साधू – संत यांच्या पायात ‘लाकडी पादुका’ का असतात? त्यामागचं कारण जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हिमालयात भटकणारे संत साधू, तसेच आपल्या आसपास सुद्धा आपण असे साधू बरेच बघतो!

भगवे कपडे घातलेले, भस्म लावलेले, जटा वाढवलेले, एक झोळी घेऊन त्यावरच उदरनिर्वाह करणारे, असे साधू आपण पाहिले असतीलच!

पण तरीही त्याच्यामध्ये एक गोष्ट खूपच कॉमन असते, ती म्हणजे त्यांच्या पायातल्या लाकडी पादुका, काही संत साधू हे अनवाणीच फिरतात पण त्यांच्यापैकी बरेच साधू लाकडी पादुका घालतात!

त्याला खडावा असे सुद्धा म्हणतात!  

खडावा- म्हणजेच लाकडी पादुका… तुम्ही अक्षय कुमार आणि परेश रावलचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट बघितलाच असेल.

त्यामध्ये एक सीन असा दाखवला आहे की, अक्षय कुमारच्या पायात चप्पल असते तेव्हा तो कृष्णाच्या मंदिरात ठेवलेल्या लाकडी पादुका आपल्या पायात घालतो.

 

omg scene inmarathi
charmboard

 

हा सीन बघितल्यावर त्या प्राचीन काळाची आठवण होते जेव्हा साधू-संत हे पायात हा खडावा घालायचे.

पण ते पायात या लाकडी पादुका का घालत असावे आणि त्यांनी पादुका बनविण्यासाठी लाकडाचीच निवड का केली असावी? असे प्रश्न नक्कीच आपल्या मनात आले असणार…

आज आम्ही तुमच्या याचं प्रश्नच उत्तर घेऊन आलो आहोत..

 

khadava-inmarathi03
khabridost.in

 

प्राचीन काळी साधू-संत हे या लाकडाच्या पादुका म्हणजेच खडावा घालायचे. तसेच त्या काळचे अनेक लोकं या लाकडी पादुकांचा वापर करायचे.

आजच्या काळात या लाकडी पादुकांची जागा भलेही वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल आणि बुटांनी घेतली असली तरी देखील आजही अशे अनेक साधू-संत आहेत जे खडावाचं वापरतात.

पण असे का..? तर यामागे एक वैज्ञानिक तसेच धार्मिक कारण आहे.

 

khadava-inmarathi02
palpalindia.com

 

चला तर मग जाणून घेऊ की हे साधू-संत लाकडाच्या पादुका का वापरतात ते..

 

khadava-inmarathi04
bhaskar.com

 

गुरुत्वाकर्षणचा जो सिद्धांत आपल्या वैज्ञानिकांनी मांडला, तो ऋषी-मुनींनी प्राचीन काळीच जाणला होता.

या सिद्धांतानुसार, आपल्या शरीरात प्रवाहित होणाऱ्या विद्युत लहरी गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी द्वारे अवशोषित केली जातात.

जर ही प्रक्रिया निरंतर सुरु असली तर त्यामुळे शरीरातील सर्व जैविक शक्ती संपून जाईल.

 

khadava-inmarathi
googleusercontent.com

 

याच जैविक शक्तींना वाचविण्याकरिता साधू-संत त्यांच्या पायात या लाकडी पादुका घालण्याची प्रथा सुरु केली, ज्यामुळे शरीरातील विद्युत लहरींचा पृथ्वीच्या अवशोषण शक्ती सोबत संपर्क येणार नाही.

 

khadava-inmarathi01
bhaskar.com

 

अनेक धार्मिक आणि सामाजिक कारणांमुळे प्राचीन काळी चामड्याचा बूट किंवा चप्पल समाजाच्या एका मोठ्या वर्गाला मान्य नव्हती.

तर कपड्याचे बूट प्रत्येक ठिकाणी वापरण्यायोग्य नव्हते. जेव्हाकी लाकडी पादुका घातल्याने कुठल्याही धर्म अथवा समाजाला आपत्ती नव्हती म्हणून हे खडावा प्रचलित झाले.

त्यानंतर हे साधू-संतांची ओळखच बनले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?