' तुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का?

तुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्यातील बहुतेक लोकांना फिरायला नक्कीच आवडत असेल. नवनवीन ठिकाणी जाऊन त्या ठिकाणांबद्दल माहिती करण्याची ओढ आणि तेथील सौंदर्य पाहण्याची आपली इच्छा असते. पण प्रत्येक ठिकाणी जाणे काही आपल्याला जमत नाही, तरी देखील जेवढ्या ठिकाणी जाणे आपल्याला शक्य आहे. तेवढ्या ठिकाणी आपण नक्कीच जातो. आपण पाहिलेल्या या ठिकाणांमधीलच एक ठिकाण आपल्या आवडीचे होऊन जाते. जिथे आपण कधीही जाणे पसंत करतो. आपली जशी काही फिरण्यासाठी खास ठिकाणे असतात, तशीच काहीशी आपल्या बॉलीवूड चित्रपटांमधील कलाकारांची देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया, बॉलीवूडच्या आपल्या आवडत्या या कलाकारांना कुठे फिरायला जाण्यास आवडते..

१. अमिताभ बच्चन

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi
jagran.com

‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गोव्याच्या बीचवर आणि लंडनमध्ये फिरायला जायला आवडते. ते आपली सुट्टी येथेच घालवणे पसंत करतात. २०१३ मध्ये त्यांनी गोव्याला आपल्या मुलीबरोबर आणि नातीबरोबर खूप वेळ घालवला होता. अमिताभ जेव्हा लंडनला जातात, तेव्हा ते सेंट जेम्स कोर्टच्या प्रेसिडेंशियल स्वीटमध्ये राहतात.

२. शाहरुख खान

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi1
intoday.in

बॉलीवूडच्या किंग खान शाहरुखला आपल्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये वेळ घालवायला आवडतो. तिकडे त्याचे स्वतःचे घर आहे. लंडनमधील ब्रिटीश संग्रहालय आणि टॉवर ब्रिज खूपच आकर्षक आहेत. खरेदीसाठी लंडनमध्ये खूप काही पर्याय आहेत. ज्या लोकांना खरेदी करायला आवडते, अशा लोकांसाठी लंडन एका स्वर्गाप्रमाणे आहे. तसेच, शाहरुखला दुबईला फिरायला जायला देखील आवडते.

३. सलमान खान

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi2
gulfnews.com

भाईजान सलमान खानला दुबईला जाऊन वेळ घालवण्यास खूप आवडते. दुबईमधील लोक देखील त्याला योग्य तो सन्मान देतात. दुबईला सलमान खानला सर्व भाई नावाने हाक मारतात. दुबईला फिरायला जाणे म्हणजे खाणे, खरेदी आणि मज्जा हे सर्व एकाच ठिकाणी मिळाल्यासारखे आहे. दुबईत खेळापासून ते स्पापर्यंत सर्वकाही तुम्हाला अनुभवायला मिळेल.

४. दिपिका पादुकोण

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi3
amazonaws.com

दिपिका पादुकोणला युरोपियन देशांतील समुद्र किनारे खूप आवडतात. टीव्हीवर आलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने ही गोष्ट सांगितली होती. फ्रेंच रिवेरा हे तिचे आवडते ठिकाण आहे. फ्रेंच कोस्टलाईनमध्ये याट आणि क्रूज तिचे फेवरेट आहेत.

५. अक्षय कुमार

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi4
jagran.com

बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेला आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अक्षय कुमारचे कॅनडामधील व्हँकूव्हर आणि टोराँटो ही सर्वात आवडती ठिकाणे आहेत. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ काढून अक्षय हा कॅनडा आणि टोराँटोला फिरण्यासाठी जातो.

६. प्रियांका चोप्रा

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi5
Instagram

प्रियांकाला समुद्रकिनारा खुप आवडतो. प्रियांकाला आपली सुट्टी घालवण्यासाठी थायलंडला जायला आवडते. तिला तेथील समुद्र किनाऱ्यावर विश्रांती घ्यायला आवडते. प्रियांकाच्या मते, सुट्टीचा अर्थ म्हणजे आपली कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे होय. थायलंड हे समुद्रकिनारे आणि समृद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.

७. कंगना राणावत

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi6
kinstacdn.com

बॉलीवूडमध्ये क्वीन म्हणून ओळख असलेल्या कंगना राणावतला पॅरीस हे  रोमँटिक शहर खूप आवडते. येथे लाखो पर्यटक आयफेल टॉवर, नोट्रे डेम कॅथेड्रल आणि लूव्हर म्युझियम पाहण्यासाठी गर्दी करतात.

८. अनुष्का शर्मा

 

Favourite holiday destinations of bollywood stars.Inmarathi7
tribune.com

अनुष्का शर्मा ही नुकतीच स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत विवाह बंधनात अडकली. अनुष्काचे आवडते फिरण्याचे ठिकाण इटली आहे. त्यामुळेच की काय, अनुष्का आणि विराटने इटलीला लग्न केले. जेव्हा कधी अनुष्काला शुटींगपासून वेळ मिळतो, तेव्हा ती इटलीला जाणे पसंत करते.

असे हे आणि इतर बॉलीवूड स्टार्सचे वेगवेगळे आवडते हॉलिडे डेस्टीनेशन आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?