' या प्रसिद्ध वस्तू जेव्हा पहिल्यांदा ग्राहकांसमोर आल्या तेव्हा त्या कश्या दिसायच्या?

या प्रसिद्ध वस्तू जेव्हा पहिल्यांदा ग्राहकांसमोर आल्या तेव्हा त्या कश्या दिसायच्या?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आज आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करतो. कोणतेही काम करण्यासाठी आज खूप प्रकारच्या मशीन आलेल्या आहेत. आज डिजिटल जगात खूप नवीन शोध लागलेले आहेत आणि काळाप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल देखील झालेले आहेत.

शास्त्रज्ञांनी काळाप्रमाणे नवीन शोध लावले. त्यांनी हे शोध लावण्यासाठी खूप मेहनत घेतली, त्यासाठी त्यांना खूप वर्ष त्या एकाच गोष्टीवर काम करावे लागले.

आता त्या गोष्टींचे खूप वेगवेगळे नवीन अपग्रेड आले आहेत, पण सुरुवातीला तयार करण्यात आलेले या वस्तूंचे व्हर्जन खूपच अनोखे होते.

new gadgets inmarathi
green computers

 

आज अशा कितीतरी वस्तू आहेत, जे आपल्या जीवनातील एक प्रमुख भाग बनलेल्या आहेत. पण जेव्हा या बनल्या होत्या, तेव्हा त्यांचा लुक खूपच वेगळा होता.

आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींचे फोटो दाखवणार आहेत, जे पाहून तुम्ही देखील विचार कराल की, खरच या गोष्टी पहिल्यांदा अशा दिसत होत्या का? हो पण हे खरे आहे. चला तर मग पाहूया, तुम्ही वापरत असलेल्या वस्तू, जेव्हा पहिल्यांदा आल्या तेव्हा कशा दिसत होत्या!

१. ऍपलचा संगणक

 

apple1 computer inamarthi
bt.com

 

आजच्या काळामध्ये मध्यमवर्गीय लोकांसाठी ऍपलचा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणक खरेदी करणे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही. ऍपल आयफोन किंवा आयपॅड घेणं हे एक आता स्टेटस सिम्बॉल मानलं जातं!

जेव्हा ऍपलच्या पहिल्या संगणकाचा शोध लागला, तेव्हा तो असा दिसत होता. त्यावेळी याचे नाव  ‘Apple-I’  ठेवण्यात आले होते.

 

२. फोर्डची कार

 

first ford car inmarathi
wikimedia.org

 

आज चारचाकी गाडी घेणं हे कोणालाही  शक्य आहे, तसेच त्यासाठी विविध सोयी सुविधा आणि हफ्ते पद्धत सुद्धा चालू केली आहे त्यामुळे कर घेणं हे आता मध्यमवर्गीय लोकांनासुद्धा शक्य झालं आहे!

आज सगळीकडेच प्रसिद्ध असलेली फोर्डची कार सुरुवातीला काही अशाप्रकारे दिसत होती. तिचे नाव त्यावेळी ‘Model A’ असे ठेवण्यात आले होते.

 

३. विंडोजचे पहिले व्हर्जन 

 

ms dos inmarathi
winworld

 

आज जवळपास सगळीकडेचं मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम संगणकामध्ये वापरण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजचे पहिले व्हर्जन काही अशाप्रकारचे दिसत होते.

 

४. कॅनन कॅमेरा

 

kwanon inmarathi
pinimg.com

 

आज खूप लोकांना DSLR घेऊन फोटोग्राफर बनण्याची हौस असते. त्यामुळे आता फोटोग्राफर्सची संख्या वाढली आहे.

पण जेव्हा कॅननचा पहिला कॅमेरा बनवला गेला होता, तेव्हा तो काही अशा प्रकारचा दिसत असे. त्यावेळी या कॅमेऱ्याचे नाव ‘Kwanon’ असे ठेवण्यात आले होते.

