' ‘ह्या’ वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते – InMarathi

‘ह्या’ वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपली भारतीय संस्कृती की, इतर संस्कृतींपेक्षा खूपच वेगळी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप विविधता पाहण्यास मिळते. त्यामुळे भाषा, राहणीमान, परंपरा याच्यामध्ये देखील विविधता आढळते. आपल्या भारतात वाद्यांमध्ये देखील खूप वेगवेगळे प्रकार आहेत. भारतात प्रत्येक कार्यक्रमाला वाद्य वाजवण्याची परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे. देशाच्या प्रत्येक कोन्यामध्ये स्वत: चे असे वेगळे संगीत आणि वाद्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही वाद्यांबद्दल सांगणार आहोत, जे आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडीत आहेत आणि त्यांचा निर्माणच या भारतात झालेला आहे. चला तर मग पाहूयात, या वाद्यांबद्दल..

१. पेपा

 

Indian Musical Instruments.Inmarathi
dsource.in

म्हशीच्या शिंगानी बनलेले हे वाद्य यंत्र मुख्यत: आसामच्या संगीत बिहूचा एक भाग आहे. या वाद्याला पुरुष बिहू कलाकार वाजवतात. पेपाची तुलना बासरीशी केली जाते. वेगवेगळ्या समुदयामध्ये याला वेगवेगळे नावाने ओळखले जाते.

२. Padayani Thappu

 

Indian Musical Instruments.Inmarathi1
ytimg.com

Padayani Thappu हे एक प्रकारचा भारतीय ड्रम आहे. याची किनार लाकडाने बनलेले असते आणि एक बाजूचा भाग चामड्याचा बनलेला असतो. या वाद्याला हाताने वाजवले जाते.

३. सूरसिंगार

 

Indian Musical Instruments.Inmarathi2
indiatimes.in

सरोदशी मिळतेजुळते असलेल्या या वाद्य यंत्राचा आकार सरोदपेक्षा मोठा असतो. याचा आवाज देखील सरोदपेक्षा दीप असते. याला लाकूड, चामडी आणि धातूने बनवले जाते. सूरसिंगारच्या तारांना धातूने वाजवले जाते.

४. गुबगुबा

 

Indian Musical Instruments.Inmarathi3
asza.com

पहिल्यांदा पाहिल्यावर हे वाद्य एका छोट्याशा तबल्यासारखे दिसते. पण हे वाद्य तबल्यापेक्षा खूपच वेगळे आहे. याचा एक भाग दोन तारांनी बांधलेला असतो, जॉ यंत्राच्या दुसऱ्या बाजूला जोडलेला असतो. गुबगुब्याला एका हाताने काखेत दाबून दुसऱ्या हाताने वाजवले जाते. वेगवेगळ्या जागांवर याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

५. Kuzhal

 

Indian Musical Instruments.Inmarathi4
cdninstagram.com

Kuzhal ला केरळातील मंदिरांमध्ये आणि त्यांच्या सणांमध्ये तुम्ही पाहू शकता. अनेकदा लोकांना Kuzhal आणि सनई यांच्यामधील फरक ओळखता येत नाहीत. Kuzhal चा आवाज हा सनईच्या आवाजापेक्षा वजनदार असतो.

६. डुगडुगी

 

Indian Musical Instruments.Inmarathi5
lmsmusicsupplies.co.uk

तामिळनाडूच्या लोकसंगीतामध्ये डुगडुगी एक खास स्थान आहे. या वाद्य यंत्राला सर्व भारतीय भगवान शंकराचा डमरू म्हणून देखील ओळखतात. या छोट्या आकाराच्या वाद्य यंत्राला हाताने जोरजोरात फिरवून आवाज उत्पन्न केला जातो.

७. संबळ

 

Indian Musical Instruments.Inmarathi6
ytimg.com

पूर्वी भारतामध्ये या वाद्याचा संगीतासाठी खूप उपयोग केला जात असे. आताही ग्रामीण भागात याचा वापर काही प्रमाणात केला जातो. यामध्ये ड्रमची जोड एकसाथ जोडलेली असते आणि या दोघांच्या आवाजामध्ये विविधता असते. संबळला स्टीकने वाजवले जाते आणि याचा वरील भाग हा चामड्याने बनवले जाते.

८. रावण हत्था

 

Indian Musical Instruments.Inmarathi7
ytimg.com

या वाद्याच्या नावाने असे समजते कि, हे श्रीलंकेशी जोडलेले असावे. भारतातील कितीतरी भागांमध्ये रावण हत्था या वाद्याला वाजवले जाते. यामध्ये तार लावलेल्या असतात आणि या वाद्याला व्हायलेनसारखे वाजवले जाते.

९. अलगोजा

 

Indian Musical Instruments.Inmarathi8
blogspot.com

राजस्थानी आणि पंजाबी संगीतामध्ये अलगोजा या वाद्याचा वापर केला जातो. बलोच आणि सिंधी संगीतकारांनी याला योग्यप्रकारे आपलेसे केले आहे. हे वाद्य वाजवणे थोडे कठीण नक्कीच आहे. पण यातून एक मधुर संगीत बाहेर पडते. हे दिसयला दोन बासऱ्यांसारखे दिसते. याला दोन्ही हाताने वाजवले जाते.

१०. पखवाज

 

 

Indian Musical Instruments.Inmarathi9
meloteca.com

गॅलनच्या आकारासारखे दिसणारे हे वाद्य मृदंग नावाने देखील ओळखले जाते. हे वाद्य दिसायला ढोलकीसारखे आहे, पण याला तबल्यासारखे ट्यून केले जाते. या वाद्याला एक सहयोगी वाद्य म्हणून नृत्य आणि गाण्याच्या कार्यक्रमामध्ये वापरले जाते.

अशी ही वाद्य आणि इतर काही वाद्य भारताच्या संस्कृतीमुले तयार झालेली आहेत आणि यांच्यामधून भारताची संस्कृती आणि परंपरा दिसून येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?