'हे आहेत २०१७ चे टॉप १० ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियन्स’

हे आहेत २०१७ चे टॉप १० ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियन्स’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या देशात गुजरात इलेक्शनमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा चालली आहे, मोदी की राहुल हाच सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. एक गुजरात इलेक्शनमध्ये कोणी कोणाला हरवले हे तर निकाल जाहीर झाल्यावर कळेलच, पण एका बाबतीत राहुल गांधींनी मोदी यांना मागे सोडले आहे.

राजकारण याबाबत जेव्हाही चर्चा होते तेव्हा केवळ नेते, निवडणूक, योजना इत्यादी मुद्दे उचलले जातात. पण यासर्वांत नुकतीच एक यादी जाहीर झाली आहे.

राजनेता म्हटल की, त्यांची भाषणे, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षावर केलेल्या टीका, इत्यादीच लक्षात राहत. पण कधी तुम्ही त्यांच्या दिसण्यावर लक्ष दिले का? कदाचित नाहीच.. कारण राजकारणात चांगले दिसण्याला फारसं महत्व नसत. पण ब्रिटनच्या प्रसिद्ध साप्ताहिक Eastern Eye ने २०१७ चे ‘हॅण्डसम इंडियन पॉलिटिशियंस’ ची यादी जाहीर केली आहे. यात भारतातील १० सर्वात हॅण्डसम राजकारण्यांना स्थान देण्यात आले आहे…

सचिन पायलट :

 

sachin-imarathi
toiimg.com

४० वर्षीय सचिन पायलट यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. म्हणजेच ते भारताचे २०१७ चे सर्वात हॅण्डसम राजकारणी आहेत. पायलट हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे सदस्य आहेत. सहारनपुर येथे जन्मलेले पायलट काँग्रेस नेते राजेश पायलट यांची सुपुत्र आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी फारूक अब्दुल्ला यांची मुलगी सारा अब्दुल्ला हिच्याशी लग्न केले. आता त्यांना आरन आणि विहान ही दोन मुलं आहेत.

कलिकेश नारायण सिंह देव :

 

kalikesh-dev-inmarathi
thehindubusinessline.com

कालीकेश नारायण हे ओडीसा चे राजकारणी असून ते बीजू जनता दलचे लीडर आहेत. ४३ वर्षीय कालीकेश यांचे वडील आणि आजोबा देखील राजकारणीच होते. यांना या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे.

कालीकेश यांच्या नावे ओडीसा चे सर्वात लहान आमदार बनण्याचा रेकॉर्ड देखील आहे. तसेच त्यांनी शुटींग आणि बास्केटबॉल या खेळांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

चिराग पासवान :

 

chirag-paswan-inmarathi
biographia.co.in

तिसऱ्या स्थानावर चिराग पासवान आहेत, हे लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री विलास पासवान यांचे सुपुत्र आहेत. सध्या चिराग हे लोक जनशक्ती पार्टीशी जुळलेले आहेत. ते चिराग पासवान फाउंडेशन नावाने एक एनजीओ देखील चालवतात. चिराग यांनी अभिनय क्षेत्रात देखील काम केले आहे. २०११ साली ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात ते कंगना राणावत सोबत दिसले होते.

ज्योतिरादित्य सिंधिया :

 

sindhiya-inmarathi01
dailypost.in

ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया हे देशातील चर्चित राजकारणी आहेत. काँग्रेस पार्टीचे सिंधिया हे लोकसभेत मध्यप्रदेशच्या गुनाचे प्रतिनिधित्व करतात. ज्योतिरादित्य सिंधिया हे ग्वालियरचे महाराजा देखील होते. त्यासोबतच ते मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन देखील होते. यांना या यादीत ४ थ्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.

मिलिंद देवडा :

 

milind-tewda-inmarathi
india.com

मिलिंद मुरली देवडा हे काँग्रेसचे सदस्य आहेत. मिलिंद हे २७ वर्षांच्या वयातच लोकसभा सदस्य बनले होते. मनमोहन सरकार वेळी मिलिंद मंत्री देखील होते. त्यासोबतच ते चांगला गिटार देखील वाजवतात. यांना या यादीत ५ वे स्थान मिळाले आहे.

उमर अब्दुल्ला :

 

umar-abdullah-inmarathi
indiatodaygroup.com

उमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होते. उमर अब्दुल्ला यांना यादीत ६ वे स्थान देण्यात आले आहे.

राहुल गांधी :

 

rahul-gandhi-inmarathi03
mahapunjab.com

या यादीत ७ व्या स्थानावर देशाचे सर्वात प्रसिद्ध राजनेते राहुल गांधी आहेत. नुकतच राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

अनुराग ठाकुर :

 

anurag-thakur-inmarathi
amazon.com

अनुराग ठाकूर हे तीन वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच ते इंडियन क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCIचे प्रमुख देखील होते, त्यांना या यादीत ८ वे स्थान मिळाले आहे.

मनोज तिवारी :

 

manoj-tiwari-inmarathi
topinfowala.in

भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि भोजपुरी अभिनेते/गायक मनोज तिवारी यांना या यादीत ९ वे स्थान देण्यात आले आहे.

शशि थरूर :

 

shashi-tharur-inmarathi
tehelka.com

शशी थरूर हे तिरुवनंतपुरम येथून लोकसभा सदस्य आहेत. थरूर हे काँग्रेस पार्टीचे असून ते डिप्लोमेट देखील होते. तसेच ते एक लेखक देखील आहेत. यांना या यादीत १० वे स्थान देण्यात आले आहे.

 

स्त्रोत : Eastern Eye

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?