सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सोशल मिडिया, हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे कोणतीही लहान गोष्ट देखील लगेच व्हायरल होते. आपल्याकडे एखादी वेगळी गोष्ट आली की, आपण ती लगेच दुसऱ्याला फॉरवर्ड करतो आणि असे एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाऊन या गोष्टी व्हायरल होतात.

पण ज्या गोष्टी आपल्याला या सोशल मिडीयावर येतात, त्यांची कधी शाहनिशा करतो का ? नाही ना आणि नेमके येथेच आपले चुकते. त्यामुळे कधी – कधी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचून अफवा पसरते आणि यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

 

Viral video of Mermaid.Inmarathi
thejournal.ie

 

आपण लहानपणी जलपरीच्या गोष्टी ऐकल्या असतील, पण सत्यात कधी त्या आहेत हे ऐकले नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मिडीयावर एक जलपरी मिळाल्याची बातमी फिरत आहे.

या जलपरीच्या व्हिडीओने अनेकांच्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण केले आहेत. काहींनी हा सांगितले की, ही जलपरी ओडीसामध्ये मिळाली, तर काहींचे म्हणणे होते की, उरणच्या खाडीत ही जलपरी मिळाली.

एवढेच नाही तर, या व्हिडीओमध्ये ही जलपरी श्वास घेताना दिसून येत आहे, असे म्हणणे आहे.

या छायाचित्रांमध्ये दाखवलेला जीव हा रहस्यमयी आहे. असा विचित्र जीव आधी कधीही कुणी पाहिला नव्हता. दहा सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये या रहस्यमयी प्राण्याचे तोंड एका मगरीसारखे दिसून येत आहे.

तसेच, त्यांचे डोळे देखील स्पष्टपणे दिसून येत आहेत आणि त्यांच्या गळ्यापासून कमरेपर्यंतचा भाग माणसाशी मिळताजुळता आहे. या प्राण्याचे हात एका दोरीने बांधलेले दिसत आहेत, तसेच त्याचा कमरेखालील भाग हा माशाच्या आकारासारखा दिसून येत आहे.

 

Viral video of Mermaid.Inmarathi1
intoday.in

या व्हिडीओला पाहिल्यानंतर मनामध्ये खूप प्रकारचे प्रश्न निर्माण होतात की, खरच जलपरी अशी असते का ? आपल्याला लहानपणी सांगितल्याप्रमाणे आणि चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे जलपरी खूप सुंदर आणि आकर्षक असतात.

पण या प्राण्यामध्ये तसे काहीही नाही आहे. मग हा प्राणी जलपरी नाही, तर नक्की काय आहे ? आज आम्ही तुम्हाला या व्हायरल व्हिडीओच्या मागील सत्य सांगणार आहोत.

खरेतर या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला प्राणी हा कोणताही सजीव जीव नसून, म्यानमारमध्ये राहणाऱ्या एका कलाकाराने बनवलेली कलाकृती आहे.

हा कोणताही रहस्यमयी जीव नाहीतर एक लाकडाची आणि फायबरची बनवलेली मूर्ती आहे.

त्याचबरोबर या मूर्तीच्या गळ्यामध्ये एक मोटर बसवण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे ही मूर्ती श्वास घेताना दिसून येते.

 

 

यावरून तुम्हाला हे समजले असेल की, कसे आपण सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या गोष्टींमध्ये फसतो आणि दुसऱ्याला देखील त्या फॉरवर्ड करतो.

लोकांनी फक्त जलपरी मिळाली हे सांगितले नाहीतर ती कुठे मिळाली हे देखील सांगितले. पण आता या व्हिडीओ आणि छायाचित्रांच्या मागील सत्य आता तुम्च्यापुढे उघड झाले आहे.

त्यामुळे यापुढे सोशल मिडीयावर येणारी कोणतीही गोष्ट पडताळून पाहिल्याशिवाय पुढे पाठवू नका.
===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?