'वैमानिक केवळ स्टायलिश दिसण्याकरिता एव्हिएटर्स घालत नाहीत, जाणून घ्या त्यामागील खरे कारण

वैमानिक केवळ स्टायलिश दिसण्याकरिता एव्हिएटर्स घालत नाहीत, जाणून घ्या त्यामागील खरे कारण

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

विमानामध्ये वैमानिक म्हणजेच विमानाचा चालक खूप महत्त्वाचा घटक असतो, कारण विमानाची संपूर्ण धुरा त्याच्यावर असते. वैमानिकावर विश्वास ठेवूनच एवढी सर्व माणसे विमानामध्ये निश्चिंत होऊन बसलेली असतात. त्यामुळे वैमानिक हा हुशार आणि संकटसमयी योग्य निर्णय घेणारा असावा, कारण त्याच्या एका निर्णयावर विमानातील सर्व माणसांचे जीव अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. वैमानिकचे व्यक्तिमत्व देखील खूप आकर्षक असते, त्यांचा तो रुबाबदारपणा मनाला भुरळ पाडतो.

 

Pilots wear aviators.Inmarathi
newsapi.com

त्यांचा तो युनिफॉर्म आणि डोळ्यावर घातलेले सनग्लासेस त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला अजूनच खुलवतात. तुम्ही चित्रपटामध्ये आणि खऱ्या आयुष्यामध्ये देखील नेहमी वैमानिकना सनग्लासेस घातलेले पाहिले असेल. ज्याला आजकाल सामान्य भाषेमध्ये एव्हिएटर्स असे म्हटले जाते. वैमानिक हे सनग्लासेस लावून अजूनच स्टायलिश वाटतात. पण तुम्हाला माहित आहे का? की, हे सनग्लासेस फक्त स्टाइल मारण्यासाठी घातले जात नाहीत, तर त्यांचे या क्षेत्रामध्ये  खूप महत्त्व असते. चला तर मग जाणून घेऊया, वैमानिक नेहेमी हे एव्हिएटर्स का घालतात ते..

१९३० च्या दरम्यान नवीन तंत्रज्ञानामुळे विमानांना जास्त उंचीवर उडवले जाऊ लागले, पण त्यामुळे वैमानिकांना कितीतरी समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्यांच्या समाधानासाठी रे – बेन एव्हिएटर्स अस्तित्वात आले.

Pilots wear aviators.Inmarathi1
mdzol.com

हे सर्व काही तेव्हा सुरु झाले, जेव्हा अमेरिकन आर्मी पायलट्सना सन ग्लेयर्स, एल्टीट्यूड सिकनेस आणि डोकेदुखी यांसारख्या तक्रारी त्यांच्याकडून येऊ लागल्या. तेव्हा अमेरीकन आर्मीने बॉश अँड लॉम्ब (‘Bausch and Lomb’) या कंपनीला एव्हिएटर्स सनग्लासेस बनवायला सांगितले.

या समस्यांविषयी तपासणी केल्यानंतर समजले की, आकाशाच्या निळ्या आणि पांढऱ्या रंगामुळे सूर्याची किरणे सरळ डोळ्यात जातात ज्यामुळे ही डोकेदुखीची समस्या निर्माण होत होती.

१९३६ मध्ये जे प्रोटोटाईप बनले त्याला ‘अँटी ग्लेयर’ नाव देण्यात आले. या ग्लासेसमध्ये प्लास्टिकची फ्रेम आणि सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी हिरव्या रंगाचे ग्लासेस होते. काही काळाने या अँटी ग्लेयर ग्लासेसमध्ये मेटालिक फ्रेम लावण्यात आली. तसेच, या ग्लासेसच्या रेजला बॅन करण्याच्या खास वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘रे – बॅन’ नाव देण्यात आले.

 

Pilots wear aviators.Inmarathi2
pinimg.com

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ‘जनरल डगलस मॅक ऑर्थर’ ने या ग्लासेसला घालून फोटो काढला होता. त्यानंतर एव्हिएटर्स संपूर्ण जगात फेमस झाले. या ग्लासेसमुळे पायलट्सला हानिकारक UV रेज आणि सूर्याच्या किरणांपासून वाचवते.

ग्रे रंगाचे ग्लासेस सर्वात चांगले असतात, कारण ग्रे रंग हा पिवळा किंवा नारिंगी रंगाच्या तुलनेत प्रकाशाला डिसटॉर्ट करतो. याव्यतिरिक्त पोलेराइज्ड लेंसेस देखील डिजिटल साधनाच्या डिस्प्लेला ब्लर करत असल्यामुळे खराब मानले जातात.

यामुळे वैमानिक नेहमी आपल्याला हे एव्हिएटर्स घातलेले दिसतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?