' हल्लेखोराला यमसदनी धाडणारी इस्रायलची अशीही “सुरक्षा भिंत” – InMarathi

हल्लेखोराला यमसदनी धाडणारी इस्रायलची अशीही “सुरक्षा भिंत”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपला भारत देश आता इतर देशांप्रमाणेच तंत्रज्ञानामध्ये पुढे जात आहे. भारतात सातत्याने नवे प्रयोग केले जात आहेत.

टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यापासूनचं अमेरिका आणि इस्राईल हे अग्रेसर आहेत. त्यांनी आपल्या तंत्रज्ञानाने जगाला अचंभित करून टाकले आहे.

आज आम्ही तुम्हाला याच इस्रायल आणि अमेरिकेकडे असलेल्या अशा तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत, जे त्यांना शत्रूंपासून वेळोवेळी वाचवत आले आहे. चला तर मग जाणून घेऊया, या तंत्रज्ञानाबद्दल…

 

Israeli West bank barrier.Inmarathi

 

इस्त्रायलचे नाव समोर येताच तेथील टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स सिस्टिमबाबत नेहमी बोलले जाते. आजूबाजूला सर्व शत्रू राष्ट्रे असलेल्या इस्त्रायलने आपल्या देशाला संपूर्ण बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टिमने लेस ठेवले आहे.

याशिवाय इस्त्रायलने बॉर्डरवर अशी भिंत उभी केली आहे ज्याची चर्चा जगभर झाली. या भिंती इतक्या मजबूत आहेत की, शत्रूही त्याचे काही वाकडे करू शकत नाही.

इस्त्रायलचा दावा आहे की, या भिंती बांधल्यानंतर दहशतवादी हल्ले व घटना कमी झाल्या आहेत.

सध्या हे तंत्रज्ञान फक्त इस्त्रायल आणि अमेरिका यांच्याजवळ आहे.

इस्त्रायलने १९९४ मध्ये या फेंसिंगचे काम सुरू केले होते. यासाठी खरं तर एक अब्ज डॉलरचे बजेट होते. मात्र, त्यावर दुप्पट खर्च झाला.

एका किमीसाठी २० लाख डॉलर खर्च आला. यामुळे ९० टक्के हल्ले व दहशतवादी घटना कमी झाल्या. याशिवाय सैन्यावर होणारा खर्चही कमी झाला.

 

Israeli West bank barrier.Inmarathi1

 

२० हजार वर्ग किमी भाग असणाऱ्या इस्त्रायलची एकूण १०६८ किमी लांब बॉर्डर आहे. ही बॉर्डर इतिप्त, जॉर्डन, सीरिया, लेबनान आणि पॅलेस्टाईनला लागून आहे. इजिप्त, सीरिया बॉर्डरवर १६ फूट ऊंच फेंसिंग आहे, तर लेबनान बॉर्डरवर रेंजर फेंसिंग आहे.

गाझा पट्‌टीवर कॉंक्रीटची भिंत व फेंसिंग आहे. भिंत जमिनीपासून ८ फूट खालून बनविली गेली आहे आणि इस्त्रायलने स्वतःला सुरक्षित बनवले.

सन १९४८ मध्ये विभाजन झाल्यानंतर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन देश बनले. ६९ वर्षापासून या दोन देशांत संघर्ष सुरू आहेत.

इस्त्रायल स्वतंत्र देश बनताच अरब-इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु झाले, कारण अरब देशांना इस्त्रायल देशाचे अस्तित्व मान्य नव्हते व आजही नाही.

या युद्धामुळे पॅलेस्टाईनमधील लाखों लोक विस्थापित झाले. तसेच मोठा भूभाग इस्त्रायलच्या ताब्यात आला. तेव्हापासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत लाखो लोकांनी जीव गमवला आहे.

इस्त्रायलने आपल्या संपूर्ण देशात अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टिम यंत्रणा बसविली आहे. ज्यामुळे रॉकेट किंवा मिसाईल सहजपणे हल्ला करू शकत नाही.

 

Israeli West bank barrier.Inmarathi2

 

या सेन्सर भिंती बांधण्यासाठी २ बिलियन डॉलर म्हणजेच १३ हजार ३५४ कोटी रूपये खर्च आला आहे. या सेन्सर भिंतीला आधुनिक कॅमेरे आहेत. तसेच सीमेवर ड्रोनद्वारे शत्रू राष्ट्राच्या हालचाली टिपल्या जातात.

या सेन्सर भिंतीत अॅंटी बॅलेस्टिक मिसाईल लावली आहेत. त्यामुळे शत्रूंनी हल्ला केला तरी त्यांचेच नुकसान होते.

सॅटेलाईटद्वारे निगराणी केली जाईल. तसेच भिंतीवर आर्मीसाठी बुलेटप्रुफ केबिन बनवल्या गेल्या आहेत.

थ्री-डी सेंसर इमेजिंग डिवाईस विकसित करण्यात आले आहे. ज्याद्वारे भिंतीच्या पलीकडील सर्व काही दिसते.

===

===

इस्त्रायलचे हे कृत्य अमानवी असल्याचे सांगत शत्रू राष्ट्रे व मानवी अधिकार कार्यकर्ते युनो व जागतिक कोर्टात गेले होते. हे चुकीचे आहे, असे सांगितल्यावर “आमची सुरक्षा महत्त्वाची आहे.” असे इस्त्रायलने सर्व जागतिक संस्था आणि संघटनांना ठासून सांगितले होते.

पॅलेस्टाईन नागरिक या भिंतींला नेहमी लक्ष्य करतात व इस्त्रायलवर याचा काहीच फरक पडत नाही.

भारत-पाक सीमेवर ताराच्या कुंपणासह उंच भिंत बांधण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन सीमेच्या धर्तीवर पाक सीमा सेन्सर वॉल लेस तयार केली जाणार आहे.

 

Israeli West bank barrier.Inmarathi3

 

असे हे इस्रायलचे तंत्रज्ञान इस्राईलला त्याच्याकडे येणाऱ्या मोठमोठ्या धोक्यांपासून वाचवते आणि त्यांच्या देशाला इतर हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?