' आईसलंडच्या नव्या पंतप्रधानांबद्दल तुम्हाला माहित आहे का? – InMarathi

आईसलंडच्या नव्या पंतप्रधानांबद्दल तुम्हाला माहित आहे का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आईसलंडच्या जनतेने एका तरुण महिलेला आपली पंतप्रधान म्हणून निवडले आहे. आईसलंड च्या या नवीन पंतप्रधानांच नाव Katrin Jakobsdottir असून त्या ४१ वर्षांच्या आहेत. त्या सैन्यवादाच्या विरोधात आहेत. त्या महिलांच्या हक्काबाबत बोलतात, त्या फेमिनीस्ट आहेत आणि ग्लोबल वार्मिंग च्या विषयाबाबत अतिशय गंभीर आहेत.

 

Katrin Jakobsdottir-inmarathi03

 

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी जगातील १९५ देशांदरम्यान करण्यात आलेल्या पॅरीस करारातून काढता पाय घेतला. डोनाल्ड ट्रम्पच्या या निर्णयाचे जागतिक स्तरावर निंदा करण्यात आली होती.

 

Katrin Jakobsdottir-inmarathi02

 

पण कॅटरीन यांना पॅरीस अॅक्ट पेक्षाही काहीतरी मोठं करायचं आहे. आईसलंड हे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेटचेंज सारख्या मुद्द्यांकरिता इतर देशांसमोर एक उदाहरण म्हणून उभं राहावं, अशी त्यांची इच्छा आहे.

कॅटरीन यांना त्यांच्या देशातील पर्यटनाला देखील विकसित करण्याची इच्छा आहे यामुळे जो काही नफा होईल तो आरोग्य आणि शिक्षा या विभागांत गुंतवता येईल. त्यांच्या कुटुंबात अनेक विख्यात कवी, राजनेता आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबधित लोकं आहेत.

 

Katrin Jakobsdottir-inmarathi

 

युनिवर्सिटी ऑफ आईसलंड येथून त्यांनी त्याचं ग्रॅजुएशन केलं. तसेच त्यांनी आईसलंडच्या साहित्यात मास्टर डिग्री घेतली आहे. राजनीतीत येण्याआधी त्यांनी साहित्याचा अभ्यास केला आहे आणि त्यांना क्राईम नॉव्हेल्स खूप आवडतात. त्यांना तीन मुलं देखील आहेत.

कॅटरीन या आईसलंडच्या शिक्षा मंत्री देखल राहिल्या आहेत. त्यांना एक विश्वासपात्र नेता मानल्या जाते. आईसलंडच्या मतदान पूर्व पोल्समध्ये अर्ध्याहून जास्त मतदार त्यांना पंतप्रधान पदावर बघू इच्छित होते.

 

Katrin Jakobsdottir-inmarathi01

 

त्यांच्या कॅबिनेटमध्ये तीन सदस्य त्यांच्या स्वतःच्या परतीचे म्हणजेच लेफ्ट ग्रीन पार्टीचे असतील. ५ सदस्य हे राईट विंग इंडिपेंडंन्स पार्टीचे आणि ३ सदस्य प्रोग्रेसिव्ह परतीचे असतील. त्यांच्या अजेंड्यामध्ये आरोग्य, शिक्षा आणि ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर यांवर फोकस तसेच २००८ च्या आर्थिक प्रभावातून देशाला स्थिर बनवणे तसेच LGBT राईट्स इत्यादी मुद्दे आहेत.

आईसलंडच्या नव्या पंतप्रधान खूप महत्वाकांशी असल्याचं यावरून दिसून येते…

स्त्रोत : metro.co.uk

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?