 

५. हार्ले डेव्हीडसन

 

harley inmarathi
ask men

 

हार्ले डेव्हीडसन कंपनीची बाईक खरेदी करण्याची इच्छा आज बहुतेक तरुणांची असते. आपणही हार्ले डेव्हीडसन घेऊन फिरावे असे वाटत असते. पण आज तुम्हाला बघून आश्चर्य वाटलं असेल कि, ही महागडी बाईक बनवणाऱ्या कंपनीची पहिली बाईक अशी दिसत होती.

६. बार्बी डॉल

 

barbie doll inmarathi
history.com

 

लहानपणी जवळपास सर्वच मुलींना आवडणारी बार्बी डॉल ही खूपच सुंदर आणि मोहक असते. ही डॉल लहान मुलींना आपल्याकडे आकर्षित करते. मुलींच्या विश लिस्टमध्ये नेहमी असणारी ही बार्बी डॉल पहिल्यांदा अशी दिसत असे.

 

७. HP लॅपटॉप

 

hp laptop inmarathi
YouTube

 

एचपीचे लॅपटॉप आज खूप प्रसिद्ध आहेत. एचपी संगणक ने जगामध्ये एक आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. एचपीचा पहिला लॅपटॉप एखाद्या टाईप रायटरसारखा दिसत असे. एचपीचा पहिला लॅपटॉप ‘HP-110’ हा आहे.

 

८. निविया क्रीम

 

 

nivea inmarathi
pinterest

 

निविया क्रीम आज कॉस्मेटिक्सच्या जगातील एक खूप मोठा ब्रँड बनला आहे. जेव्हा निवियाने आपली पहिली क्रीम बनवली होती, तेव्हा त्या क्रीमची डब्बी काही अशाप्रकारे दिसत होती.

 

९. सॅमसंग टीव्ही

 

television inmarathi
timetoast

 

एकेकाळी घरात टीव्ही असणं म्हणजे चैनीची गोष्ट किंवा श्रीमंताचं लक्षण मानलं जायचं, पण आता तर अगदी झोपडपट्टीत देखील तुम्हाला ५६ इंची स्मार्ट टीव्ही दिसेल!

सॅमसंगने आज टेलिव्हिजन बनवण्याच्या क्षेत्रामध्ये देखील एक चांगले नाव कमावले आहे. सॅमसंगच्या टीव्हीची स्क्रीन आज मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा देखील पातळ आहे. वरील चित्र हे सॅमसंगच्या पहिल्या टीव्हीचे आहे. सॅमसंगच्या पहिल्या मॉडेलचे नाव ‘P-3202’ हे होते.

 

१०. कोलगेटचे पहिले दंतमंजन

 

colgate powder inmarathi
slideshare

 

सध्या पतंजली टूथपेस्ट ने सगळं मार्केट व्यापून टाकल आहे, पण याआधी मार्केट मध्ये फक्त एकच टूथपेस्ट सर्वात जास्त विकली जायची ती म्हणजे कोलगेट, आता भलेही कोलगेट चा खप कमी झाला असेल पण तरीही एक काळ होता जेंव्हा याशिवाय दुसरा पर्याय नव्हता!

कोलगेट हे दात साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रँडमधील एक प्रसिद्ध ब्रँड आहे. सुरुवातीला कोलगेटचे दंतमंजन काही अशाप्रकारचे दिसत असे.

 

११. कंडोम

 

first condom inmarathi
all thats interesting

 

आज कंडोम हे खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि फ्लेवर्समध्ये बाजारात उपलब्ध आहेत. १६४० मध्ये तयार करण्यात येणारा कंडोम काही अशा प्रकारचा दिसत असे. त्यावेळी हे कंडोम मेंढीच्या कातडीने बनवले जात असे.

अशा या आणि यांसारख्या काही इतर वस्तू सुरुवातीला जेव्हा बाजारात आल्या, तेव्हा आतापेक्षा खूपच वेगळ्या आणि विचित्र दिसत होत्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?