' 'ह्या' पुलांवरून जाण्याआधी तुम्ही दोनदा नक्की विचार कराल, हे आहेत जगातील सर्वात धोकादायक पूल

‘ह्या’ पुलांवरून जाण्याआधी तुम्ही दोनदा नक्की विचार कराल, हे आहेत जगातील सर्वात धोकादायक पूल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या खूप धोकादायक आणि भीतीदायक आहेत. काही ठिकाणी तर आपण जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. तरीही आपल्यातील काहींना नेहमी काहीतरी साहसी कराचे असते, त्यामुळे ते धोका पत्करून देखील त्या ठिकाणी तो रोमांचक अनुभव घेण्यासाठी जातात.

चीनमधील काचेचा पूल देखील त्यातीलच एक आहे. हा पूल दिसायला खूपच धोकादायक दिसतो. पण केवळ हा चीनचा पूलच धोकादायक नाही, तर इतर काही पूल देखील याच पुलासारखे धोकादायक आहेत, आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही भीतीदायक पुलांविषयी सांगणार आहोत. चला यात मग जाणून घेऊया, या धोकादायक पुलांबद्दल…

 

१. zhangjiajie grand canyon, काचेचा पूल, चीन

 

Dangerous bridges in the world.Inmarathi
jagranimages.com

 

चीनमधील काचेचा पुल हा जगातील काही धोकादायक पुलांमध्ये समविष्ट झालेला आहे. चीनने हेबेई प्रांताच्या शिजियाझुआंग शहरामध्ये जमिनीपासून २१८ मीटर उंच बनवण्यात आला आहे. हा जगातील सर्वात लांब काचेचा पूल असल्याचे सांगितले जाते.

दोन खडकांच्यामध्ये लटकणाऱ्या या पुलाची रुंदी दोन मीटर आहे. यामध्ये १०७७ पारदर्शक काचा लावण्यात आल्या आहेत, ज्या चार सेंटीमीटर जाड आहेत. या काचेचे एकूण वजन जवळपास ७० हजार किलो आहे.

या पुलाला जाणूनबुजून जरा वळणदार बनवले गेले आहे, जेणेकरून लोकांना यावरून चालताना भीती वाटावी. हा पूल जगातील धोकादायक पुलांपैकी एक पूल मानला जातो. तसे तर, या पुलामध्ये एकेवेळी २००० लोकांचा भार उचलण्याची क्षमता आहे.

पण सुरक्षेच्या दृष्टीने सध्या या पुलारून एकेवेळी फक्त ५०० लोकचं चालू शकतात.

 

२. लांगजियांग ग्रँड ब्रिज

 

Dangerous bridges in the world.Inmarathi1
jagranimages.com

 

चीनमध्येच आशियाचा सर्वात लांब आणि सर्वात भीतीदायक सस्पेंसन ब्रिज आहे, ज्याचे नाव लांगजियांग ग्रँड ब्रिज हे आहे. दक्षिण – पश्चिम चीनच्या युन्नान प्रांतामध्ये लांगजियांग नदीवर बनवण्यात आलेल्या या पुलाला बनवण्यासाठी जवळपास पाच वर्षाचा कालावधी लागला.

या पुलाची लांबी ८ हजार फुट आणि उंची ९२० फुट आहे. हा पूल पर्वतांच्या दोन बाजूंना वसलेल्या बाओशांद आणि तेंगचोंग नावाच्या चीनी शहरांना जोडण्याचे काम करतो. या पुलाला बनवण्यासाठी जवळपास १५१ मिलियन पौंड म्हणजेच जवळपास १३०० कोटी रुपयांचा खर्च आला.

समुद्रापासून ८१०० फुट ऊंच असलेल्या या पुलावरून जाताना धाडसी लोकांना देखील थोडी भीती नक्कीच वाटते.

 

३. यी सन सीन ब्रिज, दक्षिण कोरिया

 

Dangerous bridges in the world.Inmarathi2
daelim.co.kr

 

असाच काहीसा भीतीदायक पूल आहे, दक्षिण कोरियातील यी सन सीन ब्रिज. हा जगातील पाचवा सर्वात लांब पूल आहे. ज्याचे निर्माणकार्य २००७ साली सुरु झाले आणि २०१२ साली हा पूल बनून तयार झाला.

१५४५ मीटर लांब असलेल्या या पुलाचे नाव दक्षिण कोरियातील एका शूर अॅडमिरलच्या नावावर ठेवण्यात आले होते. दक्षिण कोरियाचा यी सन सीन पूल हा क्‍वांगयांग आणि येओसु शहरांना जोडतो.

 

४. एगुइले डू मिडी ब्रिज, फ्रान्स

 

Dangerous bridges in the world.Inmarathi3
thebeautyoftravel.com

 

फ्रान्सच्या एल्प्समध्ये बनवण्यात आलेला हा पूल चांगल्या चांगल्या धाडसी माणसांच्या मनामध्ये देखील भीती निर्माण करेल असा आहे. असे यासाठी आहे, कारण याची ऊंची १२,५०० फुट आहे. आणि याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी झुलणाऱ्या केबल कारने ९,२०० फुट अंतर कापावे लागते, ज्यामध्ये जवळपास २० मिनिटे लागतात. त्यानंतर हा पूल एका डोंगराच्या सुरंगमधून निघतो.

 

५. हुसैनी हँगिंग पूल, पाकिस्तान

 

Dangerous bridges in the world.Inmarathi4
netdna-ssl.com

 

पाकिस्तानमध्ये बनवण्यात आलेला दोरींनी झुलत असलेला हा पूल आशियातील सर्वात धोकादायक हँगिंग ब्रिज मानला जातो. याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, पुलाला लावण्यात आलेल्या दोऱ्या आणि लाकडे २०११ च्या पावसामध्ये खूप खराब झाल्या आहेत.

जर तुम्ही कधी हा पूल पार करून जाऊ इच्छित असाल, तर आपले मन घट्ट करा आणि दोरींना मजबुतीने पकडा. नाहीतर, यावर चालताना जेव्हा जोरात हवा येऊन हा पूल हलायला लागेल, तेव्हा तुमची पकड सुटून तुम्ही फेकले जाण्याची भिती आहे.

असे हे जगातील सर्वात धोकादायक पूल, ज्यांच्यावरून चालताना एखाद्या भीतीने घाम फुटेल… मग तुम्ही जाणार का या पुलांवरून..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?