'सध्याच्या बिझी जनरेशनचे जीवन सुकर करणारे झकास स्टार्टअप्स!

सध्याच्या बिझी जनरेशनचे जीवन सुकर करणारे झकास स्टार्टअप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजची तरुणाई प्रचंड बिझी आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक जण आपापली गावं शहरं सोडून इतरत्र रहातात. लग्न झालेलं असेल तरी बहुतेक कुटुंबात दोघेही नोकरी करणारे असल्याने ऐनवेळी ना कोणी मदतीला की सोबतीला…!

पण अश्या बिझी राहणाऱ्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही आहे. ऑनलाईन मार्केट मध्ये अश्या काही स्टार्ट-अप्सनी पाऊल ठेवले आहे की तुमच्या दैनंदिन गरजा ते क्षणात दूर करू शकतात.

 

multi tasking
Young christian workers

 

ऑनलाईन लॉन्ड्री आणि ड्राय क्लिनिंग

कपडे धुण्याचा आणि ड्राय क्लीन करून घेण्याचा वैताग सोडवणारे पिक माय लॉन्ड्री आणि वॉशकार्ट

सध्या दिल्ली आणि गुडगावमधे पिकमाय लॉन्ड्री आणि बँगलोरला वॉशकार्ट ह्या दोन कंपनीज सेवा पुरवत आहेत. तसंच – सध्या सगळीकडे चर्चेत असलेले पोर्टल म्हणजे हाउसजॉय, जे बहूतेक सर्वच प्रमुख शहरांमध्ये सेवा पुरवतात.

यांची मदत घ्या आणि एक किंवा दोन दिवसांत तुमचे सर्व कपडे लख्ख होऊन तुमच्या घरी येतील.

 

pick my laundry inmarathi
SMERGERS

स्रोत

रिपेअर आणि मेंटेनन्स

एकटे राहत असताना रिपेअर आणि मेंटेनन्सचा देखील खूप वैताग असतो राव!! पण आता काळजी संपली, कारण काहीही प्रॉब्लेम आला की सरळ टाईमसेव्हर्स शी संपर साधायचा किंवा आपलं मघाचं  हाउसजॉय आहेच.

 

repais inmarathi
joboy.in

स्रोत

ऑन डिमांड ब्युटी सर्विस

नटायचंय…पण सलूनला जायला कंटाळा आलाय…असं अनेक रविवारी होतं ना? किंवा वेळच मिळत नाही? तर आता त्याचही टेन्शन नाही, कारण आता तुमच्या घरीच सलून येईल.

व्हीयोमो या क्षेत्रात प्रसिद्ध कंपनी असून बँगलोर, मुंबई, दिल्ली, नोयडा आणि गुरगाव या शहरांमध्ये प्रामुख्याने सेवा पुरविते. सोबतच स्टे ग्लॅडव्हॅनिटीक्यूब आणि बिलीटा यांच्या सेवा वापरून पाहण्यास देखील हरकत नाही. ह्या सेवांमधे बॉडी मसाज सारख्या सुविधा देखील आहेत.

तुम्हाला फक्त अपॉइंटमेंट बुक करायची आहे आणि त्यांचा माणूस तुमच्या घरी हजर!

आता तर तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर एक Urban Clap नावाचे ऍप आले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या सलून ट्रीटमेंट, हेयर कट, बॉडी मसाज आणि इतर सोयींचा लाभ घेऊ शकता!

 

urban clap inmarathi
pinterest

स्रोत

ऑनलाईन वॉटर डिलिव्हरी

जर तुमच्या विभागात पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम उद्भवला तर हे लोक घरपोच पाणी आणून देतील….मस्त ना!

बँगलोर, चेन्नई, दिल्ली आणि धर्मशाला या शहरात पानीवाला तुम्हाला मदत करण्यास तत्पर आहे. सोबतच पानीलेलो, माउंटकैलाश, बुक कॅन या कंपन्यासुद्धा तुम्हाला एका क्लिकवर पाणी आणून देतील.

