त्याच्याविषयीची आपल्या मनातील भीती घालवली पाहिजे. जर तुम्हाला एखादा व्यायाम करायला कंटाळा येत असेल, तर तुम्ही इंटरनेटच्या मदतीने त्याला पर्यायी असा व्यायाम शोधू शकता.

जिमला जाऊन आपली फिटनेस मेंटेन करण्याची इच्छा आणि त्यासाठी लागणारी मेहनत पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे.

त्यामुळे त्यासाठी तुम्हीच मनातून दृढ संकल्प केला पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?