राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते हे ‘१० नेते’ काय करायचे माहित आहे?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या देशात तीन गोष्टींची सर्वात जास्त चर्चा होत असते एक म्हणजे बॉलीवूड, दुसरं क्रिकेट आणि तिसरं म्हणजे ‘राजकारण’…!
आपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.
सत्ताधारी तसेच विरोधीपक्षनेते हे राजकारण घडवून आणतात.

आत्ता नुकतंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पतंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतायत ती फक्त इव्हेंटबाजी आहे असा सुर बऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे!
अर्थात त्यामागे देखील राजकारणच आहे, यावरून आपल्या लक्षात येईल की या देशात इतक्या मोठ्या महामारीच्या काळात सुद्धा लोकं राजकारण विसरलेले नाहीत!
कधी त्याचा परिणाम वाईट होतो, तर कधी चांगला होतो. पण राजकारणी येतात कुठनं, एक राजकरणी किंवा नेता होण्याआधी ते कसे असतील? काय करत असतील?
असे अनेक प्रश्न नेहमीच आपल्याला पडतात. चला तर मग आज जाणून घेऊ की आपले आवडते नेते राजकारणात येण्याआधी नेमकं काय करायचे…
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी :

आज साऱ्या जगात स्वतःच्या कर्तुत्वाने भारताचे नाव उंच करणाऱ्या आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोण ओळखत नसेल??
जय अमेरिकेने एकेकाळी यांनाच व्हिजा नाकारला होता तेच मोदी पंतप्रधान होताच त्यांना अमेरिकेकडून खास बोलावणं आलं! राजकारण काही वेळ बाजूला ठेवलं तर मोदींचे व्यक्तिमत्व हे अद्वितीयच आहे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका गरीब कुटुंबातील आहेत. लहानपणी नरेंद्र मोदी हे चहाच्या टपरीवर काम करायचे हे तर आपल्या सर्वांना माहित आहे.
त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले. राजकारणात रुजल्यानंतर सर्वातआधी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान बनले.
२. देवेंद्र फडणवीस :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९९२ साली नागपूरच्या गव्हरमेंट लॉ कॉलेजमधून पदवी घेतली त्यानंतर ते अभाविपशी जुळले.
ते सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुयायी आहेत, शिवाय त्यांच नेतृत्व, वक्तृत्व शिवाय त्यांची अभ्यासू वृत्ती यामुळे नक्कीच त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला फायदाच झाला!
३. बाळासाहेब ठाकरे :

ज्यांच्या एका हाकेवर संपूर्ण मुंबई बंद व्हायची, पार दिल्लीपर्यंत सगळ्या मंत्र्या संत्र्याच धाब दणाणून सोडणारे ढाण्या वाघ आणि हिंदू हृदयसाम्राट म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर होती असे बाळासाहेब ठाकरे!
आज जरी बाळासाहेब आपल्यात नसेल तरी महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच विसरू शकणार नाही!
बाळासाहेब ठाकरे हे राजकारणात येण्याआधी एक कार्टूनिस्ट होते. तेव्हा ते फ्री प्रेस जर्नलकरिता कार्टून बनवायचे. पण राजकारणात आल्यानंतर ते एक प्रभावशाली नेते म्हणून महाराष्ट्राच्या जनतेपुढे आले.
४. प्रणब मुखर्जी :

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी एम.ए. ची पदवी घेतल्यानंतर कलकत्त्याच्या एका विद्यापीठातून एलएलबीची पदवी देखील घेतली.
त्यानंतर त्यांनी डेप्युटी अकाऊंटंट जनरल यांच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.
५. सोनिया गांधी :
इटली येथे जन्मलेल्या सोनिया गांधी या सध्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी कॅम्ब्रीजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांची भेट राजीव गांधी यांच्यासोबत झाली.
त्यानंतर त्यांचे लग्न झाले. असे सांगितले जाते की, जेव्हा राजीव गांधी आणि सोनिया यांची भेट झाली तेव्हा सोनिया त्या एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करायच्या.
६. राहुल गांधी :

आज राजकारणात या नेत्यावर प्रचंड विनोद केले जातात, त्याच्या भाषणांबद्दल, बोलण्याबद्दल! आणि आज एका विशिष्ट टोपण नावाने सुद्धा यांना ओळखले जाते!
त्यांचे नाव किंवा टोपण नाव सांगायची सुद्धा गरज नाही, ते आहेत राहुल गांधी!
राहुल गांधी यांनी बीए आणि एमफिलची पदवी घेतल्यानंतर लंडनच्या मॉनिटर ग्रुपमध्ये काम केले. त्यानंतर ते भारतात परतले. ज्यानंतर ते राजकारणात आले.
७. डॉ. मनमोहन सिंग :

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी United Nations Conference on Trade and Development (UNCTAD) काम केले होते.
यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून देखील काम केले. ज्यानंतर ते राजकारणात आले. त्यांनी १० वर्षांपर्यंत देशाचे पंतप्रधान पद भूषवले.
८. लालू प्रसाद यादव :

बिहार येथील मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे राजकारणात येण्याआधी पटना येथील बिहार वेटनरी कॉलेजमध्ये क्लर्कची नोकरी करायचे.
तिथेच त्यांचे भाऊ चपरासी होते. ज्यानंतर लालू यांनी लॉ ची पदवी घेतली आणि राजकारणात उतरले.
९. मायावती :

गाझियाबाद च्या VMLG मधून B.Ed. ची पदवी घेतल्यानंतर मायावती यांनी आयएएसची तयारी करण्यास सुरवात केली. त्यासोबतच त्या शाळेतील मुलांना शिकवायच्या.
त्यानंतर मायावती या राजकारणात आल्या आणि त्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या.
१०. स्मृती ईराणी :

आज पार्लमेंट मध्ये तडाखेदार आणि अभ्यासू भाषण देणाऱ्या आणि तितक्याच आत्मियतेने देशाच्या लोकांची सेवा करणाऱ्या स्मृति इराणी यांना कोण ओळखत नाही!
त्यांचा राजकरणातला अंदाज, त्यांचा हजरजबाबी पणा काही निराळाच आहे, त्यामुळेच कॅबिनेट मधल्या त्या एक तडफदार महिला मंत्री आहेत!
स्मृती इराणी बद्दलतर सर्वांनाच माहिती आहे. त्या राजकारणात येण्याअगोदर एक टीव्ही अभिनेत्री होत्या. ज्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आणि आज त्या केंद्रीय मंत्री आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
मला राजकारन कारायचे आहे