महागडी हॉटेल्स : जगातल्या या “९” हॉटेल्समधलं एका रात्रीचं भाडं ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भटकंती कोणाला आवडत नाही? रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून चार क्षण निवांत, निसर्गरम्य जागी घालवण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.

आपण कुठेही फिरायला जायचं ठरवलं की, आपण प्रत्येक गोष्टीची माहिती काढायला सुरुवात करतो. तिथे कसं जायचं, कुठे राहायचं, काय-काय बघायचं, काय करायचं हे  आपण ठरवतो आणि त्याचं प्लॅनिंग करतो.

फिरायला जाण्याआधी नेहमी आपण जिथे राहणार आहोत, त्या हॉटेल्सची संपूर्ण माहिती काढतो आणि त्यांच्याकडे आपली सोय कशी होईल, याबद्दल चौकशी करतो. सुंदर रूम, आरामदायी बेड, हॉटेलच्या बाहेर निसर्गरम्य देखावा आणि उत्तम सोय याची पाहणी करूनच आपण हॉटेल नक्की करतो.

पण हे सगळं आपल्या बजेटमध्ये आहे की नाही याचा विचार आपण केलेला असतो. हवं तसं हॉटेल न मिळाल्यास थोडीशी तडजोड करावी लागते, पण प्रत्येकवेळी आपल्याला हॉटेलमध्ये चांगल्या रूम मिळतीलच, असं काही नक्की आहे.

आज आम्ही तुम्हाला जगातील काही अलिशान हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत, जिथे एक रात्र राहणं सर्वसामन्यांच्याच नाही तर कदाचित श्रीमंतांच्या खिशाला परवडणारं नाही. चला तर मग जाणून घेऊया, या अलिशान हॉटेल्सबद्दल..

 

१. द अपार्टमेंट, कनॉट हॉटेल, लंडन

 

Expensive Hotels in World.Inmarathi
tripstodiscover.com

 

लंडनचे हे प्रीमियर पेंटहाउस, इंटीरियर फर्निचर, आर्ट लिमिटेड बुक्स आणि युनिक अँटिक्सपासून बनवले गेले आहे. येथील कनॉट बटलर जॉ मिशिलीन स्टार्ड शेफ आहे, तो तुमच्यासाठी कधीही जेवण बनवू शकतो.

या हॉटेलमध्ये एक रात्र काढण्यासाठी २४६०० डॉलर म्हणजेच जवळपास १५ लाख रुपये मोजावे लागतात.

 

२. द रॉयल सूट, संयुक्त अरब अमिरात

 

Expensive Hotels in World.Inmarathi1
rackcdn.com

 

संयुक्त अरब अमिरातच्या या ‘द रॉयल सूट हॉटेल’मध्ये खूप भल्यामोठ्या खोल्या आहेत. या हॉटेलला दोन मजले आहेत. येथे बटलर सर्विस आणि खाजगी थिएटर सेवा दिली जाते. तसेच, या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल आणि गेम्स रूम देखील आहेत.

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी ३५००० डॉलर म्हणजेच जवळपास २१ लाख रुपये मोजावे लागतात.

 

३. हिलटॉप अॅस्टेट, लॉकाला आयलँड रिसॉर्ट, फिजी

 

Expensive Hotels in World.Inmarathi2
pinimg.com

 

रेडबुलच्या हेडने या बेटाला २००३ मध्ये खरेदी केले होते. जेव्हापासून त्यांनी या बेटाला प्रायव्हेट रिट्रीटमध्ये बदलले आहे. तेव्हापासून येथे प्रायव्हेट कुक, शॉफर यांसारख्या सुविधा मिळतात.

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी ५५००० डॉलर म्हणजेच जवळपास ३३ लाख रुपये मोजावे लागतात.

 

४. द रॉयल व्हिला, अथेन्स, ग्रीस

 

Expensive Hotels in World.Inmarathi3
lagonissiresort.gr

 

हॉलिवूड स्टार लियोनार्डो डिकेप्रियो आणि मेल गिब्सन यांनी या जागेची खूप प्रशंसा केली आहे. या ग्रँड रेसॉर्टमध्ये राहिल्यावर तुम्हाला प्रायव्हेट जेटमध्ये फिरवले जाते.

