'अॅनिमेटेड भासणारी ही ठिकाणं वास्तविक आहेत

अॅनिमेटेड भासणारी ही ठिकाणं वास्तविक आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये आजकाल व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्टचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आपण कधीही विचार देखील करू शकत नाही, अशा गोष्टी या चित्रपटांमध्ये दाखवल्या जातात. या चित्रपटांमधील दाखवलेले हे काल्पनिक लोकेशन प्रत्यक्षात असायला हवे होते, असे आपल्याला मनातून नक्कीच वाटत असते. या लोकेशेन्सचे सौंदर्य खूपच अप्रतिम असते. आपण जिथे राहतो, तिथे आपल्याला नुसत्या इमारती आणि गर्दी पाहायला मिळते. त्या चित्रपटांत दाखवण्यात येणाऱ्या जागांसारख्या कदाचितच कधीतरी एखादी जागा पाहण्यास मिळते. आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जे या चित्रपटांच्या लोकेशनशी मिळते जुळते आहेत. तिथे गेल्यावर तुम्हाला वाटेल की, आपण खरच त्या चित्रपटांच्या जगात आलो आहे. चला तर मग जाणून घेऊया, अशा काही जागांबद्दल ज्या खूपच अप्रतिम आणि भुरळ पडणाऱ्या आहेत.

१. Rakotzbrucke Devil’s Bridge

 

Miraculous places on the earth.Inmarathi
lufthansa.com

हे आर्क शेप्ड ब्रिज जर्मनीच्या Kromlauer पार्कमध्ये बनलेले आहे. या ब्रिजला यासाठी असे बनवले गेले होते की, जेव्हा पाण्यामध्ये याचे प्रतिबिंब पडल्यावर ते एका वर्तुळाप्रमाणे दिसेल.

२. Mount Roraima

 

Miraculous places on the earth.Inmarathi1
huffpost.com

Mount Roraima हे दक्षिण अमेरिकेच्या Pakaraima Mountains मध्ये सर्वात उंच आहे. हे माउंटन जवळपास २०० कोटी वर्षापेक्षा जुने आहे.

३. Fjadrarglijufur Canyon Iceland

 

Miraculous places on the earth.Inmarathi2
frugalfrolicker.com

हे मनमोहक दरीचे दृश्य दक्षिण पूर्व आइसलँडमध्ये  १०० मीटर खोल आणि २ किलोमीटर लांब आहे. या दरीतून Fjadra नदी वाहते.

४. Capilano Suspention Bridge

 

Miraculous places on the earth.Inmarathi3
cloudinary.com

हा सस्पेंशन ब्रिज कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांताच्या उत्तर व्हँकुव्हर जिल्ह्याच्या कॅपिलानो नदीवर बनलेला आहे. या ब्रिजवर फिरण्यासाठी प्रत्येकवर्षी जवळपास ८ लाख लोक येतात.

५. Tasman National park

 

Miraculous places on the earth.Inmarathi4
chrisbellphotography.com

तास्मान राष्ट्रीय उद्यान हे ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियामध्ये बनले आहे. हे उद्यान उंच – उंच खडकांनी आणि पर्वतांसाठी ओळखले जाते. या उद्यानातील सर्वात उंच खडकाची उंची समुद्र सपाटीपासून ९८० फुटापर्यंत आहे.

६. Antelope Canyon

 

Miraculous places on the earth.Inmarathi5
earthtrekkers.com

हा घाट उत्तर अमेरिकेमध्ये स्थित आहे. हा घाट वेगवेगळ्या भव्य भागांमध्ये विभागलेला आहे. हे यात्री आणि फोटोग्राफर्ससाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे.

७. Pink Lake

 

Miraculous places on the earth.Inmarathi6
sbs.com

लेक हिलीयर हे एक खारे तलाव आहे, जे पश्चिमी ऑस्ट्रेलियाच्या एका बेटावर बनले आहे. हे तलाव आपल्या गुलाबी रंगासाठी ओळखले जाते. हा गुलाबी रंग ‘Dunaliella Salina’ नावाच्या एका ऑर्गनिझममुळे आहे.

८. The Dark Hedges

 

Miraculous places on the earth.Inmarathi7
wordpress.com

Dark Hedges हे उत्तर आयर्लंडच्या County Antrim मध्ये Armoy आणि Stranocum च्यामध्ये झाडांचा लुक लँडस्केप टाईपचा आहे. हे पाहून खूपच मस्त वाटते.

९. Zhangye National Geopark

 

Miraculous places on the earth.Inmarathi8
blogspot.com

हे जियोपार्क चीनच्या गान्सू प्रांताच्या झांगे शहरामध्ये बनलेले आहे. या पार्कमध्ये कितीतरी रंगबेरंगी खडके पाहायला मिळतात. या जियोपार्कला पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, साधी खडके देखील मनात घर करून जातात.

१०. Vatnajokull glaciar

 

Miraculous places on the earth.Inmarathi9
cloudfront.net

आइसलँडच्या या ग्लेशियरच्या खाली तयार झालेल्या गुहा खूपच सुंदर आहेत. प्रकाशामुळे या गुहांचा रंग बदलल्यासारखा दिसून येतो.

११. Hitachi Seaside park

 

Miraculous places on the earth.Inmarathi10
.staticflickr.com

हे पब्लिक पार्क जपानच्या Ibaraki मध्ये बनले आहे. या पार्कमध्ये रंगीबेरंगी फुलांचे कितीतरी प्रकार बघायला मिळतात. हे जपानचे खूप प्रसिद्ध पार्क आहे.

१२. Mont Saint-Michel

 

Miraculous places on the earth.Inmarathi11
viator.com

हे बेट फ्रान्सच्या Normandy मध्ये स्थित आहे. २००९ मध्ये या बेटाची लोकसंख्या फक्त ४४ होती. येथे दरवर्षी जवळपास ३० लाख पर्यटक फिरण्यासाठी येतात. हे खासकरून रात्रीच्या वेळी येथे लाईटस लागल्यावर खूपच सुंदर दिसते.

अशी ही ठिकाणे एखाद्या चित्रपटातील अॅनिमेटेड लोकेशन सारखी भासतात, पण ही ठिकाणे त्यांच्यासारखी काल्पनिक नाहीत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?