निरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक – डॉ प्राजक्ता जोशी

शिंगाडा खायचा म्हटला की अनेकजण नाकं मुरडतात.

हा बेचव पदार्थ कशासाठी खायचा, त्यापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग आणि टेस्टी खाऊ असं म्हणणा-यांची संख्या काही कमी नाही.

घराघरातील मोठ्या माणसांकडून शिंगाडा खाण्याचा आग्रह धरला जातो, त्याच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात.

मात्र ते नाकारत, शिंगाड्याक़डे पाठ फिरविणारेच जास्त दिसतात.

मात्र शिंगाड्यांचे शरिराला होणारे फायदे पाहिले, की यांचं महत्व तुम्हाला नक्की पटेल.

थोडं शिंगाड्याबद्दल…

ऊपवासाला वापरले जाणारी भारतातील आणखी एक वनस्पती म्हणजे “शिंगाडा”. ईंग्रजीत याला “water chestnut” असे नाव आहे.

 

Shingada-inmrathi04
blogspot.in

 

पोषणमुल्ये :

Carbs-23.9mg
Suger-4.8mg
Fiber-3mg
Fat-0.1mg
Protein-1.4mg

Vitamins in percentage – B1-12%, B2-17%, B3 7%, B5-10%, B6-25%, B9-4%, Vitc-5%, Vit E-8%

Minerals- Magnessium-6%, Magnese-16%, Phospherous-9%, Potassium-5%

 

Shingada-inmrathi
dnaindia.com

 

  • भरपुर पोषणमुल्ये,कमी calories आणि low fat असणारा शिंगाडा म्हणजे निरोगी आहाराची गुरुकिल्लीच.
  • जीवनसत्व भरपुर असल्याने detoxificationमध्ये मदत करते. त्यामुळे काविळ झाल्यास सिंगाडा खावा.
  • सिंगाड्यातील mineralsही thyroid glandsच्या कार्याचे नियमन करतात. त्यामुळे thyroidism(hypo/hyper)च्या रूग्णांनी तो अवश्य खावा.

 

Shingada-inmrathi02
thehealthsite.com

 

Antioxidents भरपुर असल्याने सिंगाड्यात antiviralव antibacterial properties असतात.

तसेच यातील काही antioxidents जठर(stomach)व प्लिहा(spleen)यांची कार्यक्षमता वाढवतात.

तसेच antioxidentsमुळे त्वचा व केस यांचे आरोग्य राखल्या जाते.

वजन वाढवण्यास मदत करतो.

यातील potassiumच्या योग्य मात्रेने मांसपेशी(muscles)व मज्जासंस्थे ची कार्यक्षमता वाढते.

energyचा ऊत्तम स्त्रोत असल्याने अतिकष्टाची कामे, व्यायाम, खेळ करणाऱ्या व्यक्तीसाठी ऊत्तमआहार आहे.

 

Shingada-inmrathi03
bestindiancooking.com


आता आयुर्वेदीय दृष्टीकोन पाहुया –

आयुर्वेदात शिंगाडा याला अत्यंत महत्वाचे मानल्या जात असुन याला “शृंगाटक” असे संस्कृत नाव आहे.

पित्तदोषाचे शमन व पौरूष शक्तीचे वर्धन ही त्याची महत्वाची कार्ये सांगितली आहेत.

  • मुत्राल्पता(dysuria),अतिमुत्रता(polyuria) अशा व्याधीत ऊपयुक्त आहे.
  • शोथ(सुज)(inflamation) कमी करण्यास मदत करते. रक्तस्त्रावजन्य व्याधी(bleeding disorders) मध्ये ऊपयुक्त ठरते.
  • पित्तशामक व ऊष्णतेचे शमन करणारे असल्याने डोळ्याची जळजळ,तळव्यांची आग होणे,अशी लक्षणे दिसल्यास सिंगाड्याचे सेवन करावे.
  • तसेच ऊन्हाळ्यातही सिंगाडा अवश्य खावा.

 

  • Shingada-inmrathi01
    blogspot.in

     

  • यातील vitaminsवminerals चे प्रमाण पाहता गरोदर महिलेने शिंगाडा अवश्य खावा.
  • आयुर्वेदाने (threatened abortion)गर्भपात वारंवार होत असेल तर शिंगाडा ऊपयुक्त सांगितला आहे.

 

pregancy inmarathi

  • दाह कमी करण्याचे कार्य सिंगाडा करतो.
  • ग्राही हा गुण सांगितला असुन त्यामळे indigestion,irritable bowel syndrome मध्ये ऊपयुक्त ठरतो .

बर्याच आयुर्वेदीक कल्पांमध्ये सिंगाडा समाविष्ठ असतो. ऊदा. अमृतप्राश घृत, सौभाग्यशुन्ठी

तर असा हा शिंगाडा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे याचा आपल्या आहारात नक्की समावेश करावा..

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?