'भारताला खऱ्या अर्थाने "आत्मनिर्भर" बनवण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी..!

भारताला खऱ्या अर्थाने “आत्मनिर्भर” बनवण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आय.ए.एस अधिकारी बनण्याचं खूप लोकांचं स्वप्न असतं. त्यांचं राहणीमान, वजनदार व्यक्तिमत्त्व आणि त्यांना मिळणारी प्रतिष्ठा आपण चित्रपटामध्ये पाहिलेली असते.

पण चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे कुणीही कधी झटपट आय.ए.एस अधिकारी बनत नसतो, आय.ए.एस अधिकारी होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, आपण तेवढा अभ्यास करणं देखील गरजेचं असतं.

त्यामुळे खूपच कमी लोक यामध्ये यशस्वी होतात. आपण जेवढं समजतो, तेवढं  सोप्पं हे नक्कीच नसतं. या पदाबरोबरच या अधिकाऱ्यांवर खूप जबाबदाऱ्या देखील येतात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही आयएएस अधिकाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या असूनही समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत आणि त्यांच्या या बदलामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे.

चला तर मग जाणून घेऊया, काही अशा अधिकाऱ्यांविषयी जे आपल्या लोकप्रियतेसाठी आणि इमानदारीसाठी ओळखले जातात.

 

१. परिकिपंदला नरहरि

 

narhari-inmarathi

 

मध्यप्रदेश कॅडर २००१ बॅचचे आयएएस अधिकारी पी. नरहरि यांना अपंगांसाठी चांगलं कार्य केल्याबद्दल NCPEDP-Mphasis Universal Design Awards २०१७ ने सन्मानित करण्यात आलेलं आहे.

ग्वालियरमध्ये नरहरि यांच्या कार्यकाळात शाळेची फी वाढवण्याच्या संबंधित प्रकरण समोर आले होते, पण त्यांच्या प्रयत्नामुळे ९२ शाळेच्या संचालकांनी फी न वाढवण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी खूप आव्हानांचा सामना केला. यामध्ये बीआरटीएसचे विस्तारीकरण, मेट्रो प्रोजेक्ट, खान नदीच्या किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवणे यांसारखे मुद्दे होते.

 

२. रोनाल्ड रोज

 

IAS Officers.Inmarathi1
thebetterindia.com

 

आय.ए.एस रोनाल्ड रोज यांनी तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यामध्ये विकासाचे काही नवीन रेकॉर्ड बनवले आहेत.

गावामध्ये जलदगतीने सुरु होणारे शौचालय आणि शेतकऱ्यांचे बदलणारे जैविक मार्ग हे याचे पुरावे आहेत की रोनाल्ड रोज यांची मेहनत सफल होत आहे.

रोनाल्ड यांनी जिल्ह्यामध्ये काही अद्भुत परिवर्तन केले आहे, ज्याच्या आधारावर येथील विकास आपण स्पष्टपणे बघू शकतो.

 

३. पी.एस प्रद्युम्ना

 

Ias officer inmarathi
The Hans India

 

पले निद्रा प्रोग्रामच्या अंतर्गत एक लाख टॉयलेट बनवणारे प्रद्युम्न आपल्या वेगळ्या कामासाठी ओळखले जातात. यांनी आखलेल्या चांगल्या योजना आणि समावेशक पुढाकाराने आंध्रप्रदेश जिल्ह्याचा एक नवीन विकास झाला आहे.

एवढंच नाही तर या आयएएस अधिकाऱ्याने स्त्रियांची सुरक्षा लक्षात ठेवत, शैक्षणिक संस्थाने, बस स्टॉप अशा कितीतरी जागांवर निर्भया पेट्रोलिंग नावाचे लोकप्रिय प्रोग्राम देखील चालवले.

तसेच, या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी देखील खूप कामं केली आहेत.

