इंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेट हा आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटचा कोणताही सामना आपले भारतीय क्रिकेट रसिक पाहिल्याशिवाय राहत नाही. क्रिकेट हे जणू त्यांच्यासाठी एक वेगळे विश्वच आहे. तसेच क्रिकेट हा फुटबॉलनंतर सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. भारतीय क्रिकेट संघातील या दिग्गज खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहिल्यावर लोकांना एक वेगळीच उर्जा अंगामध्ये संचार झाल्यासारखे वाटते.

आपल्याला वाटत असेल की, क्रिकेटर्सना फक्त क्रिकेटमधेच नैपुण्य प्राप्त आहे. पण असा विचार करणे, खूप चुकीचे आहे. आपल्या भारतीय क्रिकेटला काही असे देखील खेळाडू लाभले आहेत, जे उच्चशिक्षित आहेत. पण त्यांनी नेहमी क्रिकेटलाच प्राधान्य दिले. आज आम्ही तुम्हाला अशा काही भारतीय क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी इंजिनियरिंगची पदवी घेतली आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या क्रिकेटर्सबद्दल..

१. अनिल कुंबळे

 

Engineer degree hold cricketers.Inmarathi
indianexpress.com

एकेकाळी आपल्या भारतीय संघामध्ये आपल्या गोलंदाजीमुळे ओळखल्या जाणाऱ्या अनिल कुंबळेने आपला छंद जोपासण्यासाठी इंजिनियरिंगच्या ऐवजी क्रिकेटमध्ये करियर बनवले. त्यांनी १९९१–९२ मध्ये मॅकेनिकल इंजिनियरिंगची पदवी बंगळूरूच्या राष्ट्रीय विद्यापीठामधून घेतली आणि त्याचवर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केले. कुंबळेने आपल्या करियरमध्ये कितीतरी रेकॉर्ड बनवले आहेत. टेस्ट मॅचमध्ये ६१९ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३७ विकेट घेणारे कुंबळे क्रिकेटच्या दोन्ही फॉर्माटमध्ये भारताचे सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज आहेत.

२. जवागल श्रीनाथ

 

Engineer degree hold cricketers.Inmarathi1
mykhel.com

टीम इंडियाचे सर्वोत्तम खेळाडू राहिलेले जवागल श्रीनाथ मॅच रेफरी देखील राहिलेले आहेत. ते मानतात की, कोणत्याही खेळाडूची ग्रूमिंग आणि पर्सनालिटी डेव्हलप करण्यासाठी शिक्षित असणे खूप गरजेचे आहे. श्रीनाथला भारताच्या बेस्ट गोलंदाजांमध्ये गणले जाते. त्यांनी म्हैसूरच्या श्री जयाचमाराजेंद्र इंजिनियरिंग कॉलेजमधून बीई (B.E) केले आहे.

३. कृष्णामाचारी श्रीकांत

 

Engineer degree hold cricketers.Inmarathi2
thehindu.com

टीम इंडियाच्या या खेळाडूने देखील इंजिनियरिंग सोडून क्रिकेटच्या मैदानाकडे धाव घेतली. श्रीकांतने चेन्नईमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग केले आहे. आपल्या इंजिनियरिंगच्या शिक्षणादरम्यान ते थोडे क्रिकेट खेळत होते. पण इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षी त्यांनी टेस्ट क्रिकेटर बनण्याविषयी गंभीरपणे विचार केला आणि ते मैदानात उतरले.

४. ई. ए. एस. प्रसन्ना

 

Engineer degree hold cricketers.Inmarathi3
amazonaws.com

माजी ऑफ स्पिनर प्रसन्ना यांनी म्हैसूरच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून इंजिनियरिंग केले आहे. त्यामुळे तुम्ही बोलू शकता की, इंजिनियरिंग करून क्रिकेटर बनण्याची सुरुवात प्रसन्नाने केली होती.

५. रविचंद्रन अश्विन

 

Engineer degree hold cricketers.Inmarathi4
sportzwiki.com

रविचंद्रन अश्विन सध्या भारतीय संघाचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याने चेन्नईच्या एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून बी.टेकची पदवी मिळवली आहे. पण इंजिनियर बनण्याऐवजी तो क्रिकेटर बनला, कारण हे त्याचे स्वप्न होते.

६. श्रीनिवासराघवन वेंकटराघवन

 

Engineer degree hold cricketers.Inmarathi5
sportskeeda.com

५७ सामन्यामध्ये १५६ विकेट घेणारे श्रीनिवासराघवन वेंकटराघवन, यांचा रेकॉर्ड भलेही चांगला नसू दे. पण ते एक चांगले स्पिनर होते, यात कोणतीच शंका नाही. निवृत्तीच्या अगोदरच ते पंच बनले आणि खूप काळापर्यंत त्यांनी अंपायरिंग केली. त्यांनी देखील चेन्नईच्या कॉलेजमधूनच इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे.

असे हे भारतीय क्रिकेटर इंजिनियरिंगची उच्च पदवी मिळवून देखील आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिकेटर बनले आणि क्रिकेटमध्ये आपले वेगळे नाव कमावले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?