'फोटो काढताना बोलल्या जाणारे "Say Cheese" नेमके आले कुठून, जाणून घ्या

फोटो काढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

फोटो काढताना तुम्ही अनेक वेळा ‘Say Cheese’ असे म्हटले किंवा ऐकले असेल. जेव्हा कधी आपल्याला कुणी ‘Say Cheese’ म्हणते, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल येते आणि आपण आनंदाने आपला फोटो काढतो. आपल्या आजूबाजूला असणारी बहुतेक माणसे फोटो काढताना या वाक्यांशचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का ? की फोटो काढताना या वाक्यांशचा वापर का करतात, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का ? चला तर मग जाणून घेऊया, हा वाक्यांशचा वापर करण्याच्या मागील कारण…

 

Say cheese.Inmarathi
deviantart.net

‘Say Cheese’ चा वापर करण्यामागे खूप रंजक गोष्ट आहे. एका थेरीनुसार, ch चा आवाज तुमच्या दातांना एका अशा पोजिशनवर आणतात की, जेव्हा ee बोलले जाते, तेव्हा चेहऱ्यावर एका विशिष्ट प्रकारची स्माईल येते.

याचा वापर सर्वात पहिल्यांदा १९४० मध्ये करण्यात आला होता. जोसेफ डेव्हीसनुसार, हा हसण्यासाठी सर्वात चांगला फॉर्म्युला आहे आणि त्यामुळे आपण जेव्हा आपली फोटो काढत असतो, तेव्हा आपल्याला आनंदी दाखवण्यासाठी असे बोलायला सांगितले जाते. त्यावेळी तुम्ही जरी कोणत्याही दुसऱ्या विचारात असलात, तरीदेखील तुम्हाला हे शब्द आनंदी दाखवतात.

 

Say cheese.Inmarathi2
nomadicboys.com

डेव्हीसने ही गोष्ट मिशन टू मॉस्को दरम्यान आपलाच फोटो काढताना सांगितली होती. हे खूपच सोपे आहे, तुम्हाला फक्त Cheese बोलायचे आहे आणि ते बोलल्यामुळे आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटेल. त्याने हे देखील सांगितले कि, त्याने ही गोष्ट एका राजनेत्याकडून शिकली आहे. एका खूप प्रसिद्ध राजनेत्याकडून, परंतु त्यांचे नाव उघड करण्यात आले नाही.

असे मानले जाते की, डेव्हीस यांनी ज्या नेत्याबद्दल सांगितले, ते अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलीन रुसवेल्ट होते. रुसवेल्ट यांनी १९३३ पासून १९४५ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती पद भूषवले होते. डेव्हीस हे राष्ट्रपती रुसवेल्ट पदावर असण्याच्या काळामध्ये माजी राजदूत देखील राहिलेले आहेत.

 

Say cheese.Inmarathi1
history.com

आता राष्ट्रपती रुसवेल्ट यांनी स्वतः या गोष्टीला तयार केले होते किंवा त्यांनी कोणा दुसऱ्याकडून ही गोष्ट शिकली होती. याबद्दल नक्की सांगणे थोडे कठीण आहे. पण हे तर नक्की सांगता येते की, त्यांनी केलेल्या याच्या वापरानंतर हे वाक्यांशचा (Phrase) खूपच लोकप्रिय झाले आहे आणि आज देखील फोटो घेण्याअगोदर बहुतेक लोकं याचा वापर मोठ्या उत्साहाने करतात. लोकांना देखील असे करण्यामध्ये खूप मज्जा वाटते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?