 

४. रोहिणी आर. भाजीभाकरे

 

rohini-inmarathi

 

रोहिणी या सालेम जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. स्थानिक लोकांसाठी हे कोणत्याही सेलिब्रेशनपेक्षा कमी नव्हतं, कारण सालेममध्ये १७० वर्षामध्ये पहिल्यांदाच एक स्त्री जिल्हाधिकारी झाली आहे.

जिल्हाधिकारी बनताच रोहिणी यांनी या क्षेत्रात कितीतरी बदल घडवून आणले. त्या रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करतात. व्हाट्सअपच्या माध्यमाने अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतात.

शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यापर्यंत सगळं काही त्या स्वतः ग्रामीण भागामध्ये जाऊन करतात. याचबरोबर त्यांनी ऑफिसच्या आतमध्ये प्लास्टिक आणि पॉलीथिनच्या बॅगवर निर्बंध लावला आहे.

 

५. पोमा टुडू

 

poma tudu ias inmarathi
Outlook India

 

ओडीसाच्या “नुआपडा” जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असताना डॉ. पोमा टुडू यांनी जे प्रयत्न केले त्यांची जेवढी प्रशंसा केली जावी, तेवढी कमीच आहे. त्या दररोज जवळपास दोन तासांचा प्रवास करून लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जायच्या.

अशाप्रकारचे समर्पण लोकसेवकांसाठी एक आदर्श आहे. दिल्लीच्या लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेजमधून पदवी घेणाऱ्या पोमा, २०१२ बॅच ओडीसा कॅडरच्या आय.ए.एस अधिकारी आहेत.

पोमा यांचा हेतू गावामधील लोकांना मुलभूत सुविधा प्रदान करणे हा आहे. खास गोष्ट ही की, त्यांनी आतापर्यंत कोणालाही आपला रोल मॉडेल बनवलं नाही.

 

६. सुरेंद्र कुमार सोलंकी

 

IAS Officers.Inmarathi5
thebetterindia.com

 

सिव्हील सेवा सर्विसेस या दिवसावर आयोजित समारंभात डुंगरपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्रकुमार सोलंकी यांना पंतप्रधान एक्सिलेंस अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं.

आदिवासी झोनमध्ये स्त्री इंजिनियर्सच्या माध्यमातून सोलर लॅम्प प्रोजेक्टचा नवीन उपक्रम चालू करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजातील बदलावासाठी काम करणाऱ्या सोलंकी यांनी उदयपुरच्या शेल्टर होममधून छाया पर्गी नावाच्या एका मुलीला दत्तक घेतले होते, जिला तिच्या काकूच्या अत्याचारांमुळे घरातून पळावं लागलं.

या अधिकाऱ्याला जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी त्या मुलीला दत्तक घेऊन त्या मुलीचे भविष्य सुधारण्याचं वचन दिलं.

 

७. पारसनाथ नायर

 

parasnath nair inamarathi

 

पारसनाथ नायर २००७ च्या केरळ कॅडरचे आय.ए.एस अधिकारी आहेत, ज्यांना राज्यमंत्र्यांच्या सचिवाच्या रुपात नियुक्त करण्यात आले होते.

नायर यांनी कोझिकोडचा जिल्हाधिकारी बनून लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी कितीतरी मुद्द्यांना परत उठवलं होतं आणि सार्वजनिक रुपात या पैलूंवर कौतुकास्पद काम देखील केलं.

नायर यांनी “ऑपरेशन सुलेमानी”, “तेरे मेरे बीच मै” आणि “यो आपोपा” यांसारख्या प्रकल्पांवर काम करून लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यशस्वी बनवून दाखवलं.

या अधिकाऱ्याचं काम आणि मेहनतीचा परिणाम असा आहे की, आज लोक त्यांना सन्मानाने ‘कलेक्टर ब्रो’ नावाने ओळखतात.

असे हे आणि इतर काही आयएएस अधिकारी खूप प्रतिभावान आणि मेहनती आहेत. त्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी योग्यप्रकारे नावाजले देखील गेले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?