येथे तुमच्या सेवेसाठी प्रायव्हेट शेफ, पर्सनल ट्रेन आणि ऑन कॉल पियानिस्ट उपलब्ध असतात. येथे एक जिम आहे, इनडोर आणि आउटडोर पूल आहे आणि टेरेसवर कॉकटेलचा देखील पर्याय उपलब्ध आहे.

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी ४७००० डॉलर म्हणजेच जवळपास २८ लाख रुपये मोजावे लागतात.

 

५. रॉयल पेंटहाउस स्वीट, हॉटेल प्रेझीडेंट विल्सन, जेनेव्हा, स्वित्झर्लंड

 

Expensive Hotels in World.Inmarathi4
rackcdn.com

 

हे राहण्यासाठी जगातील सर्वात अलिशान हॉटेल आहे. येथे १२ बेडरूम, १२ बाथरूम, हॅलिपॅड, सेने ग्रँड पियानो, बिलियर्ड टेबल, बुलेटप्रूफ खिडकी, प्रायव्हेट स्टाफ उपलब्ध आहे. या सुटमध्ये  हॉलिवूड स्टार मायकल डगलस राहिले होते.

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी ६०००० डॉलर म्हणजेच जवळपास ३६ लाख रुपये मोजावे लागतात.

 

६. महाराजा पव्हेलियन, राज पॅलेस हॉटेल, जयपूर

 

shahi-mahal-suite inmarathi

 

जयपूरमध्ये असलेले हे हॉटेल आशियामधील सर्वात महागडे हॉटेल आहे. हे हॉटेल १७२७ मध्ये तयार करण्यात आले होते. येथे ६ बेडरूम, एक प्रायव्हेट थिएटर, एक लायब्ररी आणि एक प्रायव्हेट किचन स्टाफ मिळेल. या हॉटेलचा एक ग्रँड हेरीटेज हॉटेलच्या ब्रँडसारखा प्रचार केला जातो.

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी ४५००० डॉलर म्हणजेच जवळपास २७ लाख रुपये मोजावे लागतात.

 

७. द स्काय व्हिला, पाल्म्स कॅसिनो रेसॉर्ट, लास व्हेगस

 

Expensive Hotels in World.Inmarathi6
tripandtravelblog.com

 

अमेरिकेमध्ये असलेल्या स्काय व्हिलाच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. या हॉटेलमध्ये काचेचा खूप वापर केला आहे. येथे कंटिलीव्हर पूल आहे, खाजगी काचेची लिफ्ट आहे. बेडरूममध्ये रोटेटिंग बेड, टू वे फायरप्लेस आहे.

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी ४०००० डॉलर म्हणजेच जवळपास २४ लाख रुपये मोजावे लागतात.

 

८. द सेंट रेगिस व्हिला, मॉरीशस

 

st-regis-mauritius1 inmarathi

 

मॉरीशस बेटावरील हे सगळ्यात मोठे हॉटेल आहे. इथे प्रायव्हेट शेफ, लाऊंज, बार आहे.

इथे एक रात्र राहण्यासाठी ३०,००० डॉलर म्हणजेच मोजावे लागतात.

 

९. रॉयल सूट, हॉटेल प्लाझा, पॅरिस

 

royal suite inmarathi
the telegraph

 

पॅरिसमध्ये राहणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं , पण या हॉटेलची किंमत जाणून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल..!

रूम साधारण ४५० चौरस मीटर इतकी आहे. यामध्ये सोन्याच्या धाग्यांनी काम करण्यात आलं आहे.

इथे एक रात्र राहण्यासाठी २७,००० डॉलर एवढी किंमत मोजावी लागते.

 

ही आणि यांसारखी इतर काही हॉटेल्स ही खूपच अलिशान आणि सुंदर आहेत. पण सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?