' ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ‘ह्या’ मराठी शब्दांचा समावेश – InMarathi

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ‘ह्या’ मराठी शब्दांचा समावेश

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्याला इंग्रजी वाचताना एखादा शब्द अडला, तर आपण त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी शब्दकोशाचा म्हणजेच डिक्शनरीचा आधार घेतो. डिक्शनरीच्या वापरामुळे आपल्याला नवनवीन शब्दांचे अर्थ कळतात आणि त्यापुढे ते शब्द आल्यास आपल्याला ते लगेचच समजतात. मराठी माध्यमातील शिकलेली तरुण मुले जेव्हा शाळा संपल्यावर कॉलेजला जातात, तेव्हा बहुतेक मुलांना इंग्रजीचे काही शब्द समजण्यामध्ये थोडी समस्या येते.

 

Oxford dictionary add new words.Inmarathi
jagonews24.com

तुमच्यामधील देखील एखाद्याच्या बाबतीत नक्कीच असे घडले असेल. त्यावेळी आपल्याला याच शब्दकोशाचा हे शब्द समजून घेण्यासाठी उपयोग होत असे. बाजारात असे म्हटले तर खूप प्रकारच्या डिक्शनरी उपलब्ध आहेत. पण जशी ऑक्सफर्ड विद्यापीठ नावाजलेली आणि प्रसिद्ध आहे. तशीच ऑक्सफर्ड डिक्शनरी देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे आपल्याला बहुतेक लोक शब्दसंग्रह वाढवण्यासाठी याच डिक्शनरीचा वापर करण्यास सांगत असत.

पण आता हळूहळू या डिक्शनरीमध्ये आपल्या भाषेतील शब्द देखील जोडण्यात येत आहेत. दर तीन महिन्याला ऑक्सफर्ड डिक्शनरीत आधुनिक जीवनशैली आणि चालू घडामोडी पाहता काही नवीन शब्द समाविष्ट केले जातात. त्याच आधारावर या वर्षीच्या जून महिन्यामध्ये या डिक्शनरीमध्ये-

आपल्या मराठी भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘चणा’ आणि ‘चणाडाळ’ या शब्दांना ऑक्सफर्डच्या इंग्रजी शब्दकोषात समाविष्ट करण्यात आले आहे.

यावेळी ऑक्सफर्ड डिक्शनरीत ६०० पेक्षा अधिक शब्द जोडण्यात आले आहेत. यात फोर्स्ड एरर आणि बेगल यांनाही स्थान मिळाले आहे.

 

Oxford dictionary add new words.Inmarathi1
thehindu.com

यावेळी ऑक्सफर्ड शब्दकोषात टेनिसशी संबंधित काही शब्दांना जागा देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ‘फोर्स्ड एरर’ (Forced Error) आणि बेगल (Bagel) या शब्दांचा समावेश आहे. टेनिस सामन्यात ६-० असा स्कोर झाल्यास त्यासाठी बेगल या शब्दाचा वापर केला जातो. ज्यू संस्कृतीमध्ये गोलाकार डोनट ब्रेडला बेगल असे म्हटले जातो. त्याचा आकार शून्यासारखा असल्याने तोच शब्द येथे वापरला जातो.

ऑल इंग्लंड लॉन टेनिसचे आणि क्रॉक्केट क्लबचे ग्रंथपाल रॉबर्ट McNicol यांनी या टेनिसविषयी शब्दांना या डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यासाठी टेनिस एक्स्पर्ट्सना सांगितले होते. McNicol म्हणाले की, टेनिस आपल्या बऱ्याच दीर्घकालीन परंपरांसाठी प्रख्यात आहे आणि त्यातील एक विशिष्ट भाषा विशेषतः खेळत असलेले शॉट्स आणि रॉकेटचे तंत्र यांचे वर्णन करण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो.

 

Oxford dictionary add new words.Inmarathi2
wp.com

वोक आणि पोस्ट ट्रूथचा समावेश

यावेळी वोक (Woke) आणि पोस्ट ट्रूथ (Post-Truth) या शब्दांना शब्दकोषात जागा देण्यात आली आहे.

२०१६ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘पोस्ट ट्रुथ’ला वर्ड ऑफ द ईयर घोषित केले होते. तेव्हापासून या शब्दाचा वापर खूप वाढला आहे. तथ्य सोडून केवळ वाद, भावना आणि चर्चांच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीला सत्य मान्य करणे म्हणजेच पोस्ट ट्रूथ होय.

अशा या नवीन शब्दांचा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये समावेश झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्या भाषेतील शब्दाचा देखील समावेश केला गेला होता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?