 

bottled water service
pani can wala

 

स्रोत

ऑनलाईन शूज आणि बॅग्ज रिपेअर

तुटलेल्या बॅग्ज आणि फाटलेले शूज घेऊन रस्त्यावर मोची शोधात फिरणे आवडत नसेल ( – कुणाला आवडतं?! 😀 ) तर त्याचीही सोय आहे…अगदी प्रोफेशनल मोची…!

मिस्टर प्रोन्टो, किंवा वेडोशूज घरी येऊन तुमचे शूज आणि बॅग्ज रिपेअर करून देतील.

यापेक्षा चांगली सर्व्हिस आपल्याला दुसर कोणी देईल असं वाटत नाही!

 

mr pronto inmarathi
justdial

ऑनलाईन कार क्लिनिंग सर्विस

आपण कार घेतो खरी, पण ती धुण्याची वेळ आली की ते काम मात्र आपल्याला मोठं ओझंच वाटायला लागतं. पण इतर सगळ्याच गोष्टींप्रमाणे कार धुवून देणारे देखील ऑनलाईन उपलब्ध झालेत.

आपलं पुणेरी स्टार्टअप – स्वच्छ कार खास ही सेवा पुरवतं. सोबतच इतर शहरांमध्ये क्लीनर, मोबीकारस्पा यांसारख्या कंपन्या ही सर्विस देण्यासाठी  देण्यासाठी सज्ज आहेत.

 

car wash inmarathi
YourStory

ऑनलाईन टिफिन

पिज्झा, पास्ता खाऊन वैताग आला असेल आणि घरच्यासारखं जेवण हवं असेल तर या सर्विसेस एकदा ट्राय करना बनता है बॉस!

यम्मी टीफिन्स तुम्हाला तुमचा मेन्यू स्वत: निवडण्याची मुभा देतं. दुसरीकडे कॉर्पोरेट धाबा देखील फॉर्म मध्ये आहे म्हटलं. आता यामध्ये स्वीगी झोमॅटो फूडपांडा अशा काही अँड्रॉइड ऍप्स नी सुद्धा चांगली टक्कर टक्कर द्यायला सुरुवात केली आहे!

घरपोच डिलिव्हरी ती सुद्धा अगदी हव्या त्या वेळेला आणि कोणत्याही किंमतीची अट न ठेवता!

 

tiffin inmarathi
magicpin

कामवाली बाई – ऑनलाईन!

एकटे राहणाऱ्यांसाठी शहरांमध्ये कामवाली बाई शोधण तस मनस्तापाचं काम, मुंबईमध्ये तर महाकठीण, पण माय दिदी ने ही समस्या देखील दूर केली आहे.

तिच्याच सोबतीला कमला बाई ने मुंबईसह, पुणे दिल्ली, कोलकाता यांसारख्या शहरांतील लोकांची काळजी मिटवली आणि या सर्व कामवाल्या बाया प्रोफेशनली ट्रेनड आहेत म्हणे!

 

useful-services-for-those-living-alone-marathipizzza09
mydidi.in

 

हेल्थ केअर…!

डॉक्टरची अपॉइंटमेंट ऑनलाईन बुक करून देतंय – प्रेक्टो हे पोर्टल. सध्या ३५ पेक्षा जास्त शहरांत कार्यरत असणाऱ्या या पोर्टलने अनेकांच्या डोक्याचा त्रास मिटवला आहे.

 

tiffin inmarathi
entrackr

 

काही काळाने सदासर्वदा बिझी असणाऱ्यांना घरच्या सारखं फील करून देणारं एखाद नवीन स्टार्टअप ऑनलाईन मार्केटमध्ये दिसल्यास त्यातही नवल वाटायला नको!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 38 posts and counting.See all posts by vishal

One thought on “सध्याच्या बिझी जनरेशनचे जीवन सुकर करणारे झकास स्टार्टअप्स!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?