''ह्या' गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते

‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजचे युग हे आधुनिक युग आहे. काही वर्षांआधी पर्यंत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आज शक्य झाल्या आहेत. आज अनेक तंत्रज्ञान मानवाने प्रगत केले आहे. पण तरी देखील, अनेकांच्या मते, ह्यापेक्षा कितीतरी अधिक मोठी झेप आपण ह्या आधीच घेतली आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की जर आपण प्राचीन काळी नजर टाकली तर असे दिसून येते त्या काळचे विज्ञान, वेद-शास्त्र हे आजपेक्षा अधिक प्रगत होते.

मानवाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे शोध आज लावले ते प्राचीन काळी भारतातील ऋषी-मुनींनी तेव्हाच लावल्याचे अनेक उल्लेख पौराणिक लेखांत सापडतात. आज आपण असेच काही वैज्ञानिक शोधांबद्दल जाणून घेणार आहोत जे भलेही आज विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या नावे असतील पण त्याचा उल्लेख प्राचीन काळात देखील सापडतो.

सूर्यमंडळ :

 

Mythological literature and Scientific innovations.Inmarathi
oneindia.com

सूर्यमंडळ, ज्याचा वैज्ञानिकांनी खूप काळा नंतर शोध लावला. पण याची माहिती आपल्याला ऋग्वेदात सापडते. ऋग्वेदनुसार ‘सूर्य आपल्या कक्षेत फिरतो आणि फिरताना पृथ्वी तसेच इतर ग्रहांची ऐकमेकांशी टक्कर होणार नाही याप्रकारे त्यांच्यात संतुलन बनवून ठेवतो.’

गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत :

 

Mythological literature and Scientific innovations.Inmarathi1
Youtube.com

गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची माहिती देखील आपल्याला ऋग्वेदात सापडते. ऋग्वेदानुसार, ‘पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यासोबतच त्यावर असणारे व्यक्ती देखील त्यानुसार फिरतात, तसेच ती सूर्याभोवती देखील फिरते.’

पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर :

 

Mythological literature and Scientific innovations.Inmarathi2
indiatvnews.com

पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराबाबत हनुमान चालीसामध्ये सांगण्यात आले आहे. हनुमान चाळीसच्या एका श्लोकात सांगण्यात आले आहे की,

“जुग सहस्त्र जोजन पर भानू, लील्यो ताहि मधुर फल जानू”

या श्लोकचा अर्थ असा की, भानू म्हणजे सूर्य हा पृथ्वीपासून जुग सहस्त्र एवढ्या अंतरावर आहे. जेव्हा वैज्ञानिकांनी हे अंतर मोजले तेव्हा ते जवळपास एवढेच होते.

१ जुग = १२००० वर्ष

१ सहस्त्र जुग = १२०००००० वर्ष आणि १ योजन = जवळपास ८ मैल

जुग सहस्त्र योजनचा अर्थ १२००० X १२०००००० X ८ = ९६०००००० मैल

म्हणजेच किलोमीटरमध्ये, ९६०००००० X १.६ = १५३६००००० एवढा आहे. खरे अंतर १५२०००००० एवढे आहे.

पृथ्वीचा परीघ :

 

Mythological literature and Scientific innovations.Inmarathi3
nasa.gov

७ व्या शतकात ब्रह्मगुप्त यांनी पृथ्वीबद्दल सांगितले होते की, पृथ्वीचा परीघ हा जवळपास ३६००० किलोमीटर एवढा आहे. जेव्हा वैज्ञानिकांनी गणना करून याला ४००७५ किलोमीटर असल्याचे सांगितले होते. या दोन आकड्यांमध्ये केवळ एक टक्क्याचा फरक होता.

प्रकाशाची गती :

 

Mythological literature and Scientific innovations.Inmarathi4
sciencealert.com

एका प्राचीन वैज्ञानिकाने पुरातन काळातच प्रकाशाच्या गतीचा शोध लावला होता. त्यांनी सांगितले होते की, ‘सूर्य हा अर्ध्या निशेमध्ये २२०२ योजनपर्यंतचे अंतर कापतो’, एक योजन म्हणजे जवळपास ९ मैल आणि एक निमेश म्हणजे एका सेकंदाचा १६/७५ वा भाग. म्हणजेच, २२०२ योजन X ९ मैल X ७८/८ = १,८५,७९४ मैल प्रती सेकंद हा आहे. याची खरी मोजणी केल्यानंतर हे लक्षात आले की, त्याने सांगितलेले आकडे आणि मोजणी केलेले आकडे जवळपास बरोबरच आले होते. खऱ्या मोजणीमध्ये हे आकडे १,८६,२८२.३९७ प्रती सेकंद एवढे आले.

