' खरं वाटणार नाही पण, कोणतेही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

खरं वाटणार नाही पण, कोणतेही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कॅन्सर हा एक भयानक आजार आहे. एकदा जर तो आजार जडला की त्यातून वाचणे खूप कठीण असते. त्यामुळे जगभरात अनेक माध्यमांतून कॅन्सर संबंधी जागरूकता पसरविली जाते. कारण त्यापासून वाचण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे – तो म्हणजे कॅन्सर न होणे.

पण आजही या आजाराबद्दल हवी तेवढी जागरूकता नाहीये.

‘तंबाखुचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे, त्याने कॅन्सर होऊ शकतो’, हे वाक्य आपण आपल्याला बिडी-सिगरेटच्या प्रत्येक पाकिटावर लिहिलेलं आढळते.

 

smoking kills inmarathi

 

पण फक्त तंबाखुनेच कॅन्सर होतो काय? तर नाही.

याशिवाय देखील अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या कॅन्सर होण्याला कारणीभूत ठरतात.

त्यातल्या काही आपल्या जीवनातील दैनंदिन गोष्टी आहेत आणि या गोष्टींमुळे देखील कॅन्सर होऊ शकतो.

हे ही वाचा – या पदार्थांचं अतिसेवन वेळीच बंद केलं नाहीत तर तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकू शकाल

वाईन :

 

wine inmarathi

 

एकीकडे वाईनला आपल्या आरोग्यासाठी चांगले मानल्या गेले आहे, तर दुसरीकडे एका थेअरीनुसार वाईनचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका दुप्पट असतो.

या शोधानुसार दररोज अर्धा ग्लास वाईनचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका १६० टक्क्यांनी वाढतो.

डियोड्रंट :

 

Deo InMarathi

 

डियोड्रंटमध्ये असणारे अॅल्युमिनियम तत्वांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो. कारण डियोड्रंट हा तुमच्या त्वचेवर तसेच लावण्यात येणाऱ्या अंगांवर सरळ प्रभाव करतो.

चिप्स : 

 

chips inmarathi

 

चिप्स (वेफर्स) आवडत नाही असा माणुस शोधूनही सापडणार नाही. पण हे माहित आहे का की, यामुळे देखील तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

याच्या अति सेवनाने तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. रिसर्च नुसार ५ पेक्षा जास्त वेळा चिप्स खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २७ टक्क्यांनी वाढतो.

ओरल सेक्स :

 

banana inmarathi

 

आजकालच्या तरुणांमध्ये ओरल सेक्सचं प्रमाण वाढलं आहे.

पण सेक्सवर झालेल्या एका स्टडीमध्ये असे दिसून आले की, पुरुष आणि महिला दोघांतही ओरल सेक्समुळे घश्याचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

त्यामुळे याकरिता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाता – कॅन्सरपेक्षाही भयंकर असा हा आजार महिलांना छातीत होऊ शकतो, वेळीच सावध व्हा.

हेयर कलर :

 

hair color inmarathi'

 

हेअर कलर म्हणजेच केसांना रंगवणे. आधी केवळ वय लपविण्यासाठी या हेअर कलर्सचा वापर करण्यात येत होता. पण आता तर केस रंगवणे म्हणजे ट्रेंड झाला आहे.

पण तुम्हाला माहित आहे का – की, १५ वर्षांहून जास्त काळ हेअर कलर्सचा वापर केल्याने गॉल ब्लॅडरचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

सन स्क्रीन :

sunscreen inmarathi

 

सन स्क्रीन, सूर्याच्या किरणांपासून वाचण्याकरिता अनेक लोकं सन स्क्रीनचा वापर करतात. पण हे सन स्क्रीन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. याने त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

मोबाईल फोन :

 

mobile inmarathi

 

१० मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल वापरल्याने डोक्याच्या सेल्सवर वाईट परिणाम होतो.याने कॅन्सरचा धोका वाढतो. तर अनेक वेळा यामुळे ब्रेन ट्युमर होण्याचा धोका देखील वाढतो.

रेड मीट :

 

red meat inmarathi

 

एका रिसर्चनुसार असे कळाले की, जे लोकं मिट, बीफ, चिकन याचे अति प्रमाणात सेवन करतात त्यांना लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसाच्या कॅन्सर लवकर होतो.

विटामिन ई :

 

vitamin e inmarathi

 

७७ हजार लोकांवर करण्यात आलेल्या एका रिसर्च नुसार असे दिसून आले की, अति प्रमाणात विटामिन-E चे अवशोषण केल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

कारण, अति प्रमाणातील विटामिन-ई शरीरातील ब्रिटॉनला दर १५ मिनिटांत संपवते.

ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता संभावते.

कुकीज किंवा बेकरी प्रोडक्ट्स :

 

cookies inmarathi

 

कुकीज किंवा बेकरी प्रोडक्ट्स मध्ये अनेक प्रकारचे रसायन मिसळले जाते. जेणेकरून या वस्तू जास्त काळ टिकतील, खराब होणार नाहीत.

पण हे रसायन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात. यांमुळे देखील कॅन्सर होण्याची शक्यता असते.

माऊथवॉश :

 

mouthwash inmarathi

 

माऊथवॉश हे मौखिक स्वच्छतेसाठी गरजेचे म्हणून वापरले जाते. पण हेच माऊथवॉश आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. वैज्ञानिकांनुसार माऊथवॉश मध्ये अल्कोहोल असते ज्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

थोडक्यात सांगायचं झालं कुठल्याही गोष्टीचे अति सेवन अथवा वापर हे अपायकारकच…

हे ही वाचा – आईच्या कॅन्सरची बातमी ऐकून ‘या’ तरुणाने स्वतःमध्ये केला आमूलाग्र बदल!

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “खरं वाटणार नाही पण, कोणतेही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?