एका वर्षाची लांबी :

 

Mythological literature and Scientific innovations.Inmarathi5
wordpress.com

सूर्याच्या सिद्धांतानुसार, वर्षाच्या लांबीच्या मोजमाप करण्यासाठीच्या चार पद्धती आहेत. त्यांची नावे नक्षत्र, सावना, चंद्र आणि सौर ही आहेत. सौर पद्धतीने वर्षाची अचूक लांबी ३६५ दिवस, ६ तास, १२ मिनिटे आणि ३० सेकंद एवढी दर्शवते.

जर तुम्ही विचार करत असाल की, त्यांनी हे कसे ठरवले, तर तुम्ही कोणार्क आणि हम्पी येथिल मंदिरांना भेट देऊन याविषयी जाणून घेऊ शकता. येथे तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा अविश्वसनीय वास्तुकला आढळतील.

पृथ्वी गोलाकार आहे:

 

Mythological literature and Scientific innovations.Inmarathi6
theelephantking.org

आर्यभट्टाने अशा एका सूत्राचा शोध लावला होता, ज्यावरून हे समजते की, आपली पृथ्वी ही एका अक्षावर फिरते. पीआयचे मूल्य ३.१४१६ असल्याचे यावरून समजते. आर्यभट्टाने सांगितले होते की, पृथ्वीचा परीघ हा ३९७३६ किलोमीटर एवढा आहे आणि तो खऱ्या मुल्याच्या फक्त १०० किलोमीटर कमी आहे. तसेच, आर्यभट्टाने हे देखील सांगितले होते की, पृथ्वी फक्त एकटीच फिरते बाकीचे तारे आणि सूर्य एका ठिकाणीच आहेत.

अशी आणि यांसारख्या इतर काही उदाहरणांवरून हे समजते की, काही प्राचीन काळातील गोष्टी या विज्ञानाशी मिळत्याजुळत्या आहेत.

आता ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत की छद्म विज्ञानाच्या – हा अनंतकाल चालू शकणारा वाद आहे. जो पर्यंत आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर ह्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तो पर्यंत खात्रीने काहीच म्हणणे उचित ठरणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते

 • December 14, 2017 at 1:50 pm
  Permalink

  Hanuman chalisa predicted calculated distance is dimensionily wrong. Dimension of light year is distance but your dimension of calculation is year×year×miles i.e. time•time• distance.
  It must be distance.

  Reply
  • May 13, 2018 at 4:04 pm
   Permalink

   for your kind information in space distace is calculated in time ie प्रकाश वर्ष

   Reply
 • January 30, 2018 at 7:28 am
  Permalink

  काही प्रश्न
  १.ऋग्वेदातल्या कोणत्या ऋचामध्ये सूर्य मंडळाचा उल्लेख आहे ज्यात वरील दावःही करण्यात आलाय (ऋग्वेद ३५०० ते४००० वर्षे जुना आहे असे मानले आणि भारतीय ब्र्ह्मगुप्ताने शून्याची संकल्पना साधारण ७ व्या शतकात मांडली – चला त्याआधी साधारण १००० वर्षे ती अस्तित्वात होती असे मानले तरी ऋग्वेदाचा रचना काल अजून १०००-१५०० वर्षे मागे आहे मग एवढ्या गणना ते कशा करत
  २. प्रकाशाची गती चे गणित चुकले आहे २२०२*९*७८ /८=१९३२२५.५ इतके येते आणि बाय द वे ७८/८ काय आहे ?सेकदाचा १६/७५ वा भाग इतका लहान काल ते लोक कसा मोजत आणि त्याचे प्रयोजन काय होते ?
  ३. ३६००० आणि ४००७५ ह्या दोन आकाद्याताला फरक १ टक्का नाही … स्वत: गणित करून बघावे ….
  ४. पृथ्वीच्या एका अक्षावर फिरण्याचा आणि ३.१४ चा काय संबंध ?
  ५.मी स्वत: अनेक वेळा कोणार्क आणि हम्पीला जाऊन आलोय तिथे अशी कोणतीही माहिती नाही ( विशिष्ट तारखेला सूर्याची किरणे खिडकीतून आत येणे वगैरे गोष्टी जगभरात अनेक ठिकाणी आहेत त्याने पृथ्वीचा परीघ किंवा पाय चे मूल्य सिद्ध होत नाही ….

  Reply
 • July 5, 2018 at 10:46 pm
  Permalink

  उस time कोई technology नही थी तो वो कैसे क्या इस सब बात की knowledge रखते है कु की without technology ये सब research possible नही हे